Loksabha Election 2024 Live Updates: राज्यात आज अनेक राजकीय घडामोडी घडणार आहेत. प्रचारसभा, रॅली, रोड शोंबरोबरच अनेक उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पुण्यामध्ये आज शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. या आणि अशा अनेक घडामोडींवर आपण लाईव्ह ब्लॉगमधून नजर टाकणार आहोत... चला तर पाहूयात काय काय घडतंय आज राज्यातील राजकारणामध्ये
25 Apr 2024, 17:27 वाजता
आढळराव पाटील डमी उमेदवार; डॉ. अमोल कोल्हे यांनी लगावला टोला
आज विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरला गेला. पण उमेदवारी अर्ज भरायला मुख्यमंत्री आलेच नाहीत. मी डमी उमेदवार म्हणतो ते उगाच नाही, असा टोला लगावत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर पुन्हा निशाणा साधला
25 Apr 2024, 17:26 वाजता
28 एप्रिलला रत्नागिरीत हाय व्होल्टेज सभा, एकाच दिवशी मनसे आणि उद्धव ठाकरे गटाची सभा
नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसेची जाहीर सभा होणार. सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा येण्याची शक्यता
25 Apr 2024, 16:41 वाजता
बैलाचा अपमान करू नका; संजय राऊतांचे नाव घेत फडणवीसांचा टोला
25 Apr 2024, 16:28 वाजता
आम्ही काय अतिरेकी, नक्षलवादी, दरोडेखोर आहोत काय?, राजू शेट्टींचा सवाल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा कोल्हापूर दौऱ्यावर येतात..तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना नोटीसा काढल्या जातात, असं म्हणत राजू शेट्टींनी संताप व्यक्त केला आहे. आम्ही अतिरेकी, नक्षलवादी का, दरोडेखोर आहोत काय असा संतप्त सवाल राजू शेट्टी यांनी विचारला आहे.
25 Apr 2024, 16:22 वाजता
अहमदनगरमधील वंचितमध्ये उभी फूट; पदाधिकाऱ्यांना डावलून ओबीसी महासंघाच्या उमेदवाराला उमेदवारी दिल्याने नाराजी
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना डावलून ओबीसी महासंघाच्या उमेदवाराला ऐनवेळी वंचितची उमेदवारी दिल्याने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नाराज. ओबीसी बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीने युती करून दिलीप खेडकर यांना उमेदवारी जाहीर. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन्ही गट आमने-सामने
25 Apr 2024, 16:11 वाजता
...म्हणून काळजी वाटते; जयंत पाटलांचा भुजबळांना टोला
छगन भुजबळ यांची अवहेलना होत असल्याने काळजी वाटत आहे, असा टोला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे.
Jayant Patil On Chhagan Bhujbal | 'भुजबळांची अवहेलना होत असल्याने काळजी वाटतेय'; पाटलांचा टोला#jayantpatil #chhaganbhujbal #loksabhaelection2024 #uddhavthackeray pic.twitter.com/EWcElXWi64
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 25, 2024
25 Apr 2024, 14:41 वाजता
...म्हणून पंकजा शेवटची निवडणूक म्हणाल्या असतील; वडेट्टीवार यांचा टोला
सरकारविरोधी वातावरणामुळे पंकजा मुंडेंना भिती वाटत असून म्हणूनच त्या ही शेवटची निवडणूक म्हणाल्या असतील, असा टोला विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
Vijay Wadettiwar On Pankaja Munde | ...;म्हणूनच शेवटची निवडणूक म्हणाल्या असतील' वडेट्टीवारांची टीका #vijaywadettiwar #pankajamunde #loksabhaelection2024 #maharashtrapolitics pic.twitter.com/lwyR5iFcdP
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 25, 2024
25 Apr 2024, 14:39 वाजता
'टीका करण्यापेक्षा विकासावर बोला'; मुंडेंच्या टीकेवर पलटवार
Bajrang Sonawane On Pankaja Munde | 'टीका करण्यापेक्षा विकासावर बोला'; मुंडेंच्या टीकेवर पलटवार #bajrangsonawane #pankajamunde #loksabhaelection2024 #maharashtrapolitics pic.twitter.com/MkvrOwx8hR
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 25, 2024
25 Apr 2024, 13:51 वाजता
रमेश बारसकर यांच्यासठी माढ्यात प्रकाश आंबेडकरांच्या 6 सभा होणार
Madha Loksabha | Ramesh Baraskar यांच्यासाठी माढ्यात Prakash Ambdekar यांच्या 6 सभा होणार #vanchit_bahujan_aaghadi #prakashambedkar #madha #loksabhaelection2024 pic.twitter.com/BhvAqAI8G7
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 25, 2024
25 Apr 2024, 12:52 वाजता
केंद्रीय निवडणूक आयोगाची मोदी-राहुल गांधींना नोटीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कथित आचारसंहितेच्या उल्लंघनाची केंद्रीय निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी धर्म, जात, समुदाय किंवा भाषेच्या आधारे द्वेष आणि फूट पाडल्याचा आरोप केला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर मागितले आहे.