10 Dec 2023, 23:05 वाजता
सुषमा अंधारेंविरोधात कांदे समर्थकांची जोरदार घोषणाबाजी
Slogan against Sushma Andhare : मनमाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आलीय. आमदार सुहास कांदे यांच्या समर्थकांनी ही घोषणाबाजी केलीय.. सुहास कांदे शिंदे गटाचे आमदार आहेत. त्यांच्या कार्यालयासमोर सुषमा अंधारे जात होत्या. यावेळी कांदे समर्थकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Dec 2023, 22:21 वाजता
नाशिकमध्ये कांदा लिलाव बंदी मागे घेण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय
Nashik Onion Auction : नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी विक्रीला सुरूवात होणाराय. नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी तालुका स्तरावर बैठका घेऊन हा निर्णय घेतला. त्यानुसार पिंपळगावसह इतर बाजार समित्या सकाळच्या वेळेत सुरू होतील. तर लासलगाव बाजार समिती दुपारी 2 वाजता सुरू होईल. कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवण्याची घोषणा केली होती. मात्र नाशकात कांद्याची आवक वाढल्यानं पुन्हा कांदा खरेदी विक्री सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Dec 2023, 19:54 वाजता
मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प, माणगावजवळ वाहनांच्या रांगा
Raigad Traffic : रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प माणगाव जवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा. माणगाव ते ढालघर फाट्यापर्यंत पोहोचली वाहनांची रांग. बेशिस्त वाहन चालकांचा वाहतुकीला फटका.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Dec 2023, 19:11 वाजता
कांदाप्रश्नी आजच तोडगा निघण्याची शक्यता- दादा भुसे
Dada Bhuse on Onion : कांदाप्रश्नी नाशिकमधील व्यापाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर आजच तोडगा निघेल असा विश्वास पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केलाय. कांदा निर्यात बंदी विरोधात नाशिक जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी विक्री बंद केल्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय. या हंगामात येणाऱ्या लाल कांदा हा जास्त टिकवण क्षमतेचा नसल्याने तो तातडीने विकला जाण्याची गरज आहे परिणामी आज पालकमंत्री दादा भुसे यांनी तातडीची बैठक संध्याकाळी कांद्याच्या प्रमुख व्यापाऱ्यांसोबत बोलावलीय. यामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न असून जवळपास उद्यापासून बाजार समित्या सुरू करण्याची शक्यता पालकमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
10 Dec 2023, 18:00 वाजता
मुख्यमंत्री म्हणून विष्णूदेव साय यांच्या नावावर शिक्कामोर्तब
Chhattisgadh New CM : भाजपनं छत्तीसगडमध्ये नवा चेहरा दिलाय. मुख्यमंत्री म्हणून विष्णूदेव साय यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. आमदारांच्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झालंय. छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणून ते लवकरच शपथ घेतील.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Dec 2023, 13:33 वाजता
डर अच्छा है, आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर टीका
Aaditya Thackeray : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी राज्य सरकारने एसआयटी चौकशीची घोषणा केलीय. त्यावरच आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय.. डर अच्छा है असं म्हणत आदित्य ठाकरेंनी टोला लगावलाय.. ज्यांची सरकारला भीती वाटते त्यांना बदनाम केलं जातं अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Dec 2023, 13:17 वाजता
ऊसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
Sangali Swabhimani Protest : सांगली जिल्ह्यातील ऊस दर जाहीर करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगतील दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्यावर धडक दिलीये... कारखान्याच्या मुख्य गेटवर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करत कारखान्याच्या आत मध्ये घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला... मात्र पोलिसांनी या आंदोलकांना गेटवरच थांबवलं... त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झालीये.. या ठिकाणी राजू शेट्टीचे नेतृत्वाखाली आता काटाबंदी आंदोलन करण्यात येणार आहे.तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारखाना परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील असण्यात करण्यात आला आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Dec 2023, 13:01 वाजता
भेकडांच्या अंगावर कपडे राहिले नसते - पडळकर
Gopichand Padalkar : भेकडांच्या अंगावर एकही कपडे राहिले नसते अशी संतप्त प्रतिक्रिया गोपीचंद पडळकरांनी दिलीय.. इंदापूरमध्ये झालेल्या चप्पलफेकीवरुन पडळकरांनी थेट इशाराच दिलाय.. तसंच ओबीसी बांधवांनी याचा निषेध हिंसेचा मार्गाने न करण्याचं आवाहनही पडळकरांनी केलंय... इंदापूरच्या प्रशासकीय भवनासमोर दूध दरवाढीच्या मागणीसाठी दीपक काटे उपोषणाला बसले आहेत.त्यांची भेट घेण्यासाठी गोपीचंद पडळकर आले होते. तेव्हा मराठा कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर चप्पलफेक केली तसच त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Dec 2023, 12:40 वाजता
मुंबईवरील ड्रोन हल्ल्याचा कट उधळला
Mumbai Drone Attack : मुंबईवरील ड्रोन हल्ल्याचा कट NIAनं उधळून लावलाय.. शनिवारी NIAनं मुंबई, ठाणे, पुणे आणि कर्नाटकमध्ये संयुक्त कारवाई करुन ISISशी संबंधीत अनेक ठिकाणी छापेमारी केली होती.. या छापेमारीदरम्यान ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरिवली भागातून 15 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं.. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा, रोख रक्कम तसंच हमास या दहशतवादी संघटनेचे झेंडे जप्त करण्यात आलेत.. चौकशी दरम्यान हे सर्वजणं मुंबईवर ड्रोन हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं उघड झालंय.. बोरिवलीमध्ये राहाणारा साकीब नाचन हा या कटाचा मुख्य सूत्रधार आहे.. साकीब नाचन हा सीमी या दहशतवादी संघटनेचा कार्यकर्ता असून या आधीही तो अनेक दहशतवादी कारवाईमध्ये सहभागी होता..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Dec 2023, 11:49 वाजता
कुणबी नोंदी शोधण्यात अधिकाऱ्यांचा जातीवाद - मनोज जरांगे
Manoj Jarange Patil : कुणबी नोंदी शोधण्यात अधिकारी जातीवाद करतात असा गंभीर आरोप मनोज जरांगे-पाटील यांनी केलाय.. स्थानिक अधिकारी कामचुकारपणा करत असल्याने नोंदी सापडत नाहीत.. तेव्हा या अधिका-यांना निलंबित करण्याची मागणी जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलीय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -