Maharashtra Breaking News Live Updates : बीडमध्ये संतोष देशमुख हत्याकांडप्रकरणी तपासाला वेग आला आहे. तिथं राज्यात इतरही अनेक घडामोडींना वेग आला असून, दिवसभरातील लक्षवेधी घटना कोणही... पाहा एका क्लिकवर.
3 Jan 2025, 12:58 वाजता
वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणात सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होणार आहे. खंडणीप्रकरणी विष्णू चाटेही अटकेत आहे. वाल्मिक कराड आणि पवनचक्की कंपनीच्या अधिका-यांचं फोनवरून संभाषण झालं होतं, अशी मोठी कबुली चाटेनं दिली आहे. सीआयडीनं न्यायालयात अहवाल सादर केला. त्यात हा खुलासा केला आहे. कराडनं विष्णू चाटेच्या फोनवरूनच धमकी दिल्याची तक्रार कंपनीच्या अधिका-यांनी दिली होती. याच बाबत चाटेनं दोघांचं बोलणं झाल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे कराडचा पाय आता आणखी खोलात गेलाय.
3 Jan 2025, 12:33 वाजता
'सामना'तून फडणवीसांचं कौतुक
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमधील जवळीक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडवीसांचे भेट घेतली होती. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आमदार वरूण सरदेसाई यांनीही फडणवीसांची भेट घेतली होती. तर ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांनी वाल्मिक करडा शरण आल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांचं यांचं कौतुक केलं होतं.
3 Jan 2025, 12:31 वाजता
शरद पवार, छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर येणार आहेत. याकडं सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिलीय. तर भुजबळांसोबत कौटुंबीक संबंध असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. दोन्ही नेते एकत्र असतील तर यात राजकारण नको, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
3 Jan 2025, 12:06 वाजता
मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना UBT पक्ष अॅक्शन मोडवर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज महत्त्वाची बैठक
उद्धव ठाकरेंनी दुपारी 1 वाजता मातोश्रीवर बैठक बोलावलीय...
मुंबईतील पूर्वउपनगर आणि पश्चिम उपनगरातील 1 ते 7 विभागातील विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख बैठकीला उपस्थित राहणारेत. बैठक
मुंबईत एकूण 12 विभाग आहेत. त्यातील 1 ते 7 विभागातील विभागप्रमुखांची बैठक होणारेय. तर उर्वरित 7 ते 12 विभागप्रमुखांची बैठक 2 दिवसांत पार पडणारेय.
3 Jan 2025, 11:20 वाजता
काही मंत्र्यांनी अजून पदभार स्वीकारला नाही - सुप्रिया सुळे
राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
3 Jan 2025, 11:07 वाजता
CETच्या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. CBSE चा मानसशास्त्राचा पेपर आणि LLB च्या अभ्यास क्रमासाठीची CETची परीक्षा एकाच दिवशी जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ न होण्यासाठी CET च्या परीक्षेच्या तारखेत लवकरच बदल करणार आहेत.
3 Jan 2025, 11:05 वाजता
वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करा, सकल मराठा समाजाची मागणी
मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध केला जातोय. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी लातूर जिल्ह्यात 7 तारखेला सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व तालुक्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर शहरात एक बैठक पार पडली त्या बैठकीत एकमुखाने हा निर्णय घेण्यात आला. हा चक्काजाम सकाळी 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या बैठकीत देण्यात आली.
3 Jan 2025, 11:02 वाजता
बीडमधील तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडच्या मागण्या वाढल्या
बीडच्या खंडणी गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडकडून केज सत्र न्यायालयात विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे. आपल्याला 'स्लिप एपनिया' नावाचा आजार असल्याचा दावा त्याने केला आहे. रुग्णाला अशावेळी ऑटो सीपॅप ही मशीन झोपताना लावली जाते, ही मशीन द्यावी आणि मशीन लावण्यासाठी मदतनीस हवा असल्याची त्याने न्यायालयाकडे विनंती केली आहे. मशीन चालवण्यासाठी आपल्याला सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस देण्याची वाल्मिक कराडची मागणी आहे..आधी जेवायला खिचडी द्यावी अशा पद्धतीची मागणी त्यांना केली होती, त्यामुळे वाल्मिक कराडच्या इच्छांची यादी वाढतच चालल्याचं चित्र दिसत आहे.
3 Jan 2025, 10:58 वाजता
संतोष देशमुखांच्या भावाचं पोलीस अधीक्षकांना पत्र
मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय देशमुख यांनी थेट पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात पोलीस ठाण्यातच अरेरावी करण्यात आल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. बाहेरील लोक थेट कराडच्या पोलीस कोठडीपर्यंत जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसंच वाल्मीक कराडला मिळत असलेल्या सुविधा आणि यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला आहे. काही पोलीस अधिकारी बाहेरच्या लोकांना मदत करत असून एका पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी या पत्रातून केली आहे.
3 Jan 2025, 10:46 वाजता
नवी मुंबई - सानपाडा डिमार्ट जवळ गोळीबार
दोन जणांकडून फायरिंग.. फायरिंग करून बाईकवरून दोघे फरार
पाच ते सहा राऊंड फायरिंग करून दोन इसम फरार, एक जण जखमी
सानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल