Maharashtra Breaking News LIVE UPDATES : 2024 हे वर्ष संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक असतानाच काही घडामोडींनी विशेष लक्ष वेधलं आहे. काय आहेत त्या घडामोडी, काय आहेत त्यातील सर्व अपडेट्स? जाणून घ्या...
30 Dec 2024, 08:11 वाजता
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक लोणावळ्यात दाखल
नवीन वर्षाच निमित्त साधून लोणावळ्यात पर्यटक दाखल झालेत. लोणावळ्यातील लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट या ठिकाणी नवीन वर्ष साजरा करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पर्यटक आले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक हे लोणावळ्यातील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. राज्यभरातून आलेल्या या पर्यटकांना लोणावळ्यातील आल्हाददायक वातावरणाची भुरळ पडली आहे.
30 Dec 2024, 06:54 वाजता
प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली
अभिनेत्री प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सागर बंगल्यावर जाऊन तिनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आमदार सुरेश धस यांनी बीड सरपंच हत्याकांडाचा संदर्भ देताना आपला चुकीच्या पद्धतीनं उल्लेख केला. त्यासाठी सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी प्राजक्ता माळी यांनी केली आहे. या बदनामी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनीही लक्ष घालून कारवाई करावी अशी विनंती करण्यासाठी तिनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तर सुरेश धस यांच्यावर कारवाई न झाल्यास कोर्टात जाण्याचा इशाराही तिनं आधीच दिलाय.
30 Dec 2024, 06:49 वाजता
अष्टविनायक दर्शनासाठी विशेष बसची व्यवस्था
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रशासनाकडून संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने 17 जानेवारीला पिंपरी चिंचवड आगारातून अष्टविनायक दर्शनाकरिता विशेष बस सोडण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन आरक्षण सुविधा खुली करण्यात आली आहे. ही विशेष बस 17 जानेवारीला सकाळी सात वाजता सुटणार असून प्रौढांसाठी 190 रुपये ते 15 रुपये तर मुलांसाठी पाचशे ते पाचशे पाच रुपयांपर्यंत तिकीट दर असणार आहेत.
30 Dec 2024, 06:48 वाजता
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्षांची चौकशी
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्षांची चौकशी. संध्या सोनावणे यांची चौकशी सुरू. बीड शहर पोलिस ठाण्यात CID कडून चौकशी सुरु. सोनावणे यांच्यासह अन्य तीन जणांची चौकशी सुरू. जे जे पोलिसांनी विचारलं ते विचारलं त्याची मी माहिती दिली, मी पक्षामध्ये काम करत असल्यामुळे मला तपासासाठी बोलवलं असं सोनावणेंचं स्पष्टीकरण.
30 Dec 2024, 06:44 वाजता
कोपरखैरनेत फ्लॅट चा स्लॅब कोसळला
कोपरखैरने येथील सेक्टर - 7 मधील सम्राट को ऑपरेटिव्ह सोसयटी च्या पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटच छत पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही तीन मजली इमारत 24 वर्ष जुनी असून मोडकळीस आली आहे, पहिल्या मजल्यावरील हॉलचां भाग तळमजल्यावर असलेल्या फ्लॅट मध्ये कोसळला. पालिकेने तात्काळ इमारत खाली करण्याचा सूचना दिल्या असून येत्या आठ दिवसांत ही इमारत खाली केली जाणार आहे. या इमारतीत एकूण 16 कुटुंब वास्तव्यास आहेत.
30 Dec 2024, 06:39 वाजता
3 अल्पवयीन मुलींनी रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे 3 अल्पवयीन मुलींनी स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला व घरातून 5 हजार चोरत दक्षिण कोरियाला जाण्याचा प्लॅन बनविला मात्र पोलिसांच्या दक्षतेने हा बनाव उघड झाला असुन त्या मुलींचा शोध घेत त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले आहे. या तीन पैकी 2 मुली ह्या 11 वर्षाच्या आहेत तर एक मुलगी 13 वर्षाची आहे. आमच्या नरड्याला चाकू लावुन आमचे अपहरण करण्यात आले आहे असे सांगून घ्या मुली पुणेकडे निघाल्या व त्यानंतर त्यांनी दक्षिण कोरियाला जाण्याचा प्लॅन केला होता.
30 Dec 2024, 06:36 वाजता
गप्पा मारत बसणाऱ्या शेजारच्या कुटुंबावर संतप्त शेजाऱ्यांकडून जीवघेणा हल्ला
कल्याण चिकणघर परिसरात रात्रीच्या वेळी घराबाहेर गप्पा मारत बसणाऱ्या शेजारच्या कुटुंब संतप्त शेजाऱ्यांनी केला जीव घेणा हल्ला.
आधी घरावर रॉकेल टाकून घर जाळण्याचा प्रयत्न त्यानंतर कुऱ्हाडीने केले वार. हल्ल्यात चार जण जखमी. दोन लहान मुलांचा ही समावेश
30 Dec 2024, 06:33 वाजता
आठवलेंचा बीड, परभणी दौरा
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले परभणी जिल्हा दौऱ्यावर. दुपारी १ वाजताच्या सुमारास मंत्री आठवले दिवंगत लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेणार असून नंतर दुपारी १.४५ वाजता न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. याशिवाय रामदास आठवले बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला रामदास आठवले येणार असल्याची माहिती आहे ते सकाळी दहा वाजता मस्साजोग या ठिकाणी पोहोचतील अंजली दमानिया बीडमध्ये असणार आहेत.
30 Dec 2024, 06:31 वाजता
वाल्मिक कराड शरण येण्याची शक्यता
खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड शरण येण्याची शक्यता, खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली माहिती. कराड यांचे बँक खाते गोठवल्याने तो दूर जाऊ शकत नाही, सूत्रांची माहिती. वाल्मिक कराड यांच्याकडे पासपोर्ट नसल्यामुळे ते देशाच्या बाहेरही जाणार नाहीत. त्यामुळे काही तासात ते शरण येणार असल्याची खात्रीशीर माहिती.