12 Feb 2024, 11:10 वाजता
पुण्यात डासांचं वावटळ
Mosquito Tornado In Pune : पुण्यात चक्क मच्छरांचं वावटळ दिसून आलंय... पुण्यातल्या मुंढवा केशवनगर परिसरात हे डासांचं वादळ दिसून आलंय.. मुठा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी जमा झाल्यानं डासांची पैदास वाढलीये...त्यामुळे दोन दिवसात ही जलपर्णी स्वच्छ करा अन्यथा मनपा आयुक्तांना जलपर्णीची भेट देण्यात येईल असा इशारा शरद पवार गटानं दिलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
12 Feb 2024, 10:49 वाजता
जरांगे-पाटलांचा आरोग्य तपासणीसाठी नकार
Manoj Jarange : सलग तिस-या दिवशी जरांगे-पाटलांनी आरोग्य तपासणीसाठी नकार दिला त्यामुळे आल्या पाऊली डॉक्टरांचं पथक माघारी फिरलं. जरांगे पाटलांचा आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावलीय.. जरांगे उपचार घेत नसल्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवतोय..
बातमी पाहा - मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, आरोग्य तपासणीसाठी नकार दिल्यामुळे डॉक्टरांचं पथक फिरलं माघारी
12 Feb 2024, 10:13 वाजता
16 फेब्रुवारीला विधीमंडळाचं विशेष अधिवेशन
Vidhansabha Vishesh Adhiveshan : मराठा आरक्षणासाठीची महत्त्वाची बातमी.. 16 फेब्रुवारीला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं जाणार आहे, या अधिवेशनात मराठा मागास अहवालाला मंजुरी मिळणार आहे. त्यापूर्वी 14 फेब्रुवारीला कॅबिनेट बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. कॅबिनेटमध्ये मराठा अहवालाला मंजुरी मिळणार आहे, त्यानंतर सभागृहात अहवाल मांडण्यात येईल.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
12 Feb 2024, 09:11 वाजता
पंकजा मुंडे यांचं विधान पुन्हा चर्चेत
Pankaja Munde : आपल्या विधानांमुळे पंकजा मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आल्यात. विधानपरिषद-राज्यसभेसाठी आपल्या नावाची चर्चा का होतेय याचं कारणच पंकजांनी सांगितलंय. त्याचवेळी राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झालाय अशी खदखदही पंकजांनी बोलून दाखवली.. बीड तालुक्यात गाव चलो अभियानात पंकजा मुंडेंनी आपल्या मनातली सल बोलून दाखवली..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
12 Feb 2024, 08:44 वाजता
शेतकऱ्यांचा 'चलो दिल्ली'चा नारा
Farmer Protest : पंजाब आणि हरियाणातील 200 हून अधिक शेतकरी संघटना एकत्र आल्या आहेत...शेतमालाला हमीभाव मिळवा आणि विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी 'चलो दिल्ली'चा नारा दिलाय...उद्या 15 ते 20 हजार शेतक-यांचा मोर्चा दिल्लीत धडकणारे....त्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी शेतक-यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या बॉर्डर सील केल्या आहेत...हरियाणा लगतच्या टिकरी बॉर्डर, डबवाली बॉर्डर आणि सिंधू बॉर्डरवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय...बॅरिकेटिंगसह मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आलाय...तर केंद्रीय मंत्र्यांच्या शिष्टमंडळासोबत आज चर्चा होणार असल्याचा दावा शेतकरी नेते सरवन सिंघ पांढेर यांनी केलाय....पियुष गोयल, अर्जुन मुंडे आणि नित्यानंद राय हे चर्चा करण्यासाठी चंदिगडला येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
12 Feb 2024, 08:33 वाजता
नितीशकुमार सरकारची आज अग्निपरीक्षा
