Loksabha Election 2024 :मुंबईत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मतदानावेळी मृत्यू

Maharashtra Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीतील आज पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील 13 मतदारसंघात मतदान होणार असून हा शेवटचा टप्पा आहे. यानंतर महाराष्ट्राला प्रतीक्षा असेल ती 4 जूनच्या निकालाची. 

Loksabha Election 2024 :मुंबईत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मतदानावेळी मृत्यू

Maharashtra Loksabha Nkivadnuk 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे. देशातील 49 जांगासह महाराष्ट्रातील 13 मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील अंतिम टप्प्या असून नाशिक, धुळे, दिंडोरी, पालघर, ठाणे, कल्याण, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या मतदारसंघाचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. 

20 May 2024, 20:31 वाजता

मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. 62 वर्षीय मनोहर नलगे यांचा मृत्यू झाला आहे.  लोअर परळ इथल्या पोलिंग बुथवर ही घटना घडली. उष्माघातामुळे शिवसैनिकाचा मृत्यू झाल्याची ्प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

20 May 2024, 20:26 वाजता

  देशात सायंकाळी वाजेपर्यंत 56.68 टक्के तर राज्यात 48.88 टक्के मतदान झाले. मतदानासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र मतदानाचा वेग मंदावल्यानं मतदारांनी नाराजी व्यक्त केली. 

20 May 2024, 17:59 वाजता

Loksabha Election: देशभरात संध्याकाळी 5 पर्यंत 48.66 टक्के मतदान, जम्मू-काश्मीरपेक्षाही राज्यात कमी मतदान 

महाराष्ट्रात सरासरी - 48.66
भिवंडी - 48.89
धुळे - 48.81
दिंडोरी - 57.06
कल्याण - 41.70
उत्तर मुंबई - 46.91
उत्तर-मध्य मुंबई - 47.32
उत्तर-पूर्व मुंबई - 48.67
उत्तर-पश्चिम मुंबई - 49.79
दक्षिण मुंबई - 44.22
दक्षिण-मध्य मुंबई - 48.26
नाशिक - 51.16
पालघर - 54.32
ठाणे - 45.38

20 May 2024, 17:58 वाजता

Loksabha Election: संध्याकाळी 6 पर्यंत जे मतदार रांगेत उभे आहेत त्यांना मतदान करु दिले जाणार

सायंकाळी 6.00 वाजता जे मतदार मतदानासाठी रांगेत उभे असतील त्यांना मतदान करु दिले जाणार आहे. या वेळेपर्यंत रांगेत उभे असलेल्या सर्व मतदारांचे मतदान पूर्ण होईपर्यंत मतदान केंद्राचे कामकाज सुरू राहील, अशी सूचना मा. निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

20 May 2024, 17:56 वाजता

पालघर मध्ये बोगस मतदान झाल्याचा उघड; पालघर मधील आर्यन शाळेतील मतदान केंद्रावर घडली घटना

20 May 2024, 17:12 वाजता

Loksabha Election Live Update: कल्याण लोकसभेतील मतदान केंद्रांवर जाऊन मुख्यमंत्री घेतायत आढावा

कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या भेट देत आहेत. डोंबिवली शहरातील मतदान केंद्रांवर ठिकठिकाणी जाऊन मतदानाची व्यवस्था पुरेशी आहे का? मतदारांना काही त्रास होतोय का या संबंधीचा सगळा आढावा मुख्यमंत्र्यांकडून घेतला जातोय.

20 May 2024, 16:14 वाजता

Loksabha Election Live Update: कितीही वाजले तरी मतदान चुकवू नका, उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मतदारांचे हाल, मतदान केंद्रांमध्ये मुद्दाम विलंब केला जातोय, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. 

20 May 2024, 15:43 वाजता

Lok Sabha Election 2024: कल्याण लोकसभा, भिवंडी लोकसभा दुपारी  3 वाजेपर्यत मतदान आकडेवारी

दुपारी ३ वाजेपर्यंत भिवंडी लोकसभेत ३७. ६ टक्के मतदान तर, कल्याण लोकसभेत ३२.४३टक्के मतदान

20 May 2024, 15:11 वाजता

Live Blog Election 2024: राज्यात तीन वाजेपर्यंत 38.77 टक्के मतदान

 

20 May 2024, 15:06 वाजता

दक्षिण मुंबईतील ताडदेवच्या एमपी मिल कंपाऊड इथल्या मतदान केंद्रावर गोंधळ

मशालीचे बटण दाबले तरी व्हीव्हीपॅटला मशालीऐवजी इंग्रजी एल अक्षर दिसत असल्याचा ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा दावा. मतदान केंद्रातील अधिका-यांच्या निदर्शनास ही बाब आणूनही ते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप