Maharashtra Breaking News LIVE UPDATES : सतीश वाघ हत्या प्रकरणी पत्नीह 6 आरोपींना न्यायालयीन कोठडी

Maharashtra Breaking News LIVE UPDATES : आजच्या दिवसात राज्यात नेमकं काय घडणार? गावखेड्यापासून राजकारणापर्यंत सर्व अपडेट्स एका क्लिकवर...   

Maharashtra Breaking News LIVE UPDATES : सतीश वाघ हत्या प्रकरणी पत्नीह 6 आरोपींना न्यायालयीन कोठडी

Maharashtra Breaking News LIVE UPDATES : 2024 हे वर्ष संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक असतानाच काही घडामोडींनी विशेष लक्ष वेधलं आहे. काय आहेत त्या घडामोडी, काय आहेत त्यातील सर्व अपडेट्स? जाणून घ्या... 

30 Dec 2024, 21:23 वाजता

31 डिसेंबरसाठी गिरगाव चौपटीवर सुरक्षेसाठी पोलीस सज्ज 

यावेळी पहिल्यांदा चौपाटीचे दोन वेगळे भाग केलेत ,एका भागात महिला व परिवाराला जागा असणार, दुसऱ्या भागात तरुण मुलं व पुरुषमंडळी यांच्यासाठी जागा केलीय...चौपाटी वर बेरिकेट टाकून दोन वेगवेगळे भाग तयार केलेत, यामुळे महिला छेडछाड प्रकारावर आळा बसेल.महिला स्पेशल पोलीस सिव्हिल ड्रेस मध्ये या ठिकाणी  गर्दीत गस्त घालणार आहेत. 21 cctv ,5 टॉवर व ड्रोन कॅमेराची नजर या ठिकाणी असणार आहे. जवळपास 300 पोलीस या ठिकाणी असणार आहेत. नरिमन पॉईंट ,गिरगाव चौपाटी या रस्त्यावर उद्या पार्कींग नसणार आहे तसेच कोणत्याही फेरीवाल्यांना या ठिकाणी प्रवेश नसणार आहे. चौपाटी वर फटाके व मद्यला  परवानगी नसणार आहे. नाक्या नाक्यावर ड्रिंक अँड ड्राईव्ह च्या टीम असणार आहेत.

30 Dec 2024, 20:55 वाजता

धाराशिव जिल्ह्यात वेळ अमावस्या उत्साहात साजरी

शेतातील काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी आज तिची मनोभावे पूजा केली जाते. आज गावातील सर्व लहान थोर शेतात वन भोजनाचा आनंद लुटतात. धाराशिव येथील ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी देखील आपल्या शेतात कटुंबासोबत वेळ अमावस्या साजरी करत वनभोजनाचा आनंद घेतला. लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील कृषी संस्कृतीत ही वेळ अमावस्येच्या दिवशीची पूजा महत्त्वाची मानली जाते. आजच्या दिवशी शेतात कडब्याचे कोप करून शेतातल्या लक्ष्मीची पूजा मांडली जाते, शेतात खरीप आणि रब्बी या दोन हंगामात मिळून वेळ अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते, या दिवशी लक्ष्मीची मातीची मूर्ती तयार केली जाते. कडब्याच्या कोपात लक्ष्मीची प्रतिष्ठापना करतात, यथासांग पूजा केली जाते, शेतातील पांडवांना नवा रंग दिला जातो, रब्बी हंगामातील गहु, हरबरा, ज्वारी, करडई, सुर्यफुल आदी पिकांत चर शिंपून ''रब्बीचा हंगाम चांगला होऊ दे'' अशी प्रार्थना केली जाते.

30 Dec 2024, 18:46 वाजता

आशिष शेलार यांनी पदभार स्वीकारला!

माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री अँड. आशिष शेलार यांनी आज मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, यांच्या प्रतिमांना अभिवादन करून दालन क्रमांक 401 मध्ये जाऊन पदभार स्वीकारला. यावेळी दोन्ही खात्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

30 Dec 2024, 18:03 वाजता

8000 पेक्षा जास्त सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार, नववर्षासाठी पोलीस सज्ज

नववर्षाच्या स्वागतासाठी नवी मुंबई पोलीसही सज्ज आहेत. शहरात 8000 पेक्षा जास्त सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे. कोस्टल एरियामध्ये पेट्रोलिंग ठेवण्यात येणार आहे. 400 पेक्षा जास्त पेट्रोलिंग मोबाईल आणि साडेतीनशे पेक्षा जास्त बीट मार्शल हे बंदोबस्त असणार आहेत. कोणालाही मदत ची गरज लागली तर त्या ठिकाणी आपण तो बंदोबस्त पाठवू शकतो, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली.

