Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

8 Jun 2024, 22:38 वाजता

कोकण, मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज

 

Rain Alert : मुंबईसह उपनगरांत पुढील 24 तासांसाठी ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा तसेच मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये... 

 

8 Jun 2024, 21:37 वाजता

'मराठा आंदोलनाचा निवडणुकीत फटका बसला', देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

 

Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या आंदोलनाचा फटका भाजपला बसल्याचं बोललं जातंय...याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दुजोरा दिला...मात्र, जास्त काळ हे टिकणार नसल्याचंही ते म्हणाले...तर मविआच्या पारड्यात मराठा मतं गेल्याचंही त्यांनी सांगितलं....त्याला उत्तर देताना मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी महायुती आणि मविआ दोघांमुळेही मराठा समाजाचं नुकसान झाल्याचं म्हणत...निवडणुका ही आकडेमोड नसते अशा शब्दांत फडणवीसांना सुनावलंय...आणि आरक्षण न दिल्यास विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार देऊ असा इशाराही जरांगेंनी दिलाय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

8 Jun 2024, 20:37 वाजता

'मविआच्या संकुचित वृत्तीचा वंचितला फटका', प्रकाश आंबेडकरांचा मविआवर गंभीर आरोप

 

Prakash Ambedkar on MVA : लोकसभा निवडणुकीतील पराभव स्वीकार करत डॉ. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केलेत....महाविकास आघाडीतील काही घटकांनी जाणीवपूर्वक वंचित बहुजन आघाडीला सामावून घेतलं नसल्याचा आरोप आंबेडकरांनी केलाय...वंचित बहुजन आघाडीचा झालेला अपमान आणि महाविकास आघाडीकडून वंचितला मिळालेली संकुचित वागणून हे मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी कमी पडल्याचंही आंबेडकर म्हणालेत...त्यांनी यासंदर्भात एक पत्र प्रकाशीत करत त्यांना मविआचा समाचार घेतलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

8 Jun 2024, 19:36 वाजता

'रावसाहेब दानवेंचा पराभव झाल्यास टोपी काढणार', अब्दुल सत्तारांचं वक्तव्य

 

Abdul Sattar on Raosaheb Danve : रावसाहेब दानवेंचा पराभव झाल्यास टोपी काढणार असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले होते..त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते...आता हा प्रश्न विचारला असता त्यांनी विधानसभेनंतर कार्यक्रम घेऊन टोपी काढणार असल्याचं ते म्हणालेत...तर सत्तारांनी बोलावल्यास त्यांच्या टोपी काढण्याच्या कार्यक्रमाला जाणार असल्याचं दानवे म्हणालेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

8 Jun 2024, 19:11 वाजता

पुण्यामध्ये जोरदार पाऊस

 

Pune Rain : पुण्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलीये...अनेक ठिकाणी गेल्या दीड तासापासून जोरदार पाऊस बरसतोय... त्यामुळे रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झालीये.. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले.... तर काही भागात पावसामुळे वाहतूक कोंडी झालीये... यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होतायेत....

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

8 Jun 2024, 18:14 वाजता

'पुन्हा उठून उभा राहणार आणि लढत राहणार', लोकसभा पराभवानंतर रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया

 

Ravindra Dhangekar : आज यश मिळालं म्हणून उद्याही मिळेलच या भ्रमात भाजपने राहू नये. माझा पराभव झाला असला तरी पुन्हा उठून उभा राहणार आणि लढत राहणार अशी प्रतिक्रिया पुण्यातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दिलीय.आगामी विधानसभा निवडणुकीत मविआचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

8 Jun 2024, 17:34 वाजता

राहुल गांधी लोकसभा विरोधी पक्षनेते?

 

Rahul Gandhi :  दिल्लीमध्ये काँग्रेस संसदीय समितीची बैठकी सुरु. यामध्ये लोकसभा विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दरम्यान राहुल गांधी यांची लोकसभा विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करावी असा ठराव, काँग्रेस कार्यकारिणीध्ये दुपारी एकमतानं मंजूर करण्यात आला. तसंच राहुल गांधींनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावं, असं मतही अनेक सदस्यांनी यावेळी मांडलं. तर याबाबत विचार करायला वेळ द्यावा अशी विनंती राहुल यांनी केली. 

8 Jun 2024, 16:11 वाजता

'झेपत नसेल तर आम्ही तयार आहोत', सुप्रिया सुळेंची टीका

 

Supriya Sule : नेतृत्त्वात बदल करा किंवा नका करु.. झेपत नसेल तर आम्ही तयार आहोत.. असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.. संघानं नेतृत्त्वात बदल करण्याचा निर्णय घेतल्याच्या बातमीवर त्यांनी ही प्रतिक्रीया दिलीये.. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय चर्चेला उधाण आलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

8 Jun 2024, 15:47 वाजता

'विधानसभेत महायुती 130 जागांवर आघाडीवर', देवेंद्र फडणवीस यांचा दावा

 

Devendra Fadnavis Live | Marathi News LIVE Today : गुंतवणुकीत राज्य प्रथम क्रमांकावर आणलं....भाजपनं मराठा समाजाला सवलती दिल्या...गुजरातहून जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात...आपलं राजकीय गणित चुकलं...मराठी माणसानं ठाकरे गटाला मत दिलं नाही...उद्धव ठाकरेंना सहानुभूती असा नरेटिव्ह...ठाणे ते कोकणपर्यंत ठाकरेंना जागा नाही...विशिष्ट समाजाच्या मतांवर ठाकरे निवडून आले...ठाकरेंना लोकांनी हद्दपार केलं...ठाकरेंना असलेली सहानुभूती दिसली नाही...देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका...पराभवाचं खापर एकमेकांवर फोडू नका...विधानसभेत महायुती 130 जागांवर आघाडीवर...देवेंद्र फडणवीस यांचा दावा

8 Jun 2024, 15:25 वाजता

'पडलेले किल्ले आम्ही पुन्हा जिंकणार', देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

 

Devendra Fadnavis Live | Marathi News LIVE Today : महाराष्ट्रात अपेक्षित यश आलं नाही....नव्याने रणनीती ठरवणार...अपयशाची कारणं आपण शोधून काढू...फडणवीस पळणारा व्यक्ती नाही...अपयशाची जबाबदारी माझी...पडलेले किल्ले आम्ही पुन्हा जिंकणार...देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास...विधानसभेच्या तोंडावर माझ्याकडे रणनीती...आम्ही कुठे तरी कमी पडलो...आंध्र प्रदेश, ओडिशात भाजप सरकार आलं...आपण 3 पक्षांशी लढत नव्हतो...खोटा नरेटिव्हशीही आपण लढत होतो...मोदींवर लोकांनी विश्वास दाखवला...संविधान बदलणार असं पसरवलं गेलं...भारताचं  संविधान सर्वात महत्त्वाचं...राज्यातील उद्योग पळवण्याचाही नरेटिव्ह...देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य.