Maharashtra Breaking News LIVE Updates: गोळीबाराच्या घटनेनं जळगाव जिल्हा हादरला

Maharashtra Breaking News LIVE Updates: दिवसभरात काय काय झालं सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर   

Maharashtra Breaking News LIVE Updates: गोळीबाराच्या घटनेनं जळगाव जिल्हा हादरला

Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रात दिवसभरात काय काय होतंय राजकारणापासून इतर गोष्टींविषयी देखील सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर 

 

10 Jan 2025, 14:50 वाजता

नाशिकमध्ये 44 आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना खराब अन्नपुरवठा

नाशिक मधील 44 आदिवासी आश्रम शाळांना सेंट्रल किचनमधून खराब अन्नाचा पुरवठा केला जात असल्याचा दावा आमदार हिरामण खोसकर यांनी केलाय. या किचनमधून 18 हजार विद्यार्थ्यांना सडका भाजीपाला, किडलेले कडधान्य आणि कच्च्या पोळ्या पुरवल्या जातायेत, असा दावा खोसकरांनी केलाय. त्यांनी मुंडेगावच्या या किचनवर अचानक छापा टाकला. या पाहणीतून हा धक्कादायक प्रकार समोर आल्याचं त्यांनी म्हटलंय. या प्रकारणी खोसकरांनी सेंट्रल किचनच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. मंत्रालयात बैठक घेऊन दोषींचं निलंबन करणार, असा इशारा खोसकरांनी केलाय.

 

10 Jan 2025, 14:48 वाजता

शिवसेना UBTअजून झोपेतून जागी व्हायला तयार नाही - अमोल कोल्हे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अमोल कोल्हेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसवर टीका केलीये. काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही. शिवसेना UBT अजून झोपेतून जागी व्हायला तयार नाही असा हल्लाबोल कोल्हेंनी केलाय.

 

10 Jan 2025, 14:46 वाजता

विजय वडेट्टीवारांच्या आरोपांमुळे मविआत भूकंप?

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी मविआला घरचा आहेर दिलाय. जागावाटपात घातलेल्या घोळाचा फटका बसल्याचं वडेट्टीवार म्हणालेत. जागावाटपचा घोळ दोन दिवसात संपला असता तर प्रचार आणि प्लॅनिंगसाठी वेळ मिळाला असता असं वडेट्टीवार म्हणालेत. अप्रत्यक्षपणे त्यांनी नाना पटोले आणि संजय राऊतांना यासाठी जबाबदार धरलंय. तर राऊतानीही यावर उत्तर देताना काँग्रेसवर खापर फोडलंय. यामुळे काँग्रेस आणि शिवसेना UBTयांच्यातील या आरोप प्रत्यारोपांवरुन मविआत वादाची ठिणगी पडलीये.

 

10 Jan 2025, 14:45 वाजता

अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही - उद्धव ठाकरे

पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. ज्याला जायचं आहे त्यांनी जा, मी कोणाला थांबवणार नाही, पक्षाचा शिवसैनिक लढणारा आणि जिंकणारा आहे असल्याचा संदेश ठाकरेंनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पक्षात नाराजीचा सूर आळवणाऱ्या माजी नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांसमोर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. 

 

10 Jan 2025, 14:17 वाजता

सर्व जातीच्या...; घरांबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

सर्व जातीच्या सफाई कामगारांना वारसा हक्काने घरे मिळणार. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय. म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली माहिती. लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसांना घरे मिळण्याचा मार्ग मोकळा. वाल्मिकी, रुखी, मेहतर व अनुसूचित जाती वगळता इतर जातींना वारसा हक्काने नोकरी देण्यास स्थगिती होती.

10 Jan 2025, 13:44 वाजता

गोळीबाराच्या घटनेनं जळगाव जिल्हा हादरला

जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार झालाय. चाळीसगावनंतर आता भुसावळमध्ये तरुणावर गोळीबार करण्यात आला. चहाच्या दुकानात या तरुणावर आरोपीनं 5 राऊंड फायर केले. यात एक तरुण गंभीर जखमी झालाय. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. 

10 Jan 2025, 13:40 वाजता

अंधेरीतील बारमध्ये छुप्या घरातून मुली येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल 

-अंधेरीतील एका बारमध्ये छुप्या घरातून मुली येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. 

-अंधेरीतील तो बार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे यांचा असल्याचा दावा केला जातोय

-ठाकरेंच्या नावावर बार असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय.

-व्हायरल व्हिडीओ करणाऱ्यांवर कारवाई करण्याची माजी खासदार विनायक राऊत यांची सायबर विभागाकडे केलीय.

10 Jan 2025, 13:22 वाजता

गुंडांना पोलिसांचा धाक नाही

पुण्यात गुंडांना पोलिसांचा धाक नाही. जामिनावर सुटलेल्या गुंडाची पुण्यात रॅली. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांची कारवाई.

10 Jan 2025, 12:40 वाजता

भाजपमध्ये घरवापसी?

भाजपमध्ये  प्रवेशासाठी दिग्गज नेते  रांगेत असल्याची माहिती आहे
 - विधानसभेसाठी भाजप सोडणारे घरवापसीच्या तयारीत
 - भाजपमध्ये परतीसाठी भेटीगाठी
 - भाजप घरवापसीचा निर्णय विचार करून घेणार
 - राजन तेली, समरजीत घाटगे, संजय काका पाटील भाजप प्रवेशासाठी रांगेत असल्याची   माहिती सूत्रांना दिलीय.. 

 

10 Jan 2025, 11:30 वाजता

मुंबईत ठाकरे गटाला धक्का? 

ठाकरेंच्या माजी नगरसेवकांचा नाराजीचा सूर. पक्षाकडून विश्वासात घेतलं जात नसल्याची खंत असल्याची सूत्रांची माहिती...