Loksabha Election 2024 Live Updates:उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारी

Loksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी म्हणजेच 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रात बऱ्याच राजकीय घडामोडी घडणार आहेत. त्यापैकी प्रामुख्याने उल्लेख करायचा झाल्यास आज सांगलीमध्ये काँग्रेसचा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दुसरीकडे पुण्यात शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील अनेक उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याच घडामोडींचा आढावा आपण या लाइव्ह ब्लॉगमधून घेऊयात...

Loksabha Election 2024 Live Updates:उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारी

Loksabha Election 2024 Live Updates: राज्यात आज अनेक राजकीय घडामोडी घडणार आहेत. प्रचारसभा, रॅली, रोड शोंबरोबरच अनेक उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पुण्यामध्ये आज शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. या आणि अशा अनेक घडामोडींवर आपण लाईव्ह ब्लॉगमधून नजर टाकणार आहोत... चला तर पाहूयात काय काय घडतंय आज राज्यातील राजकारणामध्ये

26 Apr 2024, 14:43 वाजता

अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी ३१.०५ टक्के मतदान पार पडले. लोकसभा मतदारसंघनिहाय मतदान- 
05 बुलडाणा -29.7 %, 06- अकोला -33.25%, 07- अमरावती -31.41 %, 14- यवतमाळ-वाशिम 31.47 %.

25 Apr 2024, 19:16 वाजता

उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. 

25 Apr 2024, 18:39 वाजता

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करु, पीक विम्याचे निकष बदलणारेः ठाकरे गटाच्या वचननाम्यात आश्वासन

25 Apr 2024, 18:38 वाजता

उद्धव ठाकरेंनी प्रसिद्द केला जाहीरनामा

उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपाला पराभव दिसायला लागला आहे, त्यामुळे राम राम बोलायला सुरुवात केली आहे. भाजपाच्या मनातील पाशवी इच्छा समोर आली आहे, त्यांना लोकशही मारुन टाकायचीही आहे अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. 

25 Apr 2024, 18:35 वाजता

आम्ही महाराष्ट्राचे वैभव परत आणून देऊ; उद्धव ठाकरे

25 Apr 2024, 18:34 वाजता

लोकसभा निवडणूक 2024 साठी शिवसेना ठाकरे गटाकडून वचननामा जाहीर 

 

25 Apr 2024, 18:24 वाजता

सध्या भाजपची अवस्था विचित्र झालीयेः उद्धव ठाकरेंची टीका

25 Apr 2024, 17:57 वाजता

सावध रहा, नाहीतर ते फोटो व्हायरल करेन; आमदार सतेज पाटलांचा खासदार संजय मंडलिकांना इशारा

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्याबद्दल महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक वारंवार वक्तव्य करत आहेत. त्यामुळे काँग्रेस आमदार माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी खासदार संजय मंडलिक यांना थेट इशारा दिला आहे. तुम्ही 2019 साली निवडणुकीला उभे होता. त्यावेळी तुम्ही शाहू महाराजांकडे येऊन त्यांच्या पायाही पडला होता. ते फोटो अजूनही माझ्याकडे आहेत. वारंवार शाहू घराण्यावर बोलाल तर ते फोटो व्हायरल होतील, असा इशारा सतेज पाटलांनी दिला आहे.

25 Apr 2024, 17:54 वाजता

मी राष्ट्रवादीचा राजीनामा दिलाय, त्यामुळं भाजपचा प्रचार करण्यास मोकळा; खडसेंचे मोठे वक्तव्य

मी रक्षा खडसेंना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. मात्र मी अद्यापही भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला नाही. दोघे उमेदवारांना शुभेच्छा देतो अधिकाधिक मताधिक्याने दोन्ही नेते निवडून यावेत यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असं एकनाख खडसे यांनी म्हटलं आहे.

25 Apr 2024, 17:52 वाजता

उपमुख्यमंत्र्यांनीच तोडले वाहतूकीचे नियम;जिल्हधिकारी कार्यालयाच्या चौकातून अजित पवार यांचा ताफा उलट्या दिशेने

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच आज वाहतूकीचे नियम तोडल्याचे समोर आले. चक्क जिल्हधिकारी कार्यालच्या चौकातून अजित पवार यांचा ताफा उलट्या दिशेने रवाना झाला.