Pune Ganpati Visarjan LIVE : 28 तासांच्या मिरवणुकीचा विक्रम मोडणार?

Ganpati Visarjan in Maharashtra Live Updates: गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आज राज्यात बाप्पाला मनोभावे निरोप देण्यात येणार आहेत. 

Pune Ganpati Visarjan LIVE : 28 तासांच्या मिरवणुकीचा विक्रम मोडणार?

Ganpati Visarjan 2024 in Maharashtra Live Updates: लाडका बाप्पा आज निरोप घेणार आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये आज जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. मुंबईप्रमाणेच पुण्यातही बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकींना मोठी गर्दी असते. पुण्यातील दगडुशेठ हलवाई गणपती आणि मानाच्या पाच गणपतींची आज मोठ्या जल्लोषात विसर्जन मिरवणुक निघणार आहे. तसंच, नागपूरसह राज्यातील इतर जिल्ह्यातही विसर्जन मिरवणुकांचा उत्साह पाहायला मिळणार आहे. 

18 Sep 2024, 08:03 वाजता

28 तासांच्या मिरवणुकीचा विक्रम मोडणार?

मानाच्या पाच गणपतीसह अलका चौकातून 86 मंडळे विसर्जनासाठी रवाना झाली आहेत. पुण्यात 21 तासाहून अधिक वेळ मिरवणूक सुरू आहे. गेल्या वर्षी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मिरवणूक संपली होती. मागील वर्षी जवळपास 28 तास मिरवणूक चालली होती. यावर्षी मिरवणूक कधी संपते या कडे लक्ष लागलं आहे.

 

18 Sep 2024, 07:50 वाजता

भाऊसाहेब रंगारी गणपती अलका चौकात

भारतामधील पहिला सार्वजनिक गणपती भाऊसाहेब रंगारी अलका चौकात दाखल. काही वेळात भाऊ रंगारी गणपतीचे होणार विसर्जन!

17 Sep 2024, 22:00 वाजता

पुण्यातील मानाच्या गणपतींचं विसर्जन...भाविकांकडून उत्साहात गणरायाला निरोप..पांचाळेश्वर मंदिरात विधीवत पूजा आणि आरती करून दगडूशेठ गणपतीचंही विसर्जन 

17 Sep 2024, 20:29 वाजता

पुण्याचा मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीचे विसर्जन 

17 Sep 2024, 17:07 वाजता

पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीचं विसर्जन  

17 Sep 2024, 16:12 वाजता

नाशिकच्या गोदा घाट परिसरामध्ये गणेश विसर्जनाला सुरुवात 

नाशिकच्या गोदा घाट परिसरामध्ये गणरायाची विसर्जन होण्यास सुरुवात झाली.नाशिक महानगरपालिकेतर्फे शहरात 29 ठिकाणी 56 पेक्षा जास्त कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत आणि गोदावरी नदी पात्रात गणरायाला विसर्जित करण्यात ऐवजी येऊ द्या आणि देव पण घ्या अशा पद्धतीचा आवाहमहानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. अनेक महाविद्या तर्फे गोदा घाट परिसरामध्ये 1400 पेक्ष्या जास्त सेवम सेवक सहभागी झाले आहे.देवघे द्या आणि देव पण घ्या अशा पद्धतीचा आवाहन या विद्यार्थ्यांकडून करण्यात आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

17 Sep 2024, 15:38 वाजता

गणरायाच्या विसर्जनाला जोरदार सुरुवात 

अकरा दिवसाच्या उत्सवानंतर आता गणरायाच्या विसर्जनाला  जोरदार सुरू झाली आहे. नाशिकच्या जुने नाशिक परिसरातील वाकडी बारव येथून दादा भुसे यांच्या उपस्थितीत पहिल्या मानाच्या गणपतीचे पूजा करून मिरवणुकीला सुरुवात झाली आहे... यात 21 चित्ररत असून ढोल ताशाच्या गजरात ही मिरवणूक निघालेली आहे.. यावर्षी मिरवणुकीमध्ये डीजेच्या दणदणात असला तरी एलईडी लाईट ला शंभर टक्के बंदी घालण्यात आली आहे.

17 Sep 2024, 15:00 वाजता

21 चित्ररत असून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक 

अकरा दिवसाच्या उत्सवानंतर आता गणरायाच्या विसर्जनाला  जोरदार सुरू झाली आहे. नाशिकच्या जुने नाशिक परिसरातील वाकडी बारव येथून दादा भुसे यांच्या उपस्थितीत पहिल्या मानाच्या गणपतीचे पूजा करून मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.यात 21 चित्ररत असून ढोल ताशाच्या गजरात ही मिरवणूक निघालेली आहे.. यावर्षी मिरवणुकीमध्ये डीजेच्या दणदणात असला तरी एलईडी लाईट ला शंभर टक्के बंदी घालण्यात आली आहे.

17 Sep 2024, 14:05 वाजता

Ganapati Visarjan Celebration Live Updates: कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत महालक्ष्मी अवतरली

कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत महालक्ष्मी अवतरली आहे. दत्ताजीराव काशीद तरुण मंडळाचे कार्यकर्ते बाळा जाधव यांनी महालक्ष्मीचे रूप साकारलंय.

17 Sep 2024, 14:04 वाजता

Ganapati Visarjan Celebration Live Updates: मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीसमोर तृतीयपंथीयांचे वादन

पुण्यात नामांकित ढोल ताशा पथक वादन करत असतात. परंतु आजच्या विसर्जन मिरवणुकीत तृतीय पंथीयांचे ढोल ताशा पथक लक्ष वेधत आहे. शिखंडी ढोल ताशा पथक असे तृतीयपंथीयांचे पथक आहे. मानाच्या तिसरा गणपती गुरुजी तालीम ला हे तृतीयपंथी वादन करत आहेत.