Bihar Floor Test : बिहारमध्ये आज नितीशकुमार सरकारची अग्निपरीक्षा आहे. लालू प्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलची साथ सोडत नितीशकुमारांनी भाजपसोबत शपथ घेतली. नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या नितीशकुमारांना आज बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. दुसरीकडे बहुमत चाचणीवरुन तेजस्वी यादवांनी नितीशकुमारांना आव्हान दिलंय. एनडीए आणि इंडिया आघाडीत फार कमी जागांची तफावत आहे. त्यात दोन्ही बाजूंचे अनेक आमदार क्रॉस व्होटिंग करतील या चर्चांमुळे राजकारण तापलंय. त्यामुळे राजद, जेडीयु, काँग्रेस आणि भाजप प्रत्येक पक्षानं आपआपल्या आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवलंय. खुद्द नितीशकुमार आणि अमित शाहांनी बिहारसाठी फ्लोअर टेस्टची कमान हाती घेतलीय अशी चर्चा आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
12 Feb 2024, 08:06 वाजता
भंडारा जिल्ह्यावर अवकाळीचं संकट
Bhandara Rain : भंडारा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सुध्दा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानी दमदार हजेरी लावलीये.. हवामान विभागाने तिन दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे. रात्रभर जिल्ह्यात सर्वत्र पाऊस बरसला असून या पावसाचा फाटका रब्बी पिकांसह भाजीपाल्यालाही बसणार आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
12 Feb 2024, 08:01 वाजता
मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम
Manoj Jarange Patil : सगे-सोयरे अध्यादेशाचं रूपांतर कायदयात करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसलेत. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे 9 मागण्या केल्यायत. मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिलाय. जरांगे उपोषणादरम्यान पाणी आणि औषधोपचार घेत नसल्यानं त्यांची प्रकृती खालावलीय. काल 3 वेळा डॉक्टरांचं पथक त्यांची तपासणी करण्यासाठी आलं. मात्र त्यांनी तपासणी करण्यासाठी नकार दिला. दरम्यान सरकार या उपोषणावर काय तोडगा काढतं हे आता पाहावं लागणारेय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
12 Feb 2024, 07:40 वाजता
आमदार अपात्रता निकालाप्रकरणी सुनावणी
MLA Disqualification : सुप्रीम कोर्टात आज आमदार अपात्रता निकालाप्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालाला ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. त्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
12 Feb 2024, 07:13 वाजता
भारताच्या कुटनीतीला मोठं यश
Quatar Indian Relased : कतार जेलमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आठही भारतीयांना मुक्त करण्यात आलंय. पंतप्रधान मोदी आणि भारत सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आठही भारतीय सुखरुप भारतात परतलेत.. सप्टेंबर 2023 मध्ये अल दहरा ग्लोबल कंपनीत काम करणा-या 8 माजी भारतीय नौदल अधिका-यांना हेरगिरीच्या आरोपांखाली अटक करण्यात आली होती, ऑक्टोबरमध्ये कतारच्या एका कोर्टानं त्यांना थेट फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर सातत्यानं भारत सरकारनं या 8 जणांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले होते.. डिसेंबर 2023 मध्ये दुबईतील COP 28 परिषदेत पंतप्रधान मोदी आणि कतरचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्यातही या मुद्द्यावर चर्चा झाली होती. अखेर भारताच्या प्रयत्नांना यश आलं आणि सर्व भारतीयांची सुटका झाली. हा भारताच्या कुटनीतीचा मोठा विजय मानला जातोय.. पंतप्रधान मोदींनी या प्रश्नी जातीनं लक्ष घातलं त्यामुळे सुखरुप भारतात परतलो अशी प्रतिक्रिया मायदेशी परतलेल्या सर्व माजी नौदल अधिका-यांनी दिलीय..
बातमी पाहा - भारत जिंकला! कतारमधील 'ते' माजी नौदल अधिकारी अखेर मायदेशी परतले; देशात पहिलं पाऊल ठेवताच म्हणाले...
बातमीचा व्हिडीओ पाहा -