धक्कादायक आकडेवारी! जळगावमध्ये गेल्या 10 महिन्यात 'इतक्या' शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

Jalgaon farmers committed suicide:  केळी आणि कापसासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात गेल्या 10 महिन्यात नैराश्यातून 137 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविलीये. 

Pravin Dabholkar | Updated: Nov 30, 2024, 04:45 PM IST
धक्कादायक आकडेवारी! जळगावमध्ये गेल्या 10 महिन्यात 'इतक्या' शेतकऱ्यांनी संपवलं जीवन