10 Dec 2023, 11:48 वाजता
देवेंद्र फडणवीसांवरील विश्वास उडाला - मनोज जरांगे
Latur Manoj Jarange Patil : लातूर दौ-यादरम्यान मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केलीये... फडणवीसांनी पुन्हा मराठा समाजाच्या खोड्या काढण्यास सुरुवात केलीय त्यामुळे त्यांच्यावरील विश्वास उडू लागल्याचं जरांगे म्हणालेत.. त्यांच्या जवळचेच लोकं आता टीका करु लागलेत त्यामुळे फडणवीसांनी वेळीच शहाणं व्हावं असा इशार जरांगेंनी दिलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Dec 2023, 11:23 वाजता
जयंत पाटील आणि राजू शेट्टींमध्ये कलगीतुरा
Jayant Patil Vs Raju Shetty : उस दरावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील आणि स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख राजू शेट्टी यांच्यात कलगीतुरा रंगलाय. कुणाचे तरी नाव घ्यायचे त्यामुळे टीव्हीवर दिसतं, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी राजू शेट्टींची खिल्ली उडवली. तर पाटलांचं नाव घेऊन चर्चेत येण्याएवढी अधोगती झाली नाही, असा पलटवार शेट्टी यांनी केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Dec 2023, 10:36 वाजता
पुरातत्व खात्यातील कुणबी नोंदी तपासणार
Shinde Samiti : कुणबी नोंदी तपासण्यासाठी आता पुरातत्व खात्याकडील नोंदीही तपासल्या जाणार आहेत. पुण्यातील बैठकीत शिंदे समितीनं हा निर्णय घेतलाय. यामुळे कुणबी नोंदींचे आणखी पुरावे मिळण्याची शक्यता आहे.. मात्र या नोंदी तपासण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे कुणबी नोंदी तपासण्याचं काम सुरुच ठेवण्याचे आदेश शिंदे समितीनं दिलेत.. पुण्यातील बैठकीत आतापर्यंतच्या कामाचा आढावा घेण्यात आला. या कामावर शिंदे समितीनं समाधान व्यक्त केलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Dec 2023, 09:42 वाजता
कांदाप्रश्नी शरद पवार मैदानात
Sharad Pawar : कांदा निर्यातबंदीविरोधात आता स्वत: शरद पवार रस्त्यावर उतरणार आहेत.. कांदा निर्यातबंदीविरोधात नाशिकच्या चांदवडला होणा-या आंदोलनात शरद पवार उपस्थित राहणार आहेत.. 11 डिसेंबरला कांदा प्रश्न तसंच इतर विविध प्रश्नांवर चांदवडला शेतक-यांचा एल्गार होणार आहे.. मुंबई-आग्रा रोडवर चांदवडच्या चौफुलीला हे आंदोलन होईल.. कांदा निर्यातबंदीवर केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी पवार मैदानात उतरले आहेत.. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन शरद पवार गटाने केलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Dec 2023, 09:40 वाजता
आरक्षण आणि अवकाळीवरुन मविआ आक्रमक
Nagpur Winter Session MVA Morcha : हिवाळी अधिवेशनात सोमवारी आणि मंगळवारी मविआकडून धडक मोर्चा काढला जाणार आहे.. आरक्षण आणि अवकाळी पावसाच्या नुकसानीवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत.. सोमवारी आणि मंगळवारी मोर्चाच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शनाची त्यांनी तयारी केलीय. सोमवारी काँग्रेसने हल्लाबोल करण्याची तयारी केलीय. सोमवारी नाना पटोलेंच्या नेतृ्त्वाखाली काँग्रेसचा मोर्चा निघेल. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा मोर्चा मंगळवारी होणार आहे.. राष्ट्रवादीने शक्तिप्रदर्शनासाठी शरद पवार तसंच उद्धव ठाकरेंनाही बोलावलंय. तर दुसरीकडे धनगर आरक्षण तसंच जुन्या पेन्शनच्या मागणीसाठीही मोर्चा काढण्यात येणार आहे.. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचं मोठं आव्हान नागपूर पोलिसांसमोर आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Dec 2023, 09:38 वाजता
जुन्या पेन्शनसाठी आंध्र पॅटर्न?
Old Pension Scheme : हिवाळी अधिवेशनात सरकारच्या चिंतेत भर पडणार आहे.. कारण जुन्या पेंशनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी 14 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत... राजपत्रित अधिका-यांची संघटना 12 डिसेंबरला याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे.. दरम्यान पेंशनसाठी राज्य आंध्र प्रदेशच्या फॉर्म्युलावर विचार करण्याची शक्यता आहे.. आंध्र प्रदेशमध्ये निवृत्तीच्या वेळचं जे मुळ वेतन असेल त्यांच्या 50 टक्के रक्कम अधिक महागाई भत्ता मिळून आलेली रक्कम ही पेंशन म्हणून दिली जाते...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Dec 2023, 08:35 वाजता
शहापूर तालुक्यात कोट्यवधींचा धान्य घोटाळा
Shahapur Scam : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात कोट्यवधींचा धान्य घोटाळा झालाय.. साकडबाव इथल्या आदिवासी विकास प्रकल्पातील हजारो क्विंटल धान्य अधिका-यांच्या संगनमतानं परस्पर लंपास करण्यात आलंय.. याप्रकरणी आदिवासी विभागाचे तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक, उपप्रादेशिक व्यवस्थापक आणि विपणन निरिक्षकांसह 6 जणांवर किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शेतक-याच्या नावे खोट्या चलन पावत्या बनवून बोगस भात खरेदी दाखवण्यात आलीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Dec 2023, 08:16 वाजता
कार आणि ट्रकचा भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू
Uttar Pradesh Accident : उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. अपघातानंतर कारनं पेट घेतल्याने कारमधल्या 8 जणांचा होरपळून मत्यू झालाय. मृतांमध्ये एक लहान मुलांचा समावेश आहे. एक विवाह सोहळ्यासाठी ते बरेलीला गेले होते. विवाह सोहळा उरकून कार बहेडीकडं जात होती. मात्र टायर फुटल्यानं कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार डिव्हायडरला धडकून विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकवर आदळली. ट्रकनं कारला अनेक मीटर दूर फरफटत नेलं त्यानंतर कारसह ट्रकनेही पेट घेतला.
बातमी पाहा - धक्कादायक! कार आणि ट्रकचा भीषण अपघात, 8 जणांचा होरपळून मृत्यू
10 Dec 2023, 08:15 वाजता
शेतकरी संघटना निर्यातबंदीविरोधात आक्रमक
Sinnar Kanda Tharav : कांदा निर्यात बंदीविरोधात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झालीये.. निर्यात बंदीविरोधात थेट सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचा इशारा शेतकरी संघटनेनं दिलाय. सिन्नरमध्ये झालेल्या बैठकीत तीन ठराव मंजूर करण्यात आलेत.. कांदा निर्यातबंदीचा निर्णय तातडीने मागे घेण्याची विनंती या बैठकीत करण्यात आलीये..
10 Dec 2023, 07:49 वाजता
कांदाप्रश्नी फडणवीस आणि गोयल यांच्यात चर्चा
Devendra Fadanvis & Piyush Goyal Meet : कांदा निर्यातबंदीवरुन मोठी बातमी.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सह्याद्री अतिथीगृहावर केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यासोबत बैठक घेतली.. कांदा, कापूस आणि सोयाबीन प्रश्नावर ही बैठक होती.. शेतकरी हिताचे सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन गोयल यांनी या बैठकीत दिल्याची माहिती फडणवीसांनीदिलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -