Breaking News Live Updates : आजच्या दिवशी राज्याच्या राजकारणाला मिळणार नवी दिशा? देश पातळीवर कोणत्या घडामोडींकडे असेल लक्ष? पाहा सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे Live Updates.....
26 Aug 2024, 07:30 वाजता
Breaking News Live Updates : पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस
पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. रविवारी इथं 200 मिलिमीटर च्या वर पावसाचे नोंद झाली असून, भोर, वेल्हा, मुळशी ,मावळ या डोंगर माथा परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस झाला आहे. भोर तालुक्यातील निरा देवघर धरण क्षेत्रात सर्वाधिक पाऊस झाला असल्याची माहिती प्रशासनानं दिली असून, इथं 214 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर, हिरडोशी भागात 190 मिलिमीटर, पांगारी भागात 165 मिलिमीटर, शिरवली भागत 142 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद इथं करण्यात आली.
26 Aug 2024, 07:21 वाजता
Breaking News Live Updates : सहकार भवनसाठी सायनमध्ये म्हाडाची जागा
सहकार भवनसाठी सायनमध्ये म्हाडाची जागा देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. सहकार भवनासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला म्हाडाची ही जागा 30 वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहे. याआधी मुंबै बँकेच्या सहकार भवनसाठी गोरेगावमधील तीन एकर जागा देण्याचा निर्णय शासकीय संकेतस्थळावर जारी झाला होता. मात्र लगेचच तो हटवण्यातही आला होता. मात्र आता या सहकार भवनला सायनमध्ये म्हाडाची जागा देण्यात आली आहे.
26 Aug 2024, 06:47 वाजता
Breaking News Live Updates : बदलापूर अत्याचार प्रकरणी नराधमाची आज न्यायालयात हजेरी
बदलापूर अत्याचार प्रकरणी नराधम आरोपी अक्षय शिंदेला आज कोर्टात हजर करणार आहे. त्याची पोलिस कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे त्याला कोर्टात हजर करणार आहे. पोलीस त्याची कोठडी वाढवून मागणार आहे. त्यामुळे नराधम आरोपीला कोर्ट आणखी किती दिवसांची कोठडी देणार हे पाहावं लागणार आहे.
26 Aug 2024, 06:47 वाजता
Breaking News Live Updates : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
पनवेलच्या पळस्पे नाका इथून दुपारी 12 वाजता मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा सुरू होणार आहे. मुख्यमंत्री मुंबई गोवा महामार्गाच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पाहणी दौऱ्याला महत्त्व आहे. मुंबई गोवा हायवेच्या चौपदरीकरण काम आणि हायवेची सध्याची स्थिती याचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहे.