Breaking News Live Updates : विधानसभा निवडणुकीसाठीचा मतदानाचा दिवस काही तासांवर आलेला असतानाच आता अखेरच्या टप्प्यात नेतेमंडळी नेमकी कोणती रणनिती आखतात हे पाहणं महत्त्वाचं.... पाहा राज्यातील प्रत्येक लहानमोठी अपडेट एका क्लिकवर.
18 Nov 2024, 10:40 वाजता
मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाले पवार ?
झी 24तासच्या 'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीत शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदासंदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केलं. ‘ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री', इतकं सोपं समीकरण त्यांनी मांडलं. सुप्रिया लोकसभेत आनंदी आहेत, असं सांगताना जनतेला सत्ताबदल हवा आहे हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.
18 Nov 2024, 10:29 वाजता
पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 1267 गुन्हे दाखल. तर 1179 जणांना अटक करत 5 कोटी 55 लाख रुपयांचा मुद्देमाल देखील करण्यात आला जप्त. अवैधरित्या दारूची विक्री आणि ट्रान्सपोर्ट करणाऱ्यांच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आली कारवाई. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क ॲक्शन मोडवर. 1 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यात 18 ठिकाणी चेक नाके उभारत आणि छापेमारी करत कारवाई
18 Nov 2024, 09:26 वाजता
जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
जळगावात भल्या पहाटे अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार. जळगावातील मेहरूण परिसरात आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर झाला गोळीबार. अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांचे मेहरूण परिसरातील शेरा चौकात घर आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास त्याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली असून घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती. अहमद हुसेन यांचे समर्थक तसेच समाजातील प्रतिष्ठीत नागरिक देखील घटनास्थळी हजर झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल. गोळीबार करणाऱ्यांचा शोध कसून सुरु अपक्ष उमेदवाराला पोलीस संरक्षण मिळणार.
18 Nov 2024, 09:02 वाजता
अमित शाह यांची आजची नवी मुंबईतील सभा रद्द
सोमवारी अमित शाह यांची नवी मुंबईतील सभा रद्द करण्यात आली असून, जे पी नड्डा ही सभा घेणार आहेत. मणिपूरमधील बिघडलेल्या परिस्थितीवर दिल्लीत अमित शाह यांची बैठक आहे. मणिपूरमधील बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची काल बैठक झाली. अमित शाह यांनी सर्व निवडणूक रॅली रद्द करून काल सुरक्षेचा आढावा घेतला. आज दुपारी 12 वाजता पुन्हा महत्त्वाची बैठक घेणार.
18 Nov 2024, 08:49 वाजता
उदयनराजे यांनी सभा संपल्यावर स्वतः शिवेंद्रसिहराजे यांची कॉलर उडवली आहे
सातारा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवेंद्रसिहराजे भोसले यांच्या गांधी मैदानावर झालेल्या प्रचार सभेत शिवेंद्रसिहराजे आणि उदयनराजे हे दोघे भाऊ एकाच व्यासपीठावर दिसले येवढेच नाही तर नेहमीच कॉलर उडवून हटके स्टाईल करणाऱ्या उदयनराजे यांनी सभा संपल्यावर स्वतः शिवेंद्रसिहराजे यांची कॉलर उडवली आहे.
18 Nov 2024, 08:27 वाजता
'...तर वाशी ते घणसोली कोस्टल रोड बनणार'
ऐरोली विधानसभेचे अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे अण्णासाहेब पाटील आणि दि बा पाटील यांचे पुतळे नवी मुंबई शहरात उभारण्याचे वचन देत शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाशी ते घणसोली पर्यंत कोस्टल रोडची निर्मिती करण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे.
18 Nov 2024, 08:24 वाजता
करवीर विधानसभा मतदारसंघातील बंडखोर उमेदवारावर जीवघेणा हल्ला
करवीर विधानसभा मतदारसंघातील बंडखोर उमेदवार संताजी घोरपडे याच्यावर जीवघेणा हल्ला. संताजी घोरपडे हे महायुतीचे बंडखोर उमेदवार, जनसुराज्य पक्षाकडून निवडणूक रिंगणात. रात्री प्रचारातून परतत असताना सहा ते सात जणांनी संताजी घोरपडे याच्यावर केला हल्ला. करवीर विधानसभा मतदारसंघतील मानवाड गावाजवळ झाला हल्ला. हल्यात संताजी घोरपडे जखमी. पायाला आणि डोक्याला दुखापत. रक्तस्त्राव झाल्याने संताजी घोरपडे यांना तात्काळ हॉस्पिटल मध्ये हलविले.
18 Nov 2024, 08:22 वाजता
शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या राजकीय प्रचारावर बंदी
विधानसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सोमवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून शांतता कालावधी सुरू होणार आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 च्या कलम 126 अंतर्गत मतदारांवर प्रभाव टाकणारा प्रचार आणि सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास, उपस्थित राहण्यास अथवा सहभागी होण्यास मनाई आहे. या अटींचे उल्लंघन झाल्यास दोन वर्षापर्यंत तुरुंगवास अथवा दंड अथवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
18 Nov 2024, 08:19 वाजता
राज्यातील जलजन्य आजारांमध्ये वाढ यंदा अतिसाराचे सर्वाधिक रुग्ण
राज्यात पावसाचा हंगाम संपला असला, तरी राज्यात जलजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील वर्षी राज्यात जलजन्य आजाराची 19 वेळा साथ आली होती, मात्र यंदा 1 जानेवारी ते 7 नोव्हेंबरदरम्यान 71 वेळा साथींची नोंद करण्यात आली. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णांची संख्या तिप्पट वाढली आहे.
18 Nov 2024, 07:13 वाजता
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विदर्भात आज चार सभा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विदर्भात आज चार जाहीर सभा होणार आहेत. गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा विधानसभा मतदारसंघात गडकरींच्या जाहीर सभा होतील.
त्यानंतर दुपारी कामठी येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या करता कामठी विधानसभा मतदारसंघात गडकरीची सभा होणार आहे. गडकरींची समारोप प्रचार सभा मध्य नागपुरातील गोळीबार चौक या विधानसभा मतदारसंघात होणार आहे.