19 Nov 2024, 23:04 वाजता
Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : विधानसभा महासंग्राम! आज मतदानाचा दिवस
महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघासाठी आज 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील 288 जागांवर एकूण 4136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचं भवितव्य आज बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी मतपेटीत बंद होणार आहे. आज राज्यात सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी महाराष्ट्रातील विधानसभेचं चित्र स्पष्ट होणार आहे.
19 Nov 2024, 21:25 वाजता
क्षितिज ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल
बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल
विवांता हॉटेल आंदोलन प्रकरणी ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल
शिवसेनेचे वसई तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांच्या तक्रारी नंतर तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
क्षितिज ठाकूर यांनी मारहाण केल्याप्रकरणी सुदेश चौधरींच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
19 Nov 2024, 20:38 वाजता
विनोद तावडेंकडे कोणतेही पैसे सापडलेले नाहीत - देवेंद्र फडणवीस
विनोद तावडेंकडे कोणतेही पैसे सापडलेले नाहीत. पराभव दिसू लागला की आरोप सुरु होतात. विनोद तावडे फक्त कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गेले होते असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
19 Nov 2024, 19:20 वाजता
सीसीटीव्ही तपासा, आयोगकडून चौकशी होऊ द्या - विनोद तावडे यांचं निवेदन
भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे वसई येथील घटनेबाबत निवेदन -
वाडा येथून आज मी मुंबईला परतत असताना वसई परिसरात आल्यावर स्थानिक भाजपा उमेदवार राजन नाईक यांना चौकशीसाठी फोन केला. आम्ही सर्व कार्यकर्ते वसई येथे एका हॉटेलमध्ये आहोत, आपण चहाला या, असे त्यांनी सांगितले. मी तेथे पोहोचल्यावर स्वाभाविकपणे निवडणुकीची चर्चा झाली. मतदानाच्या दिवशीची तांत्रिक प्रक्रिया व आपण घ्यायची काळजी याविषयी मी बोलत होतो. त्यावेळी अचानक काही कार्यकर्ते आले व त्यांनी माझ्याभोवती कोंडाळे करून आरडाओरडा सुरू केला. हे कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे असल्याचे समजल्यानंतर मी त्या पक्षाचे प्रमुख मा. हितेंद्र ठाकूर यांना फोन केला व आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवरावे, अशी विनंती केली. मा. हितेंद्र ठाकूर व आ. क्षितीज ठाकूर तेथे आले. त्या दोघांशी बोलणे झाल्यावर त्यांच्यासोबत मी एकाच गाडीतून बाहेर पडलो. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये टिपला गेला आहे. मी केवळ भाजपा कार्यकर्त्यांसोबत चहापानासाठी गेलो होतो व चर्चा करत होतो. त्यावेळी माझ्याकडून पैसे वाटप होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या संदर्भातील सीसीटीव्ही चित्रण तपासावे म्हणजे दूध का दूध, पानी का पानी, स्पष्ट होईल. मा. राहुल गांधी व मा. सुप्रिया सुळे अशा यासंदर्भात टीका करणाऱ्या नेत्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. तसेच याबाबतीत मा. निवडणूक आयोगाकडून निःपक्ष चौकशी व्हावी
19 Nov 2024, 18:15 वाजता
निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर विनोद तावडेंची पत्रकार परिषद रद्द
19 Nov 2024, 17:05 वाजता
भाजपाकडून आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
भारतीय जनता पक्षाकडून आदित्य ठाकरेंविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार
मुंबई भाजप सचिव प्रतिक कर्पे यांच्याकडून तक्रार दाखल
प्रचार कालावधी संपल्यांनंतरही आदित्य ठाकरेंनी एक्स पोस्ट केल्यामुळे तक्रार दाखल
19 Nov 2024, 17:04 वाजता
राहुल गांधींची पोस्ट
मोदीजी, हे 5 कोटी कोणाच्या तिजोरीतून काढले आहेत? जनतेचा पैसा लुटून तुम्हाला कोणी टेम्पोतून पाठवला?
19 Nov 2024, 16:42 वाजता
निवडणूक आयोगाचे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निर्बंध
- मतदानाच्या दिवशी उमेदवाराला स्वतःसाठी, निवडणूक प्रतिनिधीसाठी, आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी असे केवळ तीन वाहने वापरण्यास परवानगी
- एका वाहनात वाहन चालकासह केवळ पाच व्यक्ती असावे अशी अट
- वाहनांचे परवाने आणि संपूर्ण माहिती दर्शनी भागात लावावे तर, उमेदवाराचे नाव आणि क्षेत्र देखील वाहनावर असणे बंधनकारक
- निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय इतर वाहन वापरल्यास होणार कारवाई..
19 Nov 2024, 16:06 वाजता
पुण्यात माजी नगरसेविका यांच्या पतीवर हल्ला
पुण्यातील वडगाव शेरी मध्ये चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला
चंद्रकांत टिंगरे हे माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती
६ दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता
19 Nov 2024, 15:55 वाजता
Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना भाजप नेते विनोद तावडे यांची पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे विनोद तावडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विनोद तावडे यांच्यासह राजन नाईक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय.