Maharashtra Breaking News : मनसेची पाचवी यादी जाहीर, 15 जणांना उमेदवारी

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घ्या.

Maharashtra Breaking News : मनसेची पाचवी यादी जाहीर, 15 जणांना उमेदवारी

26 Oct 2024, 14:04 वाजता

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : बच्चू कडूंना भाजपचा धक्का

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांना भाजपचा जोरदार धक्का. प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे करणार भाजपमध्ये प्रवेश, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप नेते संजय कुटे यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश. 

26 Oct 2024, 12:07 वाजता

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : सायन मतदार संघावरुन काँग्रेसमध्ये नाराजी

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून 23 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. मात्र सायन मतदार संघावरुन काँग्रेसविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसकडून गणेश यादव यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे उमेदवारी न मिळाल्यानं रवी राजा नाराज झाले आहेत. रवी राजा काँग्रेसचा हात सोडण्याच्या तयारीत आहे. 

26 Oct 2024, 11:57 वाजता

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर 

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने यापूर्वी पहिल्या यादीतून 48 उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर आज दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये 90-90-90 असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. 

पाहा काँग्रेसची संपूर्ण यादी - Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, सायन ते नागपूरपर्यंत 'या' उमेदवारांना संधी

 

26 Oct 2024, 10:51 वाजता

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : 'भाजपचे तिकीट हवे असेल तर 50 लाख द्या'

उमेदवारीसाठी नाशिकच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे 50 लाखांची मागणी करण्यात आलीय.. पंतप्रधान कार्यालयात मुख्य सचिव असल्याचं सांगत फरांदे यांना उमेदवारीसाठी पैशांची मागणी करण्यात आलीय...तसेच भाजपकडून इच्छुक असलेल्या तीन नेत्यांनाही उमेदवारीसाठी पैशांची मागणी करण्यात आलीय.. पैसे मागणाऱ्या दोघा तोतयांना नाशिक पोलिसांनी अटक केलीय..नाशिक पोलिसांनी दोघांना दिल्लीतून अटक केलीय... दोघा आरोपांनी 28 तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आलीय.. भामट्यांनी नगर, डोंबिवली, कल्याण आणि पुण्यातही 6 जणांना फोन करून उमेदवारीसाठी पैशांची मागणी केल्याचं तपासात उघड झालंय.. 

26 Oct 2024, 09:08 वाजता

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : शिवसेना UBT उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना UBT उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आलीय. दुसऱ्या यादीत 15 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलीय आहे. शिवसेना विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांना शिवडी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

मतदारसंघनिहाय उमेदवार 

धुळे शहर- अनिल गोटे, 
चोपडा (अज)- राजू तडवी, 
जळगाव शहर- जयश्री सुनौल महाजन, 
बुलढाणा- जयश्री शेळके, 
दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल, 
हिंगोली- रूपाली राजेश पाटील, 
परतूर- आसाराम बोराडे, 
देवळाली (अजा) योगेश घोलप, 
कल्याण पश्चिम-सचिन बासरे, 
कल्याण पूर्व - धनंजय बोडारे, 
वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव, 
शिवडी- अजय चौधरी, 
भायखळा- मनोज जामसुतकर, 
श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे, 
कणकवली- संदेश भास्कर पारकर

 

26 Oct 2024, 09:03 वाजता

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : पालघर विधानसभेवरुन मविआमध्ये बिघाडी

पालघर विधानसभेवरून मविआमध्ये बिघाडी झाल्याचं पाहायला मिळतय... मविआकडून ठाकरेंच्या शिवसेनेनं  पालघर विधानसभेसाठीचा उमेदवार जाहीर केला... यावेळी शिवसेनेचा उमेदवार जाहीर होताच,  काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष आणि शहराध्यक्ष मनोहर दांडेकरांनी ही उमेदवारी अर्ज दाखल केला.... पालघर जागेवर  शिवसेनेच्या दिलेल्या उमेदवारा बाबत मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी ही झालीय....त्यामुळे काँग्रेसकडून बंडखोरी करण्यात येईल का ? असा प्रश्न उपस्थित झालाय..

 

26 Oct 2024, 09:02 वाजता

विखे - थोरात वाद विकोपाला 

सुजय विखेंच्या सभेत बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलंय. वसंतराव देशमुख यांनी जयश्री यांच्याबाबत जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. त्यामुळे सभास्थळी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय.. एकीकडे सभा सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिय्या दिल्याचं पाहायला मिळालंय. तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केलीय. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात त्यांची सभा पार पडली. त्या सभेत देशमुखांनी जयश्री यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलंय तर या  आक्षेपार्ह विधानाचे जोरदार  पडसाद  परिसरात उमटलेय.. अज्ञाताकडून गाडीची तोडफोड करण्यात आलीय.. तर अकोले नाका परिसरात गाडीही पेटवण्यात आलीय..   त्यामुळे संगमनेरमधील विखे पाटील आणि थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळालंय.. 

26 Oct 2024, 09:02 वाजता

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : आघाडीमुळे जागावाटपात घोळ- नाना पटोले

आघाडीमुळे जागावाटपात घोळ झाल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय. मेरिटनुसार काँग्रेसला कमी जागा मिळाल्याचंही त्यांनी म्हटलंय.. मित्रपक्षांनाही योग्य वाटा मिळावा यासाठी समान जागांचं सूत्र काढल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.. 

 

26 Oct 2024, 09:00 वाजता

कोल्हापूरमधील करवीरमध्ये महायुतीत बंडखोरी

विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरमधील करवीरमध्ये महायुतीत बंडखोरी पाहिला मिळतेय. मित्रपक्ष जनसुराज्य पक्षाने करवीरमधून उमेदवार दिला आहे.  संताजी घोरपडेंनी उमेदवारी अर्ज भरला आहे. करवीरमधून शिवसेनेचे चंद्रदीप नरके मैदानात आहेत. संताजी घोरपडेंनी विनय कोरेंच्या उपस्थितीत भरला अर्ज भरलाय. 

 

26 Oct 2024, 08:55 वाजता

कोल्हापुरात आराम बसला आग, एका प्रवाशाचा मृत्यू

कोल्हापुरात आराम बसला आग लागली त्यात एका प्रवाशाचा होरपळून मृत्यू झालाय. तर 6 प्रवाशांचा जीव बचावलाय. पुणे बेंगलोर महामार्गावर मयूर पेट्रोल पंपाजवळ ही दुर्घटना घडली. बेळगावहून पुण्याला निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्सची बस जळून खाक झाली आहे. गोकुळ शिरगाव जवळ बस येताच अचानक इंजिनमध्ये आग लागली.