Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रात दिवसभरात काय काय होतंय राजकारणापासून इतर गोष्टींविषयी देखील सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
10 Jan 2025, 10:11 वाजता
दिल्ली निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये फूट
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या आपच्या विजयाबाबतच्या वक्तव्यावरून संदीप दीक्षितांची चव्हाणांवर टीका... आपची धोरणं चांगली तर दिल्लीतील एका जागेवर आपकडून लढावं.
10 Jan 2025, 10:10 वाजता
तिरुपतीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीबाबत चंद्राबाबू नायडूंकडून आदेश
तिरुपतीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीबाबत न्यायालयीन चौकशीचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंकडून आदेश. डिएसपी, गौशाळा संचालकांसह तिघेजण निलबिंत.. दोन अधिकाऱ्यांची बदली, चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू...
10 Jan 2025, 10:08 वाजता
चित्तोडगडच्या सांवलिया सेठ मंदिरात भाविकांनी केलं रेकॉर्डब्रेक दान
चित्तोडगडच्या सांवलिया सेठ मंदिरात भाविकांनी दिलेल्या दानाचा रेकॉर्डब्रेक विक्रम. सांवलिया सेठला भाविकांकडून 23 कोटी 12 लाख रुपये रोख, 1 किलो सोनं आणि 90 किलो चांदीचं दान
10 Jan 2025, 10:06 वाजता
प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याची तयारी अंतिम टप्प्यात
प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याला उरले अवघे 2 दिवस, 13 तारखेपासून देशातील सर्वात मोठं महाकुंभ, प्रयागराजमधील तयारी अंतिम टप्प्यात
10 Jan 2025, 10:06 वाजता
वैकुंठ एकादशीनिमित्त त्रिचीच्या रंगनाथस्वामी मंदिरात भाविकांची गर्दी
वैकुंठ एकादशीनिमित्त त्रिचीच्या रंगनाथस्वामी मंदिरात भाविकांची गर्दी, वर्षातून एकदा उघडलं जातं वैकुंठ द्वार, भगवान रंगनाथांच्या पालखी सोहळ्याची प्रथा
10 Jan 2025, 10:04 वाजता
आसामच्या दिमा हसाओ कोळसा खाणीत अडकलेल्या मजुरांचं बचावकार्य सुरूच
आसामच्या दिमा हसाओ कोळसा खाणीत अडकलेल्या मजुरांचं 4 दिवसांपासून बचावकार्य सुरूच, अद्याप एकाच कामगाराचा मृतदेह सापडला, 8 कामगारांचा शोध सुरू
10 Jan 2025, 10:03 वाजता
वाढती वाहतूक कोंडी आणि रस्ते अपघातावरून सरकार नवीन वाहन धोरणांच्या तयारीत
वाढती वाहतूक कोंडी आणि रस्ते अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार नवीन वाहन धोरण आणणार. परिवहन विभागाचा 100 दिवसात आराखडा तयार होणार.