Loksabha Election 2024 Live Updates:उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारी

Loksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी म्हणजेच 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रात बऱ्याच राजकीय घडामोडी घडणार आहेत. त्यापैकी प्रामुख्याने उल्लेख करायचा झाल्यास आज सांगलीमध्ये काँग्रेसचा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दुसरीकडे पुण्यात शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील अनेक उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याच घडामोडींचा आढावा आपण या लाइव्ह ब्लॉगमधून घेऊयात...

Loksabha Election 2024 Live Updates:उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारी

Loksabha Election 2024 Live Updates: राज्यात आज अनेक राजकीय घडामोडी घडणार आहेत. प्रचारसभा, रॅली, रोड शोंबरोबरच अनेक उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पुण्यामध्ये आज शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. या आणि अशा अनेक घडामोडींवर आपण लाईव्ह ब्लॉगमधून नजर टाकणार आहोत... चला तर पाहूयात काय काय घडतंय आज राज्यातील राजकारणामध्ये

25 Apr 2024, 08:44 वाजता

चौथ्या टप्प्यातील अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग

25 Apr 2024, 08:42 वाजता

पाडवी भरणार उमेदवारी अर्ज; करणार शक्तीप्रदर्शन

नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी ते मोठे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. मात्र यावेळी काँग्रेसचा कोणताही मोठा नेता त्यांच्यासोबत उपस्थित राहणार नाही अशी माहिती मिळत आहे. काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते आज सांगलीमधील पक्ष मेळाव्याला हजेरी लावणार आहेत.

 

25 Apr 2024, 08:40 वाजता

3 दिवसात मोदी घेणार 7 सभा

राज्यात आज वेगवेगळ्या ठिकाणी सर्वपक्षीय नेत्यांच्या सभांचा, प्रचाराचा धडाका सुरु राहणार आहे. मात्र त्यात सर्वात उठून दिसणारी बाब म्हणजे पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्रात होणाऱ्या सभा. मोदींनी महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला आहे. चंद्रपूर, रामटेक, वर्धा, नांदेड, परभणीत मोदींनी सभा घेतल्या आहेत. आता पुढील 3 दिवसांत मोदी महाराष्ट्रात 7 सभा घेणार आहेत.

 

25 Apr 2024, 08:38 वाजता

अनेक उमेदवार भरणार अर्ज

पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, शिरुर-आंबेगावचे महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. आज रक्षा खडसे, स्मिता वाघ, भुमरे, पाडवीसुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

25 Apr 2024, 08:30 वाजता

काँग्रेस विशाल पाटलांवर कारवाई करणार का?

विशाल पाटलांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर आज सांगलीमध्ये काँग्रेसचा मेळावा होणार आहे. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. विशाल पाटलांवर कारवाई करण्याबाबत चर्चेची शक्यता व्यक्त केली जात आहे.