Breaking News Live Updates : आजच्या दिवशी राज्याच्या राजकारणाला मिळणार नवी दिशा? देश पातळीवर कोणत्या घडामोडींकडे असेल लक्ष? पाहा सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे Live Updates.....
26 Aug 2024, 19:29 वाजता
Breaking News Live Updates : पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने वार करणाऱ्या आरोपींना अटक
पुण्याचे सहाय्यक पोलीस पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड हे रस्त्यावर सुरु असलेलं भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना पुण्यात हडपसर परिसरात घडली होती. या घटनेतील आरोपींना पुणे पोलिसांनी सोलापूर मधून अटक केली असून या आरोपीला पॉलिसी खाक्या दाखवत पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले.
26 Aug 2024, 19:28 वाजता
मुंबई गोवा महामार्गावरील अपघातास ठेकेदार जबाबदार, सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा - मुख्यमंत्री शिंदे
मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवार 26 ऑगस्ट रोजी स्वतः मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी काहीही करून गणेशोत्सवपूर्वी हा रस्ता नीट करून वाहतुकीसाठी सुरळीत करावा असे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले. तसेच मुख्यमंत्र्यांनी, 'महामार्गावरील अपघातास ठेकेदार जबाबदार असून त्यांना केवळ ब्लॅकलिस्ट करू नका तर जेल मध्ये टाका', असं म्हंटल आहे. तसेच मुंबई गोवा महामार्गावरील बेजबाबदार ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
26 Aug 2024, 18:04 वाजता
महाराजांच्या पुतळ्याच्या कामात पण कमिशन खाल्ले? कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करा -वडेट्टीवार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 ला मालवण मध्ये नौदल दिनानिमित्त या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. यावरून आता विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवरायांचा हा पुतळा उभारणाऱ्या कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट केलं पाहिजे असं म्हटलं आहे. विजय वडेट्टीवारांनी आरोप केला की, "हा पुतळा उभारण्याचा काम ठाण्यातील एका कंत्राटदारला दिले होते. महाराजाच्या कामात पण कमिशन खाल्ले? महाराजांना पण टक्केवरीतून सोडले नाही
या कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट केलं पाहिजे" असे म्हंटले. तसेच या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
26 Aug 2024, 16:21 वाजता
छ. शिवरायांचा पुतळा कोसळल्याने आमदार वैभव नाईकांचा संताप, PWD चं ऑफिस फोडलं
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 ला मालवण मध्ये नौदल दिनानिमित्त या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. शिवरायांचा हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप स्पष्ट नाही, मात्र यामुळे उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. या पुतळ्याच्या देखभालीची जबाबदारी सिंधुदुर्गातील PWD कार्यालयाकडे होती. तेव्हा शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आमदार वैभव नाईक यांनी PWD कार्यालयाची तोडफोड केली. वैभव नाईक यांनी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही घटना घडल्याचा केला आरोप केला आहे.
26 Aug 2024, 15:07 वाजता
गणेशोत्सवापूर्वी मुख्यमंत्री शिंदेंकडून मुंबई- गोवा महामार्गाची पाहणी
गोवा महामार्गाचा पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवार 26 ऑगस्ट रोजी स्वतः मैदानात उतरले आहेत. या रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे आणि ते बुजवताना येणाऱ्या अडचणी इत्यादी समजून घेत मुख्यमंत्री मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करत आहेत. काहीही करून गणेशोत्सवपूर्वी हा रस्ता नीट करून वाहतुकीसाठी सुरळीत करावा असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. तसेच तातडीने या मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रेपीड क्विक सेटिंग हार्डनर ( एम -60 ) चा वापर करून हे खड्डे बुजवता येतील का? याचाही आढावा शिंदे घेत आहेत. याबाबत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीवेळीच त्यांनी संबंधित यंत्रणांना हे रस्ते सुरळीत करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. या सूचनांची कितपत अंमलबजावणी झाली याचाही आढावा ते या दौऱ्यात घेणार आहेत.
26 Aug 2024, 14:43 वाजता
Breaking News Live Updates : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला
नौदल दिनानिमित्त छञपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला आहे. शिवरायांचा हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप स्पष्ट नाही, मात्र यामुळे शिव प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 ला मालवण मध्ये नौदल दिनानिमित्त या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी घटास्थळाला भेट देऊन पाहणी केली असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही घटना घडल्याचा केला आरोप केला आहे.
26 Aug 2024, 14:32 वाजता
Breaking News Live Updates : कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे स्वयंचलित चार दरवाजे पुन्हा एकदा उघडण्यात आले असून धरणातून भोगावती नदीपत्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तुळशी, दूधगंगा, कुभी धरणातून देखील विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीकडच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा आदेश दिला आहे. जिल्ह्यात पडत असलेल्या संतातधार पाऊसामुळे पंचगंगा नदी पून्हा एकदा पात्रा बाहेर पडली आहे.
26 Aug 2024, 14:19 वाजता
Breaking News Live Updates :बदलापूरच्या दुर्दैवी घटनेनंतर लातूर पोलीस ॲक्टिव मोडमध्ये
बदलापूर च्या दुर्दैवी घटनेनंतर लातूर पोलीस ॲक्टिव मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. लातूरच्या पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हातील प्रत्येक शाळेत मुलींच्या सुरक्षतेसाठी विविध पथके स्थापन करण्यात आले आहेत. औसा तालुक्यातील किल्लारी येथील पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी शाळेत जावून विद्यार्थ्यांना कायद्याबद्दल ची माहिती मुलींची छेड काढल्यास अथवा शाळेत रॅगिंग केल्यास त्यांना काय शिक्षा आहे याची माहिती देण्यात येत आहे. मुलींना असुरक्षित वाटत असेल तर 112 हेल्प लाईन नंबर वर संपर्क करण्याचे आव्हान ही पोलिसांनी केलं आहे.
26 Aug 2024, 13:47 वाजता
भिवंडीत दूधाचा टँकर पलटला
भिवंडीमधील पारोळ मार्गावर दूधाचा टँकर पलटी झाला आहे. त्यामुळे दूध शेतात वाहून गेलं. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची दूध भरून घेण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
26 Aug 2024, 12:44 वाजता
Breaking News Live Updates : महाराष्ट्र दिल्लीपुढं झुकणार नाही- आदित्य ठाकरे
केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता येणारच. सध्याचं सरकार हे घटनाबाह्य असून, महाराष्ट्रात संविधानाचा अपमान झाला आहे. महाराष्ट्र दिल्लीपुढं झुकणार नाही, असं म्हणज आदित्य ठाकरे यांनी संभाजीनगरमध्ये आपली स्पष्ट भूमिका मांडत सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली.