LIVE UPDATES: आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल.

LIVE UPDATES: पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता आहे.राज्यात सरासरीच्या पंधरा टक्के अधिक पाऊस पडला असला तरीही विदर्भ, सातारा, नंदूरबार, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आयएएस पूजा खेडकर प्रकरणात रोज नवनवी खुलासे होत आहेत. अशा महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेऊया.

LIVE UPDATES: आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल.

Breaking News: ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाखरी इथला पाहुणचार घेऊन दुपारच्य विसाव्या नंतर पंढरपूरकडे मार्गास्थ होणार आहे.तर, संत तुकाराम महाराजांची पालखी दुपारच्या विसाव्यानंतर वाखरी इथून मार्गस्थ होईल. आज दोन्ही पालख्या पंढरपूरला पोहोचणार आहेत.आयएएस पूजा खेडकर प्रकरणात रोज नवनवी खुलासे होत आहेत. अशा महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेऊया.

16 Jul 2024, 19:13 वाजता

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल झालेयत...चंद्रभागेच्या पवित्र स्नानासाठी नदीचा तीर गर्दीने फुलून गेलाय...नदीच्या दोन्ही तीरावर स्नानासाठी भाविकांची अक्षरशः झुंबड उडालीये... 
उद्या आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत असताना आज दशमीच्या दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केलीय...चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये विठू नामाचा जयघोष सुरू आहे... ज्ञानेश्वर  महाराजांची पालखी वाखरी इथला पाहुणचार घेऊन अखेर पांडुरंगाच्या भेटीसाठी माऊलींची पालखी पंढरपूरमध्ये दाखल झालीये..

16 Jul 2024, 18:51 वाजता

नवाब मलिक... राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि मुंबईतील अणुशक्तीनगर मतदारसंघाचे आमदार... मात्र आगामी विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याची तयारी मलिकांनी सुरू केल्याचं समजतंय..

16 Jul 2024, 16:12 वाजता

येत्या 18 तारखेपासून राज्यात आरक्षण बचाव यात्रा सुरु करणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. एस सी, एस टी, ओबीसींच्या हक्काची लढाई असून याची सुरुवात दादरच्या चैत्यभूमीपासून होणार असल्याची माहिती प्रकाश आंबडेकर यांनी दिली आहे. आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार गंभीर आहे का असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. 

16 Jul 2024, 15:47 वाजता

राष्ट्रवादीची पक्ष आणि चिन्हाबाबतची पुढील सुनावणी 6 ऑगस्टला होणाराय. अजित पवार यांना दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेयत.

16 Jul 2024, 15:01 वाजता

पूजा खेडकरांच्या नावात विसंगती दिसून येत आहे. 2019 ला त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली होती. त्यावेळी यादीमध्ये त्यांचं नाव खेडेकर पूजा दिलीपराव असं आहे. शिवाय आडनावानं सुरुवात आहे. त्याचप्रमाणे दिलीपराव या नावात इंग्रजी स्पेलिंग DEELIPRAO असं लिहिण्यात आलंय. 2021 च्या यादीत त्यांचं नाव पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं आहे. म्हणजे आडनाव शेवटी आहे. वडिलांच्या नावाआधी मनोरमा आईचं नाव आहे. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे वडिलांच्या नावाचं स्पेलिंग DILIP हे सरळ लिहिण्यात आलंय. आता नावातील हे बदल का करण्यात आले? ते करत असताना आवश्यक प्रक्रिया म्हणजे ऍफिडेविट किंवा कोर्ट ऑर्डर आहे का? असे प्रश्न उपस्थित झालेत. 

16 Jul 2024, 13:29 वाजता

अजित पवार यांना 2 आठवड्यात उत्तर सादर करावे लागणार 

राष्ट्रवादी काँग्रेस बाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. अजित पवार यांना दोन आठवड्यात उत्तर सादर करावे लागणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी सहा ऑगस्टला होणार आहे. 

16 Jul 2024, 13:07 वाजता

ॲड. प्रकाश आंबेडकर आज मोठी घोषणा करणार !

आज मी मोठी घोषणा करणार आहे. यासाठी औरंगाबादमधील सुभेदारी शासकीय विश्रामगृहावर दुपारी 4 पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून दिली आहे.ॲड. आंबेडकर नेमकी काय घोषणा करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा असेल का? राजकारणात मोठी उलथापालथ होणार का? अशी चर्चा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सुरू झाली आहे. त्यामुळे सायंकाळी ॲड. आंबेडकर काय घोषणा करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

16 Jul 2024, 11:41 वाजता

'अतिक्रमण काढण्याचा आदेश दिला असता तर हा प्रकार घडला नसता'

गरजेची वाटत आहे म्हणूनच विशाळ गड पायथ्याला भेट द्यायला निघालो आहे. ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना संरक्षण देण्याचे काम आमचं आहे, ती जबाबदारी आमची असल्याचे छत्रपती शाहू महाराज म्हणाले. शाहूंच्या नगरीत वर्षात दुसऱ्यांदा होणे म्हणजे यात दुसरे काहीतरी षडयंत्र आहे , यात प्रश्न नाही.  यापुढे देखील त्याला तोंड द्यावं लागणार आहे. हे प्रशासनाचे फेल्यूअर  आहे, हे मी कालच सांगितले आहे.अतिक्रमण काढण्याचे आदेश आदेश दिला असता तर हा प्रकार घडला नसता, असेही ते म्हणाले.

16 Jul 2024, 10:12 वाजता

विधानसभा निवडणुकीपूर्वी आदित्य ठाकरे यांचा राज्यव्यापी दौरा

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे आजपासून राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहेत. पक्षाचा पराभव झालेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत आणि उरण मतदारसंघांना ते आज भेट देणार आहेत
आदित्य ठाकरे यांचा दौरा स्थानिक पातळीवरील शिवसैनिकांना मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि या जागांवर पुन्हा विजय मिळवण्या साठी असणारा आहे. आदित्य कर्जत येथे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील आणि नंतर उरण येथेही असेच संवाद सत्र घेणार आहेत.

16 Jul 2024, 09:41 वाजता

पश्चिम महाराष्ट्रात होत असलेल्या पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पातळीत वाढ

पश्चिम महाराष्ट्रात होत असलेल्या पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे.श्रीक्षेत्र नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरात कृष्णा नदीचे पाणी आलंय. काल सायंकाळी कृष्णा नदीचे पाणी दत्त मंदिरात आलं.  असंख्य दत्तभक्तांना दक्षिण द्वार सोहळ्याची प्रतीक्षा होती. कृष्णा नदीचे पाणी मंदिरातील श्री दत्तप्रभूंच्या चरण कमलाला स्पर्श झाल्यास होणार दक्षिण द्वार सोहळा, दत्त भक्तांना दक्षिण द्वार सोहळ्याची प्रतीक्षा