Breaking News LIVE : बदलापूर, कोलकाता घटनेचे पडसाद; न्यायालयांनी दखल घेत उचलली मोठी पावलं. राज्याच्या राजकारणात आजही आरोप प्रत्यारोप की आणखी काही? पाहा Live Updates
22 Aug 2024, 11:10 वाजता
Breaking News LIVE : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बैठकीला सुरुवात.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बैठकीला सुरुवात झाली असून या बैठकीत दोन मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. आयबीपीएसची परीक्षा आणि एमपीएससी राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आलेय यावर राज्यसेवेच्या परीक्षा ची तारीख पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केलेय यावर होणार चर्चा.
22 Aug 2024, 11:06 वाजता
Breaking News LIVE : मुख्यमंत्र्यांचा अर्धा दिवस तर... संजय राऊतांचा घणाघात
बदलापूरमधील शाळेमध्ये अल्पवयीन मुलींवर करण्यात आलेल्या अत्याचारांनंतर नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देत बदलापूरमध्ये मोठा जनसमुदार आंदोलन करताना दिसला. या आंदोलनाला राजकीय वळण देणाऱ्या नेतेमंडळी आणि मुख्यमंत्र्यांवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी शाब्दिक वार केले. मुख्यमंत्र्यांनी आंदोलनावर व्यक्त केलेल्या संशयानंतर त्यांनी संशय करणं स्वाभाविक असल्याचं म्हणत ते एक संशया आत्मा आहेत असं राऊत म्हणाले. त्यांचा अर्धा दिवस जादूटोणा मंत्र तंत्र यामध्ये जातो.. त्यांना संशय होणारच.. बदलापूरचे लाखो लोक रस्त्यावर उतरले ते सुद्धा जादूटोणा केला असेल असे त्यांना वाटेल, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याता खरपूस समाचार घेतला.
22 Aug 2024, 10:11 वाजता
Breaking News LIVE : पुणे कल्याणीनगर कार अपघातप्रकरणी आज निकाल
कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर आज निकाल. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपींच्या जामीन अर्जावर न्यायालय निकाल देणार आहे. आरोपींच्या जामीन अर्जावर सरकार पक्ष आणि बचाव पक्षाने युक्तिवाद पूर्ण केला आहे. अल्पवयीन मुलाचे वडील विशाल सुरेंद्र अगरवाल, आई शिवानी, ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, अश्फाक मकानदार, अमर गायकवाड यांनी जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यामुळे आज पुणे न्यायालय कुणाकुणाला जामीन देत याकडे लक्ष असणार आहे.
22 Aug 2024, 09:52 वाजता
Breaking News LIVE : दोन लाख रुपये बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याला अटक
गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक कारवायांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या व मौजा कापेवंचा येथील निरपराध ग्रामस्थाच्या खुनामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या एका कट्टर नक्षलवाद्याला अटक केली. जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 89 नक्षल्याना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. भंगारामपेठा जंगल परिसरामध्ये उप-पोस्टे दामरंचा पोलीस पथक व सीआरपीएफ जी-9 बटा. चे जवान नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना त्यांना प्रमोद मधुकर कोडापे, वय 37 वर्षे, रा. भंगारामपेठा, ता. अहेरी, जि. गडचिरोली हा व्यक्ती आढळून आला. तो कट्टर नक्षल समर्थक व नक्षली काम करणारा असल्याचे निष्पन्न झाले.
22 Aug 2024, 09:51 वाजता
Breaking News LIVE : अफवांवर विश्वास ठेवू नका
बदलापूर शहरात सोशल मीडियावर वरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलं असून कोणी चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर पसरवत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं बदलापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी सांगितलं.
22 Aug 2024, 09:16 वाजता
Breaking News LIVE : एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब...
एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच विमान तातडीनं तिरुवअनंतपूरम इथं लँड करण्यात आलं. बॉम्ब असल्याची माहिती मिळताच आपात्कालीन सूचनाही देम्यात आला. ज्यानंतर हे विमान आयसोलेशन बे मध्येपाठवण्यात आलं असून, त्यातून प्रवाशांना बाहेर काढलं जात आहे.
22 Aug 2024, 09:02 वाजता
Breaking News LIVE : कोलकाता महिला डॉक्टर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरण
कोलकाता महिला डॉक्टर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. सीबीआय आज स्टेटस रिपोर्ट कोर्टासमोर सादर करणार असून, आतापर्यंत सीबीआयकडून चार लोकांची चौकशी करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल सरकार आणि सीबीआय आज कोर्टासमोर काय मत मांडणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. घटना घडल्यानंतर सुप्रीम कोर्टाने स्वतःहून दखल घेत हे प्रकरण हाती घेतलं होतं.
22 Aug 2024, 08:35 वाजता
Breaking News LIVE : शरद पवारांच्या सुरक्षेत वाढ
शरद पवारांच्या सुरक्षेत वाढ. पवारांना आता केंद्राचीही सुरक्षा देण्यात आली असून, त्यांना Z + सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये CRPFचे 10 कमांडो पवारांसोबत असणर आहेत.
22 Aug 2024, 08:35 वाजता
Breaking News LIVE :आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल
सुप्रीम कोर्टाने SC/ST आरक्षणाच्या बाबत दिलेल्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल. वकील जयश्री लक्ष्मणराव पाटील यांनी दाखल केली याचिका. इंदिरा साहनी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मागासवर्गीयांच्या उप-वर्गीकरणाबाबत केलेले स्पष्टीकरण SC/ST आरक्षणाला लागू होत नाही. 'राज्य किंवा केंद्र सरकारला अनुसूचित जातींचे वर्गीकरण किंवा उप-वर्गीकरण करण्याचा अधिकार नसून संविधानाच्या कलम 341 आणि 342 नुसार फक्त राष्ट्रपती आणि संसदेला हा अधिकार आहे' जयश्री पाटील यांची याचिकेत मागणी. आता सुप्रीम कोर्ट आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करणार का हे पाहणं महत्वाचं.
22 Aug 2024, 08:06 वाजता
Breaking News LIVE : प्रचार यात्रा पुढे ढकलण्यात आली
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर होणारी महायुतीची प्रचार यात्रा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. राज्याच्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्यामुळे प्रचार यात्रेच्या नियोजनात बदल करण्यात आलाय.