Maharashtra Breaking News LIVE Updates: देशमुख कुटुंबीय मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील व देशभरातील ठळक घडामोडी जाणून घेऊया एका क्लिकवर 

Maharashtra Breaking News LIVE Updates: देशमुख कुटुंबीय मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल

Maharashtra Breaking News LIVE Updates : बीड सरपंच हत्याकांडातील घडामोडींना वेग आला आहे. या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यातील व देशातील सर्व घडामोडींचा वेगवान आढावा या लाइव्ह ब्लॉगमधून घेऊयात. 

7 Jan 2025, 15:22 वाजता

मुंबईतील प्रदूषणाबाबत अधिकाऱ्यांना सूचना : पंकजा मुंडे

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील प्रदूषणामध्ये मोठी वाढ झालेली होती. अशातच आता या प्रदूषणाबाबत अधिकाऱ्यांना योग्य सूचना दिल्याच पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. 

7 Jan 2025, 15:05 वाजता

महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप युती? 

आगामी महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप युती होण्याची चर्चा रंगली आहे. लोकसभा आणि विधानसभेत शिंदेंमुळे मनसेची युती होऊ शकली नाही अशी माहिती सूत्रांनी दिलीय.  मात्र, आता महापालिका निवडणुकीत युतीची चर्चा आणि युतीतील इतर बाबीवर वाटाघाटी करण्यासाठी मनसेकडून एका टीमची नेमणूक केली जाणार आहे. मनसेची पहिली टीम सध्याच्या राजकीय स्थितीचा आढावा घेणार आहे. त्यावरुन युतीबाबत अंतिम निर्णय होणार आहे.  

7 Jan 2025, 14:45 वाजता

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, 5 फेब्रुवारीला मतदान, 8 फेब्रुवारीला निकाल होणरा जाहीर; 70 जागांसाठी होणार रणसंग्राम

7 Jan 2025, 14:22 वाजता

मराठा क्रांती मोर्चाकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी यांचे राजकीय व्यावसायिक लागेबांधे लक्षात घेता तपासात हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे. तसेच हे प्रकरण शेवटापर्यंत जाण्यातील धोके लक्षात घेऊन धनंजय मुंडे यांनी तपास होईपर्यंत मंत्रीपदाचा तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे. 

7 Jan 2025, 13:30 वाजता

संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडीओ CIDच्या हाती?

संतोष देशमुख प्रकरणात सीआयडीच्या तपासात धक्कायदायक माहिती पुढे आली आहे. सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करतानाचा व्हिडिओ सीआयडीच्या हाती आला असल्याची माहिती झी 24 तासाला विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करण्यात आल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे सीआयडीला मिळालेला व्हिडिओ या प्रकरणाचा मोठा पुरावा असल्याची माहिती आहे.  या व्हिडिओसह सीआयडीच्या पथकांनी अनेक शस्त्रे जी मारहाण करताना वापरली ती जप्त केली आहेत.  

7 Jan 2025, 12:34 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: विधानसभेत झालं ते विसरा; महापालिकेच्या तयारीला लागा: मनसे बैठकीत राज ठाकरेंचे आदेश

आज मनसेच्या विभाग अध्यक्षांच्या बैठक झाली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश राज ठाकरेंनी बैठकीत दिला. मनसेच्या विभाग अध्यक्षांना संघटना बळकट करण्याचे आदेश देण्यात आलेत. आगामी निवडणूकीत मनसेची राजकीय वाटचाल ; इतर पक्षांसोबत युतीबाबतच्या चर्चा यांबाबतचे अंतीम निर्णय घेतांना राजकीय आढावा घेणा-या टिमची मते लक्षात घेतली जातील

7 Jan 2025, 11:36 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील याचिकेबाबत मोठी अपडेट 

औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका प्रलंबित ठेवण्याची धनंजय  देशमुखांची न्यायालयाला विनंती. धनंजय देशमुख यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती याचिका. देशमुख हत्या प्रकरणात तपासला दिशा देण्यासाठी दाखल केली होती याचिका. तपास यंत्रणेला आणखी वेळ द्यावा असे म्हणत पुढील सुनावणी न घेण्याची केली विनंती

7 Jan 2025, 11:22 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: राजीनामा दिला का? धनंजय मुंडेंनी एका शब्दात दिले उत्तर 

बीड हत्या प्रकरणावरुन राज्यात वातावरण तापलं असून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या चर्चा असतानाच खुद्द मुंडेंनीच यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मी राजीनामा दिलेला नाही, असं मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. 

7 Jan 2025, 11:21 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: आजच्या कॅबिनेटमधूनच ई-कॅबिनेटचा शुभारंभ 

ई-कॅबिनेटच्या दृष्टीने गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय अधिकारी आणि मंत्र्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात. बैठकीतील प्रस्तावांचे टीपण आणि इतर माहिती टॅबवर उपलब्ध करुन दिली जाणार . मंत्र्यांना प्रस्तावाला आक्षेप किंवा सूचना द्यायची असल्यास तशीही व्यवस्था असणार 

7 Jan 2025, 10:48 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण: देशमुख कुटुंबीय आज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट