'मनोज जरांगेंनी उमेदवार दिले असते तर....' शरद पवारांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Shaad Pawar On Manoj Jarange:  मराठा समाज निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे मनोज जरांगे यांनी सष्ट केले आहे. यानंतर शरद पवार काय बोलतायत? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. 

प्रविण दाभोळकर | Updated: Nov 4, 2024, 04:07 PM IST
'मनोज जरांगेंनी उमेदवार दिले असते तर....' शरद पवारांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...
शरद पवार

Shaad Pawar On Manoj Jarange: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपली आहे. त्यामुळे विधानसभेच्या रणांगणाला सुरुवात झाली आहे. पुढचे 12 दिवस महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापलेले दिसणार आहे. मराठा समाज निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली होती. मनोज जरांगे यांच्यावर शरद पवारांचा वरदसहस्त असल्याची टीका भाजप नेत्यांकडून केली जात होती. दरम्यान मराठा समाज निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे मनोज जरांगे यांनी सष्ट केले आहे. यानंतर शरद पवार काय बोलतायत? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. आता शरद पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

काय म्हणाले शरद पवार?

मनोज जरांगे यांनी आपले उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला. मला आनंद आहे. त्यांनी हा निर्णय घेतला, असे शरद पवार म्हणाले. भाजप हाच आमचा विरोधक आहे, असे जरांगे सातत्याने म्हणत आले आहेत. उमेदवार दिले असते तर त्याचा जास्त लाभ भाजपला झाला असता. या पार्श्वभूमीवर जरांगेंचा निर्णय योग्य असल्याचे शरद पवार म्हणाले.

...म्हणून निवडणूक लढणार नाही

विधानसभा निवडणुकीमधून माघार घेण्याची आजचा (4 नोव्हेंबर) शेवटचा दिवस आहे. एकीकडे बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे सर्वच पक्ष कसून या निवडणुकीच्या प्रचारासाठी तयारी करत आहेत. असं असतानाच मनोज जरांगे यांनी कोणत्या मतदारसंघातून कोणाला संधी दिली जाणार आहे, हे जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी या निवडणुकीमधून सपशेल माघार घेतली आहे. आपण निवडणुकीतून का माघार घेत आहोत हे सांगताना, "एका जातीवर लढणे आणि जिंकणे शक्य नाही," असं जरांगेंनी समर्थकांना सांगितलं आहे. तसेच पुढे बोलताना जरांगेंनी, 'मराठा बांधवांनी त्यांचे सर्व अर्ज मागे घ्यावेत, एकही अर्ज ठेवू नका," असं जरांगेंनी म्हटलं आहे. "आपल्याला आता निवडणूक लढायची नाही," असं जरांगेंनी जाहीर केलं आहे. "मित्र पक्षांनी यादी न पाठवल्याने आपण माघार घेत आहोत," असं जरांगेंनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

शरद पवारांनी केलं निवडणूक आयोगाचं कौतुक! काय झालंय नेमकं?

मतदारसंघ ठरलेले...

दरम्यान, जरांगेंनी मतदारसंघ ठरले होते मात्र उमेदवार ठरले नव्हते असं म्हटलं आहे. "मतदारसंघ ठरले होते. फक्त नावं ठरायची होती. ही माघार नाही गनिमी कावा आहे," असं जरांगे म्हणाले. तसेच "समाजाची आठवण येत असताना रविवारी बोलताना डोळ्यात पाणी येत होतं," असंही जरांगेंनी सांगितलं.

पाडापाडीची भूमिका नसल्याचं स्पष्टीकरण

"याला पाडा आणि त्याला पाडा ही आपली भूमिका नाही," असंही जरांगेंनी यावेळेस स्पष्ट केलं आहे. "कुणालाही पाडा आणि कुणालाही निवडून आणा," असं जरांगेंनी म्हटलं आहे. यापूर्वी रविवारी पत्रकारांशी बोलताना, जिथे उमेदवार द्यायचा नाही त्या मतदारसंघात उमेदवार पाडला जाणार असा निर्धार व्यक्त केलेला. उमेदवार पाडण्याचा निर्धार ज्या मतदारसंघांसाठी करण्यात आला होता त्यामध्ये संभाजीनगरमधील गंगापूर, हिंगोलीमधील कळमनुरी आणि जालन्यातील भोकरदन मतदारसंघांचा समावेश होता. मात्र आता जरांगेंनी, "मी कुणाला पाडा, कुणाला निवडून आणा असं काहीही सांगत नाही," असं जरांगेंनी म्हटलं आहे.

'राज ठाकरेंनी भेट नाकारली, विषय संपला; मी निवडणूक लढवणारच!'- सदा सरवणकर 

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More