Breaking News LIVE : राज ठाकरेंच्या बैठकीनंतर चंद्रपुरात मनसेच्या दोन गटात राडा

Breaking News LIVE : बदलापूर, कोलकाता घटनेचे पडसाद; न्यायालयांनी दखल घेत उचलली मोठी पावलं 

Breaking News LIVE : राज ठाकरेंच्या बैठकीनंतर चंद्रपुरात मनसेच्या दोन गटात राडा

Breaking News LIVE : बदलापूर, कोलकाता घटनेचे पडसाद; न्यायालयांनी दखल घेत उचलली मोठी पावलं. राज्याच्या राजकारणात आजही आरोप प्रत्यारोप की आणखी काही? पाहा Live Updates 

22 Aug 2024, 19:28 वाजता

राज ठाकरेंच्या बैठकीनंतर चंद्रपुरात मनसेच्या दोन गटात राडा

राज ठाकरेंच्या बैठकीनंतर मनसेच्या दोन गटात राडा झाला आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघात सचिन भोयर यांच्या उमेदवारीला विरोध करत भोयर समर्थक आणि दुसरे इच्छुक चंद्रप्रकाश बोरकर समर्थकांमध्ये हा राडा झाला आहे. 

22 Aug 2024, 18:01 वाजता

कल्याणी नगर अपघात प्रकरणातील आरोपींचा जामीन फेटाळला

कल्याणी नगर अपघात प्रकरणातील आरोपींचा जामीन फेटाळण्यात आला आहे. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आई आणि वडील त्याचप्रमाणे ससून हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि इतरांसह सात जणांवर अल्पवयीन मुलाचे रक्त नमुने बदलण्याचा आरोप आहे. त्यांनी या प्रकरणांमध्ये पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. दोन महिन्यापूर्वी घडलेल्या या प्रकरणावर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर दोन्ही बाजूने युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आज निकाल दिला आहे. त्यामध्ये सर्व आरोपींचा जामीन फेटाळण्यात आला आहे.

22 Aug 2024, 16:41 वाजता

इक्बाल सिंह चहल यांची गृह विभागात बदली

इक्बाल सिंह चहल यांची गृह विभागात बदली झाली आहे. सुजाता सौनिक यांच्या जागेवर इक्बाल सिंह चहल यांची वर्णी लागली आहे. आता ते गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव असणार आहेत. मुंबई महापालिकेतील कारभार आणि कोविड काळातील भ्रष्टाचारावरून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

22 Aug 2024, 15:04 वाजता

कोलकाता बलात्कार-हत्याप्रकरणी पुढील सुनावणी 5 सप्टेंबरला

कोलकाता बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 5 सप्टेंबरला होणार आहे. निदर्शने करणाऱ्या डॉक्टरांविरोधात अटक, गुन्हा दाखल करणे अशा स्वरुपाची कोणतीही कारवाई करू नका असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिला आहे. 

22 Aug 2024, 14:44 वाजता

ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन

वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेसचं ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु आहे. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

22 Aug 2024, 14:19 वाजता

चार भिंतीच्या आत तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यात यावा, शिवसेना ठाकरे गटाची भूमिका

16 तारखेच्या मविआच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी करत त्या चेहऱ्याला आपला पाठिंबा दर्शवला होता. परंतु यावर काँग्रेस आणि शरद पवार गटाने ठोस उत्तर दिले नव्हते. त्यामुळे पुन्हा आता किमान चार भिंतीच्या आत तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याची भूमिका ठाकरे गटाने व्यक्त केल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. 

22 Aug 2024, 13:46 वाजता

फडणवीसांच्या नागपूरमधील निवासस्थानाला पोलीस छावणीचं स्वरुप

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान देवगिरीबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचा आंदोलनाची शक्यता आहे. धरमपेठ येथील निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुणाल राऊत आणि शिवानी वडेट्टीवार मोर्चात सहभागी झाले आहेत.

22 Aug 2024, 12:33 वाजता

Breaking News LIVE :   25 तारखेच्या एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्या 

एमपीएससी विद्यार्थी आंदोलनाला मोठं यश. 25 ऑगस्ट रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. अधिकृत X च्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल.

22 Aug 2024, 11:53 वाजता

Breaking News LIVE : बदलापूर पोलिसांच्या भूमिकेवर कोर्टाचे ताशेरे 

बदलापूर अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं बदलापूर पोलिसांवर ताशेरे ओढले. नुसतं निलंबन करून काय होणार? असा खडा सवाल उच्च न्यायालयानं विचारला. कायद्याचं पालन केलं गेलं आहे का? भारतीय न्याय संहितेत व्हिडिओ रेकॉर्डिंग ची अट आहे तसं झालं आहे का? असा कोर्टाचा सवाल. न्यायालयाकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवण्याची मागणी करत बदलापूर पोलिसांवर तीव्र शब्दांत नाराजी. 

22 Aug 2024, 11:53 वाजता

Breaking News LIVE : MPSC विद्यार्थ्यांकडून सरकारला अल्टीमेटम 

पुण्यातील MPSCच्या विद्यार्थ्यांनी सरकारला 20 मिनिटांचं अल्टिमेटम दिलंय. 20 मिनिटात निर्णय न आल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला आहे. त्यामुळे पुण्यातील विद्यार्थ्यांच आंदोलन अधिक आक्रमक होताना दिसतंय. आंदोलन विद्यार्थ्यासोबत आमदार रोहित पवारीही उपोषणाला बसले आहेत. 

दरम्यान पुण्यातील काही रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. इथं शास्त्री रस्त्यावरील एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे, तर दांडेकर पुलाकडे जाणारी वाहतूक वळवली आहे. हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यामुळे प्रचंड आरडा ओरडा आणि गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे.