Breaking News Live Updates : पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने वार करणाऱ्या आरोपींना अटक

Breaking News Live Updates : राज्यासह देशात राजकारणापासून इतर सर्व क्षेत्रांपर्यंत नेमकी काय आणि कशी परिस्थिती? पाहा Live Updates   

Breaking News Live Updates : पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने वार करणाऱ्या आरोपींना अटक

Breaking News Live Updates : आजच्या दिवशी राज्याच्या राजकारणाला मिळणार नवी दिशा? देश पातळीवर कोणत्या घडामोडींकडे असेल लक्ष? पाहा सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे Live Updates.....

 

26 Aug 2024, 11:13 वाजता

Breaking News Live Updates : गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपाच्या पावित्र्यात

गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपाच्या पावित्र्यात. कृती समितीला आश्वासन देऊनही निर्णय न झाल्याने एसटी कर्मचारी संपावर जाणार. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही असं म्हणत एसटी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला आहे. 3 सप्टेंबरपासून संपाचा इशारा देण्यात आला असून, मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन वेतनाचा मुद्दा निकाली काढा अशी मागणी एसटी युनियनने केलं आहे. 

26 Aug 2024, 11:12 वाजता

Breaking News Live Updates : बदलापूर प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी 

बदलापूर येथे शालेय मुलींवर करण्यात आलेल्या अत्याचार प्रकरणी आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं. कल्याणच्या जलद गती न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदे याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. या निकालानंतर आता या आरोपीची 
आधारवाडी कारागृहात होणार रवानगी. 

26 Aug 2024, 10:20 वाजता

Breaking News Live Updates : संभाजीनगरमधील तणावग्रस्त परिस्थितीनंतर अंबादास दानवे म्हणाले... 

संभाजीनगर येथील राड्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपच्या आंदोलनावर टीका करत आंदोलनं शांतीत करायला हवीत, काल आम्ही पंतप्रधान यांचा आदर करून आंदोलन केले. पण, आज भाजप व्यक्तिगत आंदोलन करत होते, आमच्या शिवसैनिकांना राग आला आणि ते पुरून उरले... असं दानवे म्हणाले. 

आमचे आंदोलन मोदींविरोधात नव्हते असं म्हणत, आम्ही स्त्रियांच्या सुरक्षेसाठी उतरलो होतो. कुठल्याच प्रकरणाची बरोबरी कुठ करू नये या शब्दांत त्यांनी भाजपचा विरोध केला. 

26 Aug 2024, 09:47 वाजता

Breaking News Live Updates : संभाजीनगरमध्ये राडा; भाजप आक्रमक 

संभाजीनगरमध्ये आज आदित्य ठाकरे सभा घेणार आहेत. आगामी  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आज पाच सभा घेणार आहे.  कन्नड, वैजापूर, पैठण, गंगापुरात आदित्य ठाकरे  स्वाभिमान मेळावा घेणार आहे.. संभाजीनगर जिल्ह्यातील  4 जागांवर आदित्य ठाकरे  दावा करणार आहेत. दरम्यान संभाजीनगरमध्ये ज्या हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे थांबलेत, त्या हॉटेल बाहेर पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलाय, भाजपने आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे या ठिकाणी मोठा पोलीस फौज फाटा तैनात आहे..

26 Aug 2024, 09:29 वाजता

Breaking News Live Updates : पुण्यात पुढील 60 दिवस नवा नियम लागू 

पुणे शहरात पुढीले 60 दिवस लेझर दिव्यांच्या वापरावर बंदी घालणारा आदेश पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी काढला आहे. घातक लेझर प्रकाशझोतांवर गणेश विसर्जन मिरवणुकीत बंदी घालण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकताच दिला होता. त्यापाठोपाठ या नव्या आदेशामुळे दहीहंडी उत्सवातही लेझर बीमवर बंदी राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. 

26 Aug 2024, 09:11 वाजता

Breaking News Live Updates : कळवा स्थानकात लातूर एक्सप्रेस थांबली आणि... 

कळवा स्टेशनला लातूर एक्सप्रेस थांबल्याने मध्य रेल्वे सेवा खोळंबली. तांत्रिक बिघाडामुळे लातूर एक्सप्रेस जवळपास 20 मिनटं कळवा स्थानकात थांबली होती. ज्यामुळं लोकल गाड्या अर्धा तास उशीराने धावल्या. यामुळं मुंबईकडे येणाऱ्या फास्ट ट्रॅक वरची सेवा खोळंबली. काही वेळानं ही लातूर एक्प्रेस स्थानकाबाहेर काढण्यात आली आणि ठाण्याच्या क्रमांक 8 च्या फलाटावर उभी करण्यात आली. तांत्रिक बिघाडामुळं ही रेल्वे रिकामी करण्यात आली असून त्यामुळं त्यातील प्रवासी लोकलनं प्रवास करत आहेत. 

26 Aug 2024, 08:36 वाजता

Breaking News Live Updates : कर्नाटकमध्ये पुन्हा ऑपरेशन लोटस?

''कर्नाटकचे सरकार पाडण्यासाठी भाजपने 100 कोटींची ऑफर दिली होती'' असा दावा करणारं वक्यय आणि गौप्यस्फोट काँग्रेस आमदार रविकिशन गौडा यांनी केला आहे. ''दोन दिवसापूर्वी मला फोन करून 100 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती'' असं म्हणाल्याचं सांगत 
''भाजपाला 50 आमदार विकत घ्यायचे आहेत, त्यासाठी मला फोन आला होता पण मी नकार दिला'' असंही ते म्हणाले. 

26 Aug 2024, 08:36 वाजता

Breaking News Live Updates : पावसामुळं कोल्हापुरात धोका वाढला! 

कोल्हापुरातल्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला. पंचगंगा नदीचे पाणी पुन्हा पात्रा बाहेर येण्यास सुरुवात झाल्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या पंचगंगेची पाणीपातळी 26 फूट 5 इंचावर पोहोचली असून, जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. 

26 Aug 2024, 08:30 वाजता

Breaking News Live Updates : महापालिकेच्या होर्डिंग धोरणाच्या मसुद्याला रेल्वेचा आक्षेप

महापालिकेच्या होर्डिंग धोरणावर आक्षेप घेणारे पत्र रेल्वेने 20 ऑगस्टला पाठवलं, ''इतर शासकीय एजन्सी'' हा शब्द वगळण्याचा पत्राद्वारे केला आग्रह. ''इतर शासकीय एजन्सी'' याचा अर्थ हे धोरण रेल्वेलाही लागू होतो त्यामुळे हा शब्द वगळून टाका, पत्राद्वारे रेल्वेची मागणी. पालिकेच्या होर्डिंग धोरणाच्या एका परिच्छेदात, ''सार्वजनिक प्राधिकरणांच्या जमिनींवर उदा. बांधकाम विभाग, मुंबई पोर्ट ट्रस्ट, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, मुंबई मेट्रो, बेस्ट, मोनो रेल किंवा कोणतीही इतर सरकारी संस्था,'' असे म्हटले आहे. यावर रेल्वेने आक्षेप नोंदवला असून हा शब्द काढून टाकण्याची मागणी केली आहे.

26 Aug 2024, 07:31 वाजता

Breaking News Live Updates : नांदेडमधील काँग्रेस खासदारांचं कालवश 

राजकीय वर्तुळातून ज्येष्ठ नेत्याची एक्झिट. नांदेडच्या काँग्रेस खासदाराचं निधन. खासदार वसंत चव्हाणांचं यांचं निधन. हैदराबादमधील रुग्णालयात सुरू होते उपचार.