Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रात दिवसभरात काय काय होतंय राजकारणापासून इतर गोष्टींविषयी देखील सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
10 Jan 2025, 14:17 वाजता
सर्व जातीच्या...; घरांबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
सर्व जातीच्या सफाई कामगारांना वारसा हक्काने घरे मिळणार. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय. म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली माहिती. लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसांना घरे मिळण्याचा मार्ग मोकळा. वाल्मिकी, रुखी, मेहतर व अनुसूचित जाती वगळता इतर जातींना वारसा हक्काने नोकरी देण्यास स्थगिती होती.
10 Jan 2025, 13:44 वाजता
गोळीबाराच्या घटनेनं जळगाव जिल्हा हादरला
जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार झालाय. चाळीसगावनंतर आता भुसावळमध्ये तरुणावर गोळीबार करण्यात आला. चहाच्या दुकानात या तरुणावर आरोपीनं 5 राऊंड फायर केले. यात एक तरुण गंभीर जखमी झालाय. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
10 Jan 2025, 13:40 वाजता
अंधेरीतील बारमध्ये छुप्या घरातून मुली येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
-अंधेरीतील एका बारमध्ये छुप्या घरातून मुली येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
-अंधेरीतील तो बार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे यांचा असल्याचा दावा केला जातोय
-ठाकरेंच्या नावावर बार असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय.
-व्हायरल व्हिडीओ करणाऱ्यांवर कारवाई करण्याची माजी खासदार विनायक राऊत यांची सायबर विभागाकडे केलीय.
10 Jan 2025, 13:22 वाजता
गुंडांना पोलिसांचा धाक नाही
पुण्यात गुंडांना पोलिसांचा धाक नाही. जामिनावर सुटलेल्या गुंडाची पुण्यात रॅली. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांची कारवाई.
10 Jan 2025, 12:40 वाजता
भाजपमध्ये घरवापसी?
भाजपमध्ये प्रवेशासाठी दिग्गज नेते रांगेत असल्याची माहिती आहे
- विधानसभेसाठी भाजप सोडणारे घरवापसीच्या तयारीत
- भाजपमध्ये परतीसाठी भेटीगाठी
- भाजप घरवापसीचा निर्णय विचार करून घेणार
- राजन तेली, समरजीत घाटगे, संजय काका पाटील भाजप प्रवेशासाठी रांगेत असल्याची माहिती सूत्रांना दिलीय..
10 Jan 2025, 11:30 वाजता
मुंबईत ठाकरे गटाला धक्का?
ठाकरेंच्या माजी नगरसेवकांचा नाराजीचा सूर. पक्षाकडून विश्वासात घेतलं जात नसल्याची खंत असल्याची सूत्रांची माहिती...
10 Jan 2025, 10:30 वाजता
कॉंग्रेसला जास्त जागा हव्या होत्या - संजय राऊत
कॉंग्रेसला जास्त जागा हव्या होत्या. कोल्हापूर उत्तरची जागा आम्ही फार आग्रहानं मागत होतो. ती जागा शिवसेननं सहावेळ जिंकली होती. विधानसभेत चुकीच्या पद्धतीनं जागा वाटप झालं. कॉंग्रेस केंद्रीय समितीनं हस्तक्षेप. सर्वांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी कॉंग्रेसची.
10 Jan 2025, 10:15 वाजता
जालन्यात आज संतोष देषमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा समाजाचा मोर्चा
जालन्यात आज संतोष देषमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा समाजाचा मोर्चा. देशमुख कुटुंबीयासह संभाजीराजे, जरांगे पाटील आणि सुरेश धस मोर्चात सहभागी होणार.
10 Jan 2025, 10:14 वाजता
समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकारच
समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकारच. पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. सुप्रीम कोर्टानं 17 ऑक्टोबर 2023 ला दिलेला निर्णय संविधान पीठातील चर्चेनंतर कायम.
10 Jan 2025, 10:12 वाजता
चक्क यूट्युबरनं केली 10 लाखांची चोरी
नोएडामध्ये 10 लाखांची चोरी करणाऱ्या यूट्यूबरला अटक.. ATM मशीनमध्ये कॅश भरणाऱ्या कंपनीमध्ये यूट्युबरचा डल्ला.