Maharashtra Breaking News LIVE UPDATES : 2024 हे वर्ष संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक असतानाच काही घडामोडींनी विशेष लक्ष वेधलं आहे. काय आहेत त्या घडामोडी, काय आहेत त्यातील सर्व अपडेट्स? जाणून घ्या...
30 Dec 2024, 11:04 वाजता
सतीश प्रधान यांचे वृद्धापकाळाने निधन; ठाण्याचे 'प्रधान' गेले
शिवसेनेचे माजी खासदार आणि ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान यांचे काल दुःखद निधन झाले ठाण्यातील जूपिटर रुग्णालयात त्यांनी आखेरचा श्वास घेतला. सध्या सतीश प्रधान यांचे पार्थिव अंत दर्शनाकरिता ज्ञानसाधना विद्यालयात आणण्यात आले आहे.. शासकीय इतमामात सतीश प्रधान यांच्या पार्थिवावर तिरंगा चढवण्यात आला आहे. त्यानंतर ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभूमी त्यांचं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सतीश प्रधान यांचा शिवसेना वाढविण्यात मोठा हात होता तर ठाण्याच्या जडणघडणीत देखील सतीश प्रधान यांचा मोलाचा वाटा ठरला आहे.
30 Dec 2024, 10:48 वाजता
खातेवाटपानंतर काही मंत्री पदभार न स्वीकारता परदेशवारीवर? पाहा नावांची यादी
खातेवाटप जाहीर झाल्यानंतर काही मंत्री परदेश वारीला गेल्याची माहिती मिळतेय. काही मंत्री पदभार न स्वीकरता परदेश वारीला गेल्याची माहिती. 18 मंत्र्यांनी अद्यापही पदभार स्वीकारला नाही. पदभार न स्वीकारल्यानं मंत्री नाराज आहे की काय अशी चर्चा सुरू झालीय. मंत्री दत्तात्रय भरणे परदेश वारीवर गेलेत. भरणे यांनी पदभार स्वीकारला नाही अशी माहिती समोर येत आहे.
30 Dec 2024, 10:12 वाजता
सप्तशृंगी देवीचे मंदिर नववर्षाच्या स्वागतासाठी राहणार रात्रभर खुले
नववर्षाच्या स्वागतासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन खानदेशच्या कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी गडावर देवीचे मंदिर वर्षाखेर दर्शनासाठी रात्रभर सुरू ठेवण्यात येणार आहे. नेमका याच दिवशी मंगळवार येत असल्याने अधिक गर्दी होईल अशी अपेक्षा आहे उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून गुजरात मधून भाविक इथे दाखल होत आहे देवीच्या दर्शनाने नववर्षाची सुरुवात करण्याची त्यांची इच्छा असते हे बघता 31 डिसेंबरला रात्रभर मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हे मंदिर 2 जानेवारी पर्यंत नऊ वाजेपर्यंत खुले राहणार आहे यासाठी 5 जानेवारीपर्यंत घाट रस्ता पूर्णपणे खुला ठेवण्यात येणार आहे.
30 Dec 2024, 10:09 वाजता
इंदापुरात आज्ञात व्यक्तीने जाळल्या मच्छीमारांच्या 2 बोटी
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील नदीमध्ये मच्छीमारी करणाऱ्या सोमनाथ नगरे यांच्या दोन बोटी अज्ञात व्यक्तीने जाळल्या आहेत.रात्री अंधाराचा फायदा घेत काही अज्ञातांनी खोडसाळ वृत्तीने हा प्रकार केलाय. यामध्ये सोमनाथ नगरे यांचे लाख भर रुपयाचे नुकसान झाले आहे.
30 Dec 2024, 10:04 वाजता
भिवंडी आठवडा बाजारामुळे होतंय राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
भिवंडी तालुक्यातील पडघा येथे रविवारी आठवडा बाजार भरत असतो. गेली अनेक वर्षांपासून हा आठवडा बाजार भरतो. या पूर्वी हा आठवडा बाजार पडघा गावातील बाजारपेठत भरत असायचा. परंतु मागील वर्षा पासून हा बाजार मुंबई-नाशिक महामार्गा लगत भरविण्यात येत आहे. यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झालीयं. यामुळे मुंबई-नाशिकच्या ये-जा करणाऱ्या वाहनांचा खोळंबा होत असल्याने वाहनचालकांना या त्रास सहन करावा लागतोय. या आठवड्या बाजारासाठी पडघा ग्रामपंचायतीने पर्यायी जागा शोधून ही समस्या सोडवावी अशी मागणी होत आहे.
