Breaking News Live Updates : माजी गृहमंत्री अनिल देशमुख हल्ल्यात जखमी

Breaking News Live Updates : राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच कैक घडामोडींना वेग आला आहे. काय आहेत त्या घडामोडी, पाहा एका क्लिकवर...   

Breaking News Live Updates : माजी गृहमंत्री अनिल देशमुख हल्ल्यात जखमी

Breaking News Live Updates : विधानसभा निवडणुकीसाठीचा मतदानाचा दिवस काही तासांवर आलेला असतानाच आता अखेरच्या टप्प्यात नेतेमंडळी नेमकी कोणती रणनिती आखतात हे पाहणं महत्त्वाचं.... पाहा राज्यातील प्रत्येक लहानमोठी अपडेट एका क्लिकवर.

18 Nov 2024, 07:09 वाजता

दोन्ही पिकांसाठी खरेदी केंद्रांची  संख्या वाढविण्याचे निर्देश

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय कृषी व वस्त्रोद्योग  मंत्रालयाशी केलेल्या सकारात्मक चर्चा आणि पाठपुराव्यानंतर, केंद्र सरकारने सन 2024-25 साठी सोयाबीन आणि कापसाचे हमीभाव जाहीर केले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. 

18 Nov 2024, 07:07 वाजता

लोकसभेत कांद्याने सत्ताधारी पक्षाचा केला वांदा

पक्षाचा वांदा केल्यानंतर विधानसभेतही कांद्याचा मुद्दा कायम असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांकडील उन्हाळ कांदा संपण्यास सुरुवात झाल्यानंतर कांद्याचे दर वाढले आहेत. एकीकडे शेतकऱ्यांना साठवणूक केलेल्या कांद्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने नाराजी तर दुसरीकडे शहरात कांदा 80 ते 100 रुपये किलो झाल्याने ग्राहक बेजार झाले आहेत. थोडक्यात यंदा प्रथमच ग्रामीण आणि शहरी भागात कांदा वांदा करणार आहे. राज्यातील 60 ते 70 मतदारसंघांत कांदा उत्पादन होते. तसेच दरवाढीमुळे शहरातील 50 ते 60 मतदारसंघांत हा महागाईचा मुद्दा झाला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यामुळे लोकसभेच्या साधारण 15 मतदारसंघांत सत्ताधारी युतीला फटका बसला होता.

18 Nov 2024, 06:27 वाजता

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेस्ट बसच्या जादा फेऱ्या

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेस्ट बसच्या जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त, प्रशासक भूषण गगराणी यांनी बेस्ट उपक्रमाला मतदानाच्या दिवशी जादा बस फेऱ्या चालविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे 20 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजल्यापासून ते रात्री 1 वाजेपर्यंत बस सेवा उपलब्ध असणार आहे. तसेच दिव्यांग, वृद्ध मतदारांसाठी ‘लो फ्लोअर डेक’ बसही उपलब्ध असणार आहे.

 

18 Nov 2024, 06:25 वाजता

Breaking News Live Updates : आज राज्यात कोणत्या नेत्यांच्या सभा? 

दौंड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राहुल कुल यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वरवंड येथे सकाळी नऊ वाजता जाहीर सभा. वर्ध्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा.

नवी मुंबई  - देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची सभा  सकाळी - 10 वाजता

मुख्यमंत्री आज संगमनेर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खा. श्रीकांत शिंदे आणि सुजय विखे संगमनेरमध्ये. दुपारी 3 वा. संगमनेर शहरात भव्य सभेचे आयोजन

इंदापूर विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारार्थ आज इंदापूर मध्ये अजित पवार यांची दुपारी एक वाजता जाहीर सभा 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती येथील मिशन हायस्कूलच्या मैदानावर सांगता सभा दुपारी दोन वाजता. 

रायगड - कर्जत विधान सभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा स्थळ - कर्जत, सकाळी 11 वाजता

18 Nov 2024, 06:23 वाजता

Breaking News Live Updates : आज प्रचाराच्या तोफा थंडावणार 

आज प्रचाराच्या तोफा थंडावणार. विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्याची मुदत आज सायंकाळी सहा वाजता संपणार आहे. त्यामुळे रविवारचा मुहूर्त साधून शहरातील सर्वच उमेदवारांनी रविवारी जोरदार प्रचार केला. ढोल-ताशांचा गजर, समर्थकांसह काढलेल्या रॅली, पदयात्रा, प्रचारफेऱ्या, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पत्रके वाटप आणि मतदारांशी थेट संपर्क करत आपले पारडे जड करण्याचा प्रयत्न केला. शहरात प्रचाराची राळ उडाली अन् आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. राजकीय कलगीतुराही जोरदार रंगला होता.