Maharashtra Breaking News Live Updates : बीडमध्ये संतोष देशमुख हत्याकांडप्रकरणी तपासाला वेग आला आहे. तिथं राज्यात इतरही अनेक घडामोडींना वेग आला असून, दिवसभरातील लक्षवेधी घटना कोणही... पाहा एका क्लिकवर.
3 Jan 2025, 20:15 वाजता
छत्रपती शिवरायांचा जिरेटोप घालण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नम्रपणे नकार दिला आहे. शिवरायांचा आदर ठेवत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नकार दिला आहे. मान्यवरांनी आग्रह केल्यानंतर ही फडणवीस यांनी विनंती पूर्वक दिला नकार.
3 Jan 2025, 19:12 वाजता
राजगुरूनगर शहरात घडलेल्या दोन अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचार व खुनातील आरोपीला फाशी व्हावी, पीडित कुटुंबाला शासकीय मदत मिळावी या मागणीसाठी आज स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेच्या वतीने खेड तालुक्यातील शिरोली टोल नाक्यावर पुणे नाशिक महामार्ग अडविण्यात आला. आंदोलकांनी महामार्गावरच ठिय्या आंदोलन केल्याने महामार्गाच्या दोन्हीं बाजूने वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेबाबत पीडित कुटुंबाच्या मदतीसाठी शासनाने घेतलेले निर्णय पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना समजावून सांगितल्या नंतर हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले
3 Jan 2025, 18:33 वाजता
बच्चू कडु यांनी दिला दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कडे सुपूर्द केला आहे.
3 Jan 2025, 15:46 वाजता
राजन साळवी यांनी दिले पक्ष बदलाचे संकेत, झी 24 तासची बातमी खरी ठरली
योग्यवेळी योग्य निर्णय घेईन असं म्हणत राजन साळवी यांनी पक्ष बदलाचे संकेत दिले आहेत. पराभवाला वरिष्ठ कारणीभूत असल्याच सांगत याचा शोध घेतला गेला पाहिजे, असं देखील राजन साळवी यावेळी म्हणाले. माझ्या पराभवाला कारणीभूत वरिष्ठ मंडळी असून मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही, असं परखड मत राजन साळवी यांनी मांडल आहे. माझ्या पराभवाला कारणीभूत कोण हे शोधणे गरजेचे असल्याचंही राजन साळवी यावेळी म्हणाले. राजन साळवी यांच्याबाबतीत झी 24 तासने दिलेली बातमी ठरली खरी आहे.
3 Jan 2025, 14:22 वाजता
ट्रान्स हार्बर ची वाहतूक विस्कळीत
तुर्भे आणि कोपरखैराने स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती.
ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या खोळंबल्या...
वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू..
3 Jan 2025, 14:19 वाजता
भुजबळ यांच्या शायरीवर फडणवीस यांची शायरी..
नायगावच्या विकासाबाबत गावच्या सरपंचने केलेल्या मागण्याबाबत त्या पूर्ण केल्या जातील. तसेच दुर्दैवाने नायगाव येथील महत्वाचे स्थान दुर्लक्षित राहिले होते, पण भुजबळ साहेबांनी त्याच्याकडे लक्ष दिले.
भुजबळ यांच्या शायरीवर फडणवीस यांचं शायरीतून उत्तर
मै ऐकेल चला था जनेबी मंजिल्..
मै चलता गया और करावा बनता गया.
3 Jan 2025, 14:12 वाजता
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार हत्या प्रकरण
मंत्री रामदास आठवले यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली आहे. आरोपी विशाल गवळी राहत असलेली इमारत धोकादायक, केडीएमसीने नोटीस दिल्याची माहिती मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.
इमारत जमीनदोस्त करण्याची मागणी केडीएमसी आयुक्तांकडे मागणी केली असून पीडित कुटुंबियांच्या पाठीशी आमचा पक्ष उभा राहणार असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
3 Jan 2025, 14:10 वाजता
शरद पवार आणि छगन भुजबळ आज एकाच मंचावर
महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चाकणमध्ये होणार आहे. या कार्यक्रमासाठी शरद पवार येणार आहेत.या कार्यक्रमासाठी छगन भुजबळही येणार आहेत. त्यामुळे मंचावरून होणा-या या दोन नेत्यांच्या भाषणाकडे लक्ष असेल.
शरद पवार आणि छगन भुजबळ आज एकाच मंचावर
पुण्यातील कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र येणार
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पवार-भुजबळ एकत्र
दिलीप वळसे पाटील यांनाही कार्यक्रमाचं आमंत्रण
3 Jan 2025, 13:47 वाजता
सावित्रीबाई फुलेंनी बदल करुन दाखवला - देवेंद्र फडणवीस
सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री नायगावमध्ये स्मारकाच्या ठिकाणी पोहचले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक गोष्टींवर चर्चा केली. 'सावित्रीबाई फुलेंनी बदल करुन दाखवला. त्यांना अतिशय वाईट वागणूक देण्यात आली होती. फुलेंनी विषमता ही दूर केली. नायगावमध्ये येण्याची संधी मिळाली. या मातीनं एक वेगळी ऊर्जा दिली', असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
3 Jan 2025, 13:00 वाजता
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमधील जवळीक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडवीसांचे भेट घेतली होती.. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आमदार वरूण सरदेसाई यांनीही फडणवीसांची भेट घेतली होती. तर ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांनी वाल्मिक करडा शरण आल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांचं यांचं कौतुक केलं होतं.