30 Dec 2024, 09:32 वाजता
वाशिम जिल्ह्यातील शेलूवाडा गावात पिसाळलेल्या श्वानाचा हैदोस
वाशिमच्या कारंजा तालुक्यातील शेलूवाडा गावासह परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पिसाळलेल्या श्वानाने दहशत माजवली आहे.या श्वानाने सहा जणांना चावा घेऊन जखमी केलं आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतु, अद्याप पिसाळलेल्या श्वानाचा बंदोबस्त करण्यात आला नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. स्थानिक प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून श्वानाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
30 Dec 2024, 09:09 वाजता
गडावर सोमवती अमावस्या यात्रा
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर सोमवती अमावस्या यात्रा, जेजुरी गडावरून दुपारी एक वाजता होणार कऱ्हा स्नानासाठी पालखीचे होणार प्रस्थान,पालखी निघाल्यानंतर जेजुरी गडावर होणार भंडाऱ्याची मुक्त उधळण.
30 Dec 2024, 09:05 वाजता
म्हाडा कर्मचाऱ्यांचे आज लेखणी बंद आंदोलन
म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि महिला कर्मचाऱ्यांना एका तक्रारदार व्यक्तीने अपशब्द वापरल्याची, अरेरावी केल्याची घटना नुकतीच घडली होती. त्याच्या निषेधार्थ म्हाडा कर्मचारी संघटनांकडून आज सोमवार, ३० डिसेंबर रोजी लेखणी बंद आंदोलन केले जाणार आहे. म्हाडा अधिकारी, कर्मचारी सातत्याने लोकांची कामे मार्गी लागावित म्हणून प्रयत्नशील असतात. त्यासाठीच लोकशाही दिनसारखा उपक्रम सुरू करण्यात आला असून, त्यामध्ये नागरिकांच्या तक्रारी सोडवल्या जातात. असे असताना काही जणांकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांबाबत अपशब्द वापरण्याचे प्रकार घडतात. नुकताच असा प्रकार घडला आहे. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र गृहनिर्माण कर्मचारी संघटना, म्हाडा मागासवर्गीय कर्मचारी संघटना, ग्रॅज्युएट इंजिनियर्स असोसिएशन ऑफ म्हाडा या संघटनांच्या माध्यमातून सर्व म्हाडा कर्मचारी एक दिवस लेखणी बंद आंदोलन करणार आहेत.
30 Dec 2024, 08:21 वाजता
मुख्यमंत्री साहेब मालाला भाव घ्या नाही तर मुलगी बघून द्या
भंडारा जिल्ह्यात अनोख्या बॅनरची चर्चा, सध्या संपूर्ण महाराष्टातील गावखेड्यांत लग्नाचे जोरदार सीजन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या यात मुलाला पाच ते दहा एकर शेती असून सुध्दा कोणीच शेतकऱ्यांच्या मुलाला लग्नासाठी मुलगी दाखवायला वा द्यायला तयार नाही आणि त्याच कारणही तसेच आहे. कारण की शेतकऱ्यांच्या कोणत्याही शेत मालाला भाव नसल्यामुळे कोणीच आपली मुलगी शेतकरी मुलांना द्यायला तयार नाही. यासाठी आता थेट मुख्यमंत्र्यांकडे विनंतीचा सूर आळवण्यात आला आहे.
30 Dec 2024, 08:17 वाजता
31 डिसेंबरच्या पार्टीसाठी पहाटे पाच वाजेपर्यंत पब आणि बारला परवानगी
31 डिसेंबरच्या पार्टीसाठी पहाटे पाच वाजेपर्यंत पब आणि बारला परवानगी. नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे आणि जिल्ह्यातील रेस्टो बार पहाटे पाच पर्यंत सुरू असणार आहेत. अवैध मद्य विक्री रोखण्यासाठी जिल्ह्यात 21 पथके सज्ज, एक दिवसाचा परवाना घेऊन पार्टी करण्याचं आवाहन. पुणे जिल्ह्यात तीन हजार दारूचे दुकाने आहेत. ते पहाटे पाच पर्यंत उघडे असणार आहेत. बनावट दारू शहरात येण्याची शक्यता असल्याने विशेष पथके, विभागीय पथके, जिल्ह्याच्या सीमावर तैनात करण्यात आली आहे. पार्टी फार्म हाऊस, इमारतीचे टेरेस किंवा मोकळ्या जागेत आयोजित करण्यात आली असल्यास मद्य प्राशन करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाची परवानगी आवश्यक. बनावट दारू प्रकरणी ,भेसळ प्रकरणी आत्तापर्यंत 386 आरोपीना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अटक करण्यात आली आहे.