Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि निर्णायक टप्प्याचं मतदान पार पाडलं. यानंतर आता चौथ्या टप्प्याच्या निवडणूकांच्या प्रचाराकडे मोर्चा वळणार आहे.
8 May 2024, 11:29 वाजता
रुपाली चाकणकरांनी रोहित पवारांवर साधला निशाणा
रोहित पवारांवर निवडणूक आयोगाने लक्ष ठेवावं असं वक्तव्य रुपाली चाकणकरांनी गेलंय. गेल्या एक ते दीड महिन्यांपासून रोहित पवार ज्या प्रकारे ट्विट करतायत, ज्या प्रकारे विधानं करतायत त्यातून जनतेत संभ्रम निर्माण होत असल्याचा आरोप चाकणकरांनी केलाय. रोहित पवारांची भावना ही नैराश्याची असून त्यांचा कुठेही विजय होणार नाही असं म्हणत रुपाली चाकणकरांनी रोहित पवारांवर निशाणा साधलाय.
8 May 2024, 10:59 वाजता
राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी सक्रीय झाल्यानंतर मनसेविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय.. झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत बिनशर्त पाठिंब्यावरून आदित्य ठाकरेंनी मनसेवर निशाणा साधला.. मुंबईत मराठी माणसाला विरोध करणाऱ्या गुजरातींना मनसेचा बिनशर्त पाठिंबा आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. उत्तर भारतीयांना मारहाण करणा-या मनसेचा पाठिंबा भाजपला चालतो का? अशी विचारणाही त्यांनी भाजपला केली.
8 May 2024, 10:19 वाजता
Exclusive : महायुतीला 'बिनशर्त' पाठिंबा देण्यावरून राज ठाकरेंवर आदित्य ठाकरेंचा घणाघात; म्हणाले, भाजपला...
काय म्हणाले आदित्य ठाकरे? पाहा सविस्तर बातमी... - पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पवारांच्या विधानाने खळबळ; म्हणाले, 'काँग्रेस आणि आमच्या..'
8 May 2024, 09:52 वाजता
पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पवारांच्या विधानाने खळबळ; म्हणाले, 'काँग्रेस आणि आमच्या..'
महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वेगळ्याच चर्चांना सुरुवात झाली आहे. शरद पवारांनी राजकीय भवितव्यासंदर्भात केलेल्या एका मोठ्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात भविष्यात मोठा भुकंप होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा काँग्रेसमध्ये विलिन होऊ शकतो अशा चर्चा पवारांच्या या विधानामुळे जोर धरु लागल्या आहेत. बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
8 May 2024, 09:10 वाजता
बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान संपताच पुण्यातील वारजे परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. मंगळवारी रात्री उशिराने ही घटना घडली. आरोपींनी हवेत गोळीबार केला असून, गोळीबारामागचे कारण समजू शकले नाही. गोळीबार करणारे आरोपी कात्रजच्या दिशेने पसार झाले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
8 May 2024, 08:30 वाजता
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहोचलाय. आज शिरूरमध्ये अमोल कोल्हेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची सभा होणार आहे. अहमदनगरमध्येही पवारांची सभा होणार आहे.. तर संजय वाघेरेंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे सांगवीत सभा घेणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीसांच्याही आज नंदुरबार आणि अहमदनगरमध्ये सभा होणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संगमनेरमध्ये सभा घेणार आहेत. श्रीगोंदा आणि अहमदनगरमध्ये खासदार संजय राऊत मविआच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगेंच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर बीडमध्ये सभा घेणार आहेत.
8 May 2024, 07:48 वाजता
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिरपूरमध्ये असून सकाळी 9:30 वाजता त्यांची सभा संपन्न होणार आहे.
8 May 2024, 07:21 वाजता
शरद पवार यांच्या आज 4 सभा
शरद पवार पुन्हा एकदा उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय झालेत. तब्येत बरी नसल्याकारणाने त्यांनी त्यांचा एक दिवसाचा दौरा रद्द केला होता, मात्र आज शरद पवारांच्या आज चार सभा होणार आहेत. सकाळी 11 वाजता श्रीगोंदामध्ये मविआच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी संजय राऊत आणि शरद पवारांची सभा होणार आहे. त्यानंतर शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हेच्या प्रचारासाठी शरद पवार यांची दुपारी २ वाजता शिरूर शहरातील पाचकंदील चौकात जाहीर सभा होणार आहे. तर संध्याकाळी पाच वाजता अहमदनगर इथे शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांची जाहीर सभा होणारेय. तर ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यासाठी उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सह दिग्गज नेत्यांची सभा संध्याकाळी सांगवीतल्या pwd मैदानात होणार आहे.