Maharashtra Breaking News Live Updates : छत्रपती शिवरायांचा जिरेटोप घालण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नम्रपणे नकार

Maharashtra Breaking News Live Updates : राज्याच्या राजकारणापासून समाजकारणापर्यंत कुठं नेमकं काय घडतंय? पाहा सविस्तर वृत्त...   

Maharashtra Breaking News Live Updates : छत्रपती शिवरायांचा जिरेटोप घालण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नम्रपणे नकार

Maharashtra Breaking News Live Updates : बीडमध्ये संतोष देशमुख हत्याकांडप्रकरणी तपासाला वेग आला आहे. तिथं राज्यात इतरही अनेक घडामोडींना वेग आला असून, दिवसभरातील लक्षवेधी घटना कोणही... पाहा एका क्लिकवर. 

3 Jan 2025, 10:12 वाजता

महाराष्ट्र आता थांबणार नाही! वार्षिक सरासरीच्या 95 टक्के एफडीआय अवघ्या 6 महिन्यात...

पुन्हा अतिशय आनंदाने सांगतो की, आपला महाराष्ट्र सातत्याने परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात अग्रेसर आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

आता 2024-25 या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसर्‍या तिमाहीची आकडेवारी आली आहे. त्यात अवघ्या सहा महिन्यात 1 लाख 13 हजार 236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. गेल्या 4 वर्षांतील सरासरी पाहिली तर 1,19,556 कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या 94.71 टक्के गुंतवणूक ही फक्त 6 महिन्यात आली आहे. 
मी महाराष्ट्राचे मन:पूर्वक अभिनंदन करतो...
माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड अशीच कायम राहील, अशी ग्वाही देतो.

2020-21 : 1,19,734 कोटी
2021-22 : 1,14,964 कोटी
2022-23 : 1,18,422 कोटी
2023-24 : 1,25,101 कोटी
2024-25 (एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यात) : 1,13,236 कोटी

3 Jan 2025, 10:10 वाजता

पुण्यातील तीन माजी नगरसेवकांची शिवसेनेतून हकालपट्टी

शिवसेनेच्या ध्येयधोरणाच्या विरोधात भूमिका घेतल्याने पुणे महापालिकेतील माजी नगरसेवक बाळा ओसवाल, विशाल धनवडे, पल्लवी जावळे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

3 Jan 2025, 10:09 वाजता

नाशिक - निफाड परिसरात पारा पुन्हा घसरला

आजचे तापमान 8.2 अंश सेल्सिअस 

शेजारील येवल्यात देखील थंडीची लाट 

अति थंडीमुळे दुध उत्पादनात घट होण्याची भीती

द्राक्षमनी तडकण्याची भीती मुळे द्राक्ष बागायतदार चिंतेत 

गहू, हरभरा पिकाला मात्र थंडीचा फायदा

3 Jan 2025, 10:07 वाजता

गौण खनिजासंदर्भातील अधिकार आता फक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे

राज्यातील वाळू माफियांवर आळा घालण्यासाठी आणि गौण खनिजांच्या नियमनात अधिक कार्यक्षमतेसाठी महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखालील विभागाने आता गौण खनिजासंबंधीचे सर्व अधिकार थेट जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

याआधी हे अधिकार अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे असायचे, परंतु वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्यासाठी आणि नियमन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी ही नवी व्यवस्था लागू करण्यात आली आहे.