LIVE UPDATES: आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल.

LIVE UPDATES: पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता आहे.राज्यात सरासरीच्या पंधरा टक्के अधिक पाऊस पडला असला तरीही विदर्भ, सातारा, नंदूरबार, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आयएएस पूजा खेडकर प्रकरणात रोज नवनवी खुलासे होत आहेत. अशा महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेऊया.

LIVE UPDATES: आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल.

Breaking News: ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाखरी इथला पाहुणचार घेऊन दुपारच्य विसाव्या नंतर पंढरपूरकडे मार्गास्थ होणार आहे.तर, संत तुकाराम महाराजांची पालखी दुपारच्या विसाव्यानंतर वाखरी इथून मार्गस्थ होईल. आज दोन्ही पालख्या पंढरपूरला पोहोचणार आहेत.आयएएस पूजा खेडकर प्रकरणात रोज नवनवी खुलासे होत आहेत. अशा महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेऊया.

16 Jul 2024, 09:01 वाजता

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर भीषण अपघात, मृतांची नावे समोर

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर भीषण अपघात झाला. पुण्याकडे जाणारी खाजगी बस 15 ते 20 फूट खाली कोसळली. घटनास्थळी 10 ते 12 रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. क्रेनच्या मदतीने बस बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मुबंई- पुणे एक्स्प्रेस अपघातामधील मृतांची नावे

1)गुरुनाथ बापू पाटील 
2)रामदास नारायण मुकादम 
3) होसाबाई पाटील 
 तसेच    ट्रॅकटर मधील दोन पुरुषांचे मृतदेह 
सापडले  आहेत. त्यांची  ओळख पटली नाही

16 Jul 2024, 08:12 वाजता

प्रशासनाने आम्हाला विशाळ गडला जाण्यापासून रोखू नये - आमदार सतेज पाटील

विशाळगडावर रविवारी झालेल्या दंगल सदृश्य परिस्थिती नंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांची कोल्हापुरात बैठक झाली. या बैठकीला खासदार शाहू छत्रपती महाराज आमदार सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीचे नेते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी विशालगडावर झालेली घटना ही दुर्दैवी आणि क्लेशदायक असल्याचे म्हटले. संभाजी राजे छत्रपती यांनी प्रशासनासोबत चर्चा करायला हवी होती आणि मगच आंदोलनाचा पवित्रा घेतला पाहिजे होता अस नोंदविले. त्याच बरोबर पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारवर यावेळी सडकून टीका केली. दरम्यान आज इंडिया आघाडीचे सर्व नेते आणि पदाधिकारी गजापूर आणि विशाळगडावर जाणार आहेत. या ठिकाणी जाऊन नुकसानग्रस्त कुटुंबाना भेटून त्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला असल्याचे देखील सतेज पाटील यांनी सांगितले आहे.

16 Jul 2024, 07:57 वाजता

वरळी हिट अँड रन प्रकरणी वरळी पोलीस आज करणार मिहिर शहाला कोर्टात हजर करणार

सहा दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर मिहिर शहाला करणार कोर्टात हजर करणार. पोलीस मिहिर शहाच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत. आत्तपर्यंतच्या तपासाचा लेखाजोखा करणार कोर्टात सादर केला जाणार आहे.

16 Jul 2024, 07:56 वाजता

पुणे पीएमपीएलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास अधिकारांची नापसंती

पुणे पीएमपीएलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास अधिकारांची नापसंती.आठवड्याभरात दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश मात्र दोन्ही अधिकारी पुणे पीएमपीएलबाबत अनुत्सुक दिसत आहेत.पुणे पीएमपीएल मध्ये राजकीय हस्तक्षेप अधिक असल्याने अधिकारी पदावर नियुक्त होण्यास इच्छुक नसल्याची चर्चा आहे. सहा दिवस उलटूनही अद्याप पुणे पीएमपीएल चा पदभार कोणीच स्वीकारलेला नाही.

16 Jul 2024, 07:51 वाजता

दहावी, बारावीच्या जुलै- ऑगस्ट २०२४ ची पुरवणी परीक्षा आजपासून सुरू
 

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात येणार आहेत. दहावीची पुरवणी परीक्षा 30 जुलैपर्यंत, तर बारावीची पुरवणी परीक्षा 8 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली.

16 Jul 2024, 07:23 वाजता

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह कोणाचं? आज होणार सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना दिल्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर  सुनावणी होणार आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात रिप्लाय फाइल करायचा होता त्यांनी अद्यापपर्यंत रिप्लाय फाईल केलेला नाही.