Pune Ganpati Visarjan LIVE : 28 तासांच्या मिरवणुकीचा विक्रम मोडणार?

Ganpati Visarjan in Maharashtra Live Updates: गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आज राज्यात बाप्पाला मनोभावे निरोप देण्यात येणार आहेत. 

Pune Ganpati Visarjan LIVE : 28 तासांच्या मिरवणुकीचा विक्रम मोडणार?

Ganpati Visarjan 2024 in Maharashtra Live Updates: लाडका बाप्पा आज निरोप घेणार आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये आज जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. मुंबईप्रमाणेच पुण्यातही बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकींना मोठी गर्दी असते. पुण्यातील दगडुशेठ हलवाई गणपती आणि मानाच्या पाच गणपतींची आज मोठ्या जल्लोषात विसर्जन मिरवणुक निघणार आहे. तसंच, नागपूरसह राज्यातील इतर जिल्ह्यातही विसर्जन मिरवणुकांचा उत्साह पाहायला मिळणार आहे. 

17 Sep 2024, 08:03 वाजता

Ganapati Visarjan Celebration Live Updates: पुण्याचा तिसरा मानाचा गणपती राजा गुरुजी तालीम; सुर्यरथातुन मिरवणुकीसाठी सज्ज

पुण्याचा राजाची सुर्यरथातुन मिरवणुक निघणार असुन सुर्यरथ आकर्षक फुलमाळांनी सजविण्यात आला असुन रांगोळीच्या पायघड्या आणि गुलालाची उधळण करत गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीला काहीच वेळात सुरुवात होणार असुन यामध्ये गुलालाची उधळण मुख्य आकर्षण रहाणार

17 Sep 2024, 08:02 वाजता

Ganapati Visarjan Celebration Live Updates: बारामतीत तृतीयपंथीयांच्या हस्ते श्री गणेशाची आरती

 बारामती शहरातील विजयनगर युवा प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाच्या वतीने तृतीयपंथीयांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली आहे. तृतीयपंथीयांनाही समाजात समानतेची वागणूक मिळावी. यासाठी मंडळाच्या वतीने तृतीय पंथीयांचा आरतीचा सन्मान देऊन त्यांचा अनोखा सन्मान करण्यात आला आहे.

17 Sep 2024, 07:36 वाजता

Ganapati Visarjan Celebration Live Updates: कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी 

कोल्हापुरात देखील गणेश विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मिरजकर तिकटी, महाद्वार रोड या पारंपारिक मुख्य मिरवणूक मार्गासह सार्वजनिक मंडळासाठी तीन मार्ग तयार करण्यात आले आहेत. शहरातील इराणी खाणीतच गणेश विसर्जन केले जाणार आहे, पंचगंगा नदीत सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन होऊ नये यासाठी महानगरपालिकेने नदी घाट कडे जाणारा रस्ता बॅरॅकेट्स लावून आडवीले आहेत 

17 Sep 2024, 07:34 वाजता

Ganapati Visarjan Celebration Live Updates: पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी तगडा पोलिस बंदोबस्त

पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. 

17 Sep 2024, 07:34 वाजता

Ganapati Visarjan Celebration Live Updates: पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त 17 रस्ते वाहतुकीस बंद 

वैभवशाली परंपरा असलेल्या विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे तर शहरातील प्रमुख 17 मार्गावरील वाहतूक विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत बंद असणार आहे. शहरात 48 तास अवजड वाहनांना ही बंदी असणार आहे.

17 Sep 2024, 07:18 वाजता

Ganapati Visarjan Celebration Live Updates: पाच मानाच्या गणपतींची मिरवणूक दहा वाजता 

पुण्यातील पाच मानाचे गणपती म्हणजेच कसबा पेठ, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा गणपती यांची मिरवणूक सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सुरू होणार आहे.