30 Dec 2024, 16:39 वाजता

संतोष देशमुख हत्याप्रकरणी तपासावर मी समाधानी नाही- खासदार सोनावणे 

संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीकडे जो तपास दिलेला आहे. सीआयडी ज्या पद्धतीने तपास करीत आहे त्यावरती माझा विश्वास आहे. मात्र आपण समाधानी नसल्याचे मत बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केले. नेमकं चौकशी काय करतायेत हेही सर्वांसमोर आलं पाहिजे. अनेक गोष्टी समोर येत असल्या तरी आपण तपासामध्ये समाधानी नसल्याचं खासदार बजरंग सोनवणे म्हणाले.

30 Dec 2024, 13:54 वाजता

प्राजक्ता माळी यांचा अर्ज मुंबई, बीड पोलीस आणि सायबर पोलिसांकडे 

प्राजक्ता माळी यांचा अर्ज मुंबई, बीड पोलीस आणि सायबर पोलिसांना पाठवल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले. प्राजक्ता माळी हे निमित्त आहे पण सोशल मीडिया मुळे अनेक गैरप्रकार घडतात. शनिवारी प्राजक्ता माळी यांची तक्रार आमच्याकडे आली. याद्वारे महिलांचे चारित्र्य हनन केले जात आहे. धस यांनी वक्तव्य केलं होतं त्या नंतर केलेल्या बातम्या बदनाम करणाऱ्या आहेत असं तक्रारीत म्हटलं आहे. संबंधित पोलीस यंत्रणांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असेही त्या पुढे म्हणाल्या.

30 Dec 2024, 13:44 वाजता

लायन्स पॉईंटवर 31 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान पर्यटकांना बंदी

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथे पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. दरवर्षी 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी लोणावळ्यात मोठी गर्दी करतात. टायगर पॉइंट, लायन्स पॉईंट या ठिकाणी सनसेट पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात. पर्यटन स्थळ असलेल्या लोणावळ्यातील लाइन्स पॉईंट, टायगर पॉईंट या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन दोन्ही ठिकाणी 31 डिसेंबर 2024 आणि एक जानेवारी 2025 दरम्यान पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश वडगाव मावळचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिलेत.

30 Dec 2024, 12:53 वाजता

वसई विरारमधील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

वसई विरारमधील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. संघटन पर्वाच्या प्रभारी पदाची जबाबदारी घेतल्यावर रवींद्र चव्हाण ॲक्शन मोडवर. वसई विरारमधील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचे आज भाजपमध्ये प्रवेश. भाजप प्रदेश कार्यालयात थोड्याच वेळात रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. गणेश भुरकंड, जयेश कदम यांच्यासह वसईतील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचे आज भाजपमध्ये प्रवेश.

30 Dec 2024, 12:23 वाजता

आपसी वादातून मामाने दोन भाच्याचा खून केल्याची घटना घडलीय 

तहसील पोलिस ठाणे हद्दीतील गांधीबाग  परिसरात काली माता मंदिर समोर काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना. रवी राठोड, दीपक राठोड असे मृत झालेल्या भाच्याचे नाव आहे. तर बदनसिंग राठोड, अभिषेक आणि सोनू राठोड  असे आरोपींची नावं आहे. आरोपी बापलेक आहेत. मृतक रवी आणि  दीपक हे सख्खे भाऊ आहेत. दोघांचाही मागील काही दिवसांपासून मामा बदनसींग सोबत वाद सुरु होता. ( दूरचा मामा असल्याची माहिती पुढे येतेय ) रात्री मामाने आपला भाचा रवी वर काली माता मंदिर  समोर चाकुने जीवघेणा हल्ला करून त्याला संपविले.. यात भावाला वाचवण्यासाठी गेलेला दिपक गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

30 Dec 2024, 11:25 वाजता

बीडमधून सर्वात मोठी बातमी; वाल्मिक कराडला अटक केल्याचा दावा

बीडमधून सर्वात मोठी बातमी, वाल्मिक कराडला अटक केल्याचा दावा. बीडच्या स्थानिक वृत्तपत्रांचा अटकेचा दावा. पोलीस किंवा सीआयडीकडून अधिकृत दुजोरा नाही. कराडला आजच कोर्टात हजर करतील अशी शक्यता. बीड खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड होता फरार.