FIH Hockey Awards : आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने आपल्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा केली असून यात भारताच्या दोन हॉकी खेळाडूंना सन्मानित करण्यात आले आहे. भारताच्या हॉकी संघाचे कर्णधार हरमनप्रीत सिंह (Harmanpreet Singh) याला वर्ष 2024 साठी एफआईएचचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे भारताचा माजी गोलकीपर पीआर श्रीजेशला (PR Sreejesh) सर्वोत्कृष्ट गोलकीपर म्हणून निवडले गेले आहे. हा पुरस्कार दोन्ही खेळाडूंना ओमानमध्ये आयोजित 49 व्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनमध्ये दिला जाणार आहे.
हरमनप्रीत सिंहने हा पुरस्कार जिंकून नेदरलँडच्या जोएप डी मोल आणि थियरी ब्रिंकमॅन, जर्मनीच्या हेंस मुलर आणि इंग्लंडच्या जॅक वालेस याला मागे टाकलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय टीमसाठी 10 गोल केलेल्या हरमनप्रीतने संघाला ब्रॉन्झ मेडल मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. पीआर श्रीजेशने गोलकिपर कॅटेगरीमध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळवला. यात त्याने नेदरलँडचा पिरमिन ब्लॅक, स्पेनचा लुइस कॅलजाडो, जर्मनीचा जीन पॉल डेनेबर्ग आणि अर्जेंटिनाचा टॉमस सँटियागो याला मागे टाकलं.
हरमनप्रीत सिंहने हा पुरस्कार तिसऱ्यांदा जिंकला आहे. 2020-21 आणि 2021-22 मध्ये सुद्धा हरमनप्रीतला या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. हरमनप्रीतने पुरस्कार जिंकल्यावर सांगितले की, 'माझ्यासाठी हा पुरस्कार अतिशय महत्वाचा आहे. मी माझे सहकारी, हॉकी इंडिया आणि माझ्या कुटुंबाचे आभार मानू इच्छितो'.
हेही वाचा : Photos: चौथीत शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेनेच दिली 90 लाखांची Mercedes कारण...
पीआर श्रीजेशने सुद्धा हा पुरस्कार तिसऱ्यांदा जिंकला. पुरस्कार मिळाल्यावर त्याने आपल्या भावना व्यक्त करत म्हंटले की, 'हा पुरस्कार पूर्णपणे माझ्या टीमचा आहे. हा पुरस्कार मिडफील्डर आणि फॉरवर्डचा आहे कारण यांनी मी जेवढे गोल खाल्ले त्यापेक्षा जास्त गोल करून त्यांनी माझ्या चुका लपवल्या'.
हेही वाचा : गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी? रोहित सोबत 6 तासांच्या बैठकीनंतर BCCI ऍक्शन मोडमध्ये
सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू : यिब्बी जानसन (नेदरलँड)
महिला गोलकीपर: ये जिओ (चीन)
रायजिंग स्टार (पुरुष) : सुफियान खान (पाकिस्तान)
रायजिंग स्टार (महिला) : जो डियाज (अर्जेंटीना)
सर्वोत्कृष्ट पुरुष कोच: जेरोइन डेल्मी (नेदरलँड)
सर्वोत्कृष्ट महिला कोच: एलिसन अन्नान
पुरुष अंपायर: स्टीव रोजर्स (ऑस्ट्रेलिया)
महिला अंपायर: सारा विल्सन (स्कॉटलँड)