Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. महाराष्ट्र निवनिर्माण सेना देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात सभांचा धडाका लावला आहे. अशात मुंबईतील एका जाहीर सभेत राज ठाकरे यांनी एका अत्यंत संवेदनशील विषयावर भाष्य केले आहे. मुंबईतील हिंदूची संख्या 49 टक्क्यांच्या खाली येणार असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.
मुस्लिम धर्मगुरू सज्जाद नोमाणी यांच्या ऑल इंडिया एकता मंचने राज्यात 269 ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. फेसबुक पोस्ट द्वारे त्यांनी ही घोषणा केली आहे. यानंतर राज ठाकरे यांनी टीका केली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मोठा दावा केला आहे.
महाराष्ट्रात राहणारे अनेक मराठी मुस्लिम महाराष्ट्राला मानणारे आहेत. मात्र, बाहेरच्या देशातून आलेले मुस्लिमांना मतांसाठी सुरक्षित केले जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. बांगलादेशातून आलेले जास्तीत जास्त मुस्लिम आणि म्यानमार मधून आललेे रोहिंगे यांचे भविष्यातील प्रमाण येत्या 10 ते 15 वर्षात एवढं वाढणार आहे की मुंबईतील हिंदू 49 टक्के पेक्षा खाली येणार आणि यांचे प्रमाण 52 टक्क्यांच्या वर जाणार असा दावा राज ठाकरे यांनी एका सर्व्हेंचा दाखला देत केला आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार यांना मदत करत आहेत. यांचे आधारकार्ड, मतदान नोंदणी कार्ड काढले जात आहे.
अणुशक्ती नगर, चेंबुर भागात अणुशक्ती केंद्र आहे. येथे बेसावध राहिलो तर मोठी किंमत मोजावी लागेल राज ठाकरे यांचा इशारा. आपल्या देशात अनेक छुप्या गोष्टी सुरु आहेत. आपण याकडे फार लक्ष देत नाही. 1993 चा बॉम्ब स्फोटात काय झाले? का कटात कुणी मदत केली? असे अनेक प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले. स्वत: च्या धर्मापलिकडे हे काहीच पाहत नाहीत. जगभर या गोष्टी सुरु आहेत. हिंदूनी हे लक्षात घेतले पाहिजे असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.