Maharashtra Breaking News Live Updates : मुख्यमंत्रिपद नव्हे, तर 'या' जबाबदारीसाठी शिंदेंची भाजपसोबत वाटाघाटी - सूत्र

Maharashtra Breaking News Live Updates : राज्यात राजकीय खलबतं, सामान्यांच्या जीवनावर कसा होणार परिणाम? वर्षातील शेवटच्या महिन्याची सुरुवात नेमकी कशी? पाहा...   

Maharashtra Breaking News Live Updates : मुख्यमंत्रिपद नव्हे, तर 'या' जबाबदारीसाठी शिंदेंची भाजपसोबत वाटाघाटी - सूत्र

Maharashtra Breaking News Live Updates : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता उत्सुकता आहे ती म्हणजे सत्तास्थापनेची. याच सत्तास्थापनेपूर्वी राज्यात राजकीय नाट्याचे कैक अंक पाहायला मिळाले. त्यात आता पुढचा अंक कोणता आणि राज्यातील इतर कोणत्या घडामोडी सामान्यांचं लक्ष वेधणार? पाहा सर्व Live Updates...

2 Dec 2024, 11:17 वाजता

एकनाथ शिंदे सत्तेत यायला तयार नव्हते, पण...  भरत गोगावलेंचा मोठा दावा

महायुतीच्या नवीन सरकार मध्ये सत्तेत येण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तयार नव्हते अशी माहिती आता समोर आलीय. शिंदे यांचे निकटवर्तीय आमदार भरत गोगावले यांनीच ही माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे सरकारमध्ये काम करायला नव्हते मी सत्तेच्या बाहेर राहून काम करतो असं त्यांनी सांगितलं होतं पण आम्ही त्यांना सत्तेत राहून काम करण्याचा आग्रह केला असं गोगावले यांनी सांगितलं. 

2 Dec 2024, 11:13 वाजता

शिवसेनेतील काही आमदारांची धाकधूक वाढली

सत्तास्थापनेआधी राजकीय घडामोडींना वेग आला असून, शिवसेनेतील काही आमदारांची धाकधूक वाढली. 4 मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता. येत्या नव्या मंत्रिमंडळात 4 नव्या आमदांराची वर्णी लागण्याची शक्यता. आज वर्षावर सर्व शिवसेना आमदारांची बैठक. दिल्लीला जाण्याआधी ही बैठक महत्वाची मनाली जातेय. 

2 Dec 2024, 10:32 वाजता

शिवसेना आमदाराची मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक

शिवसेना आमदाराची मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक. आज दुपारी ही महत्वाची बैठक वर्षा किव्हा ठाणे होणार असल्याची सूत्रांची माहिती. या बैठकीत प्रामुख्याने पाहिले टर्म तरी मुख्यमंत्री पद मिळावे किव्हा गृहमंत्री पद मिळावे यावर महत्वाची चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती. या बैठकित मुख्यमंत्री जागा वाटप त्याचसोबतच महायुतीतील आपल्या सहभागाबाबत आमदारांना मार्गदर्शन करतील. दरम्यान शिवसेनेच्या वाट्याला 13 मंत्रीपद येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

2 Dec 2024, 10:27 वाजता

राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

राऊतांचा मोदींवर हल्लाबोल. 'कॅनडात जाऊन हिंदूंवरील हल्ले थांबवा. हिंदूवरील हल्ल्यांसाठी मोदींचं धोरण जबाबदार. जगभरातील हिंदू संकटात' म्हणत राऊतांनी आळवला नाराजीचा तीव्र सूर 

 

2 Dec 2024, 10:08 वाजता

श्रीगोंदा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार अजित पवारांच्या भेटीला

श्रीगोंदा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी घेतली अजित पवारांची भेट. श्रीगोंदा मतदारसंघात बंडखोरी केल्यामुळे शरद पवार गटाकडून जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता राहुल जगताप वेगळा निर्णय घेण्याच्या तयारी. देवगिरीवर झालेल्या भेटीनंतर चर्चांना उधाण. 

2 Dec 2024, 09:59 वाजता

दिल्लीत सुटणार महाराष्ट्राच्या खातेवाटपाचा तिढा

दिल्लीत सुटणार महाराष्ट्राच्या खातेवाटपाचा तिढा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या बैठकीत सुटणार तिढा. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीला जाणार. महाराष्ट्रातील तिन्ही नेत्यांसोबत अमित शाह करणार चर्चा. सूत्रांच्या माहितीनुसार येत्या 24 तासांत सर्व बाबींवर शिक्कामोर्तब होणार. 

2 Dec 2024, 09:35 वाजता

आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन 

बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आंदोलनाची हाक पुकारलीय. बांगलादेशात हिंदूवर अन्याय, अत्याचार होत आहे आणि केंद्र सरकार शांत बसून पाहात आसल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. याचा निषेध करण्यासाठी आज शहरातील क्रांती चौकात आंदोलन केलं जाणारेय. या आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन अंबादास दानवेंनी ट्वीटरवरून  केलंय. 

2 Dec 2024, 09:18 वाजता

राज्यात तापमानवाढ  

रविवारपासून राज्यात तापमानवाढीस सुरुवात झाली असून, निफाडचा पारा 18 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. रविवापेक्षा सोमवारी तापमानात 8 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. ढगाळ वातावरणाचा परिणाम. 

2 Dec 2024, 08:37 वाजता

यंदा गव्हाचं क्षेत्र 15 टक्क्यांनी वाढणार 

सध्या राज्यात चांगलीच थंडी वाढल्यानं किमान तापमानाचा पारा काही प्रमाणात घटला आहे. यामुळे गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने गव्हाच्या पेरण्यांना चांगलाच वेग आला आहे. यंदा पोषक वातावरण आणि सिंचनासाठी पुरेसं पाणी उपलब्ध असल्याने गव्हाच्या क्षेत्रात यंदा वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

 

2 Dec 2024, 08:18 वाजता

मुख्यमंत्रीपद नव्हे, तर 'या' जबाबदारीसाठी शिंदेंची भाजपसोबत वाटाघाटी - सूत्र 

भाजपप्रणित महायुतीला भरभक्कम बहुमत मिळून आठवडा उलटून गेला तरी खातेवाटपावरून निर्माण झालेला तिढा अद्यापही कायम आहे. मुख्यमंत्री भाजपचा होणार हे स्पष्ट झाल्यावर सरकारमध्ये क्रमांक दोनची जागा पटवण्यासाठी शिंदे भाजपसोबत वाटाघाटी करत आहेत. गृहमंत्री पदासह नगरविकास आणि इतर मलईदार खाते पदरात पाडून सरकार आणि महायुतीत आपलं महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी शिंदे प्रयत्न करत आहेत. पण गृहखाते सोडण्यास भाजप तयार नसल्याने हा पेच कसा सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.