Breaking News Live Updates : नाशिकमध्ये 1 कोटी 98 लाख इतकी रक्कम जप्त

Breaking News Live Updates : राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच कैक घडामोडींना वेग आला आहे. काय आहेत त्या घडामोडी, पाहा एका क्लिकवर...   

Breaking News Live Updates : नाशिकमध्ये 1 कोटी 98 लाख इतकी रक्कम जप्त

Breaking News Live Updates : विधानसभा निवडणुकीसाठीचा मतदानाचा दिवस काही तासांवर आलेला असतानाच आता अखेरच्या टप्प्यात नेतेमंडळी नेमकी कोणती रणनिती आखतात हे पाहणं महत्त्वाचं.... पाहा राज्यातील प्रत्येक लहानमोठी अपडेट एका क्लिकवर.

18 Nov 2024, 19:01 वाजता

नाशिकमध्ये 1 कोटी 98 लाख इतकी रक्कम जप्त 

नाशिक मध्ये आज सकाळी एका नामांकित हॉटेलमध्ये मोठी रक्कम आढळून आली होती या संदर्भात निवडणूक आयोगाच्या पथकाने छापा टाकून तपास केला असता एकूण रक्कम ही 1 कोटी 98 लाख इतकी असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली तर ही रक्कम जयंत साठे यांच्याकडून हस्तगत केली असून या संदर्भात पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनीता कुमावत यांनी दिली.

18 Nov 2024, 17:59 वाजता

मुंबई शहरात कुठे, किती मतदान केंद्र? जाणून घ्या

 
मुंबई शहरात 2538  एकूण मतदान केंद्र आहेत. उत्तुंग इमारतीमधील (Highrise Building) 156 मतदान केंद्र आहेत. सहकारी गृहनिर्माण सोसायटीमधील मतदान केंद्र 100 आहेत. झोपडपटटी परिसरात 313 मतदान केंद्र आहेत. मुंबई शहर जिल्हयात 101 मंडपातील मतदान केंद्र आहेत. पहिल्या मजल्यावर 17 मतदान केंद्र आहेत.

18 Nov 2024, 16:46 वाजता

खासदार अपात्रतेचा कायदा बदलण्याची केंद्र सरकारकडून तयारी 

खासदार अपात्रतेचा कायदा बदलण्याची केंद्र सरकारनं तयारी सुरू केलीय. लाभाच्या पदावर असताना खासदारांना अयोग्य ठरविण्याचा 65 वर्षांपूर्वीचा जुना कायदा रद्द करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केलीय. जुना कायदा रद्द केला जाणारेय. त्या जागी सुसंगत असणारा नवीन कायदा लागू केला जाणार असल्याचा दावा संबंधित मंत्रालयाने केलाय.

18 Nov 2024, 15:27 वाजता

काँग्रेसचे पदाधिकारी अमित शेट्टी यांची पक्षातून हकालपट्टी

काँग्रेसचे सायनमधील पदाधिकारी अमित शेट्टी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अमित शेट्टी हे काँग्रेसची माजी आमदार जगन्नाथ शेट्टी यांचे पुत्र आहेत. पक्षविरोधी काम केल्याने पक्षाकडून कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 

18 Nov 2024, 14:57 वाजता

भाजपचे बंडखोर उमेदवार तुषार भारतीय यांनी राणांचं टेन्शन वाढवलं

भाजपचे बंडखोर उमेदवार तुषार भारतीय यांनी राणांचं टेन्शन वाढवलंय.काल आणि आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत मोठ्या प्रमाणात महिलांची आणि बाईक रॅली काढत सर्वांचं लक्ष वेधलंय. दरम्यान महिलांच्या मिळालेल्या उस्फूर्त प्रतिसाद पाहून मोठ्या प्रमाणात चुरस वाढल्याचा पाहायला मिळत आहे. त्यामुळे बडनेरा मतदारसंघात आता चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. भारतीयांनी भाजपमधून बंडखोरी केली असून या बंडखोरीचा मोठा फटका राणांना बसण्याची शक्यता आहे.

18 Nov 2024, 13:51 वाजता

गुदगुल्या करण्याचा प्रयत्न करू नका-  तानाजी सावंत यांचा इशारा 

मतदारसंघासाठी काहीही करू शकतो त्यामुळे गुदगुल्या करण्याचा प्रयत्न करू नका... असा इशारा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विरोधकांना दिलाय. मी काय करतो ते अख्ख्या महाराष्ट्राने जाणलंय त्यामुळे माझा नाद कुणी करणार नाही असंही ते म्हणाले धाराशिवच्या परांडा इथं बोलत होते. 

18 Nov 2024, 12:08 वाजता

'एक है तो सेफ है' या मोदींच्या घोषणेला राहुल गांधींचं उत्तर 

एक है तो सेफ है या मोदींच्या घोषणेला राहुल गांधींचं तिजोरीच्या माध्यमातून उत्तर. मुंबईत व्यासपीठावर एक तिजोरी आणत त्यातून काही प्रातिनीधीक फोटो दाखवले. धारावी पुर्नविकास प्रकल्पाबाबतचे हे फोटो आहेत असून, अदानी आणि मोदी, धारावी प्रकल्प याचे फोटो तिथं त्यांनी सर्वांना दाखवले. 'एक है तो सेफ है' हा मोदींनी अत्यंत योग्य नारा दिला पण, प्रश्न एवढाचा आहे की यात एक कोण आहे आणि सेफ कोण आहे?? असा प्रश्न करत राहुल गांधींचा अदानींवर हल्लाबोल. पंतप्रधानांशी अदानींचं जुनं नातं असल्याचं सांगत महाराष्ट्रासाठी अदानींना दिले जाणारे प्रकल्प हा मुख्य मुद्दा आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. एकाच व्यक्तीला धारावी, एअरपोर्ट, इतर उद्योगधंदे हे दिले जातात हा मुद्दा उचलून धरत राहुल गांधींकडून महाराष्ट्रातून इतर राज्यात गेलेल्या उद्योगधंद्यांच्या यादीचं वाचन यावेळी करण्यात आलं. 

18 Nov 2024, 12:04 वाजता

बारामतीत आज दोन्ही पवारांच्या प्रचाराच्या सांगता सभा

विधानसभेच्या निवडणुकांच्या आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे युगेंद्र पवारांच्या प्रचारार्थ सांगता सभा घेणार आहेत. तर दुसरीकडे अजित पवारांचे देखील सांगता सभा बारामतीतच होणार आहे. 

18 Nov 2024, 11:24 वाजता

राज ठाकरे यांच्या सभेला महायुतीचे झेंडे

राज ठाकरे यांच्या सभेला महायुतीचे झेंडे आणि कार्यकर्ते अँकर --शिवडी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार बाळा नांदगावकर हे निवडणूक लढवत आहेत. महायुतीने बाळा नांदगावकर यांना पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांचे लालबाग या ठिकाणी प्रचार सभा होत आहे या सभेत महायुतीचे म्हणजेच शिवसेना भाजप,आर पि आय आठवले गटाचे झेंडे स्टेज वर लावण्यात आले आहेत.तर भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्तेही सभेला उपस्थित आहेत. 

18 Nov 2024, 10:40 वाजता

मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाले पवार ?

झी 24तासच्या 'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीत शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदासंदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केलं. ‘ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री', इतकं सोपं समीकरण त्यांनी मांडलं. सुप्रिया लोकसभेत आनंदी आहेत, असं सांगताना जनतेला सत्ताबदल हवा आहे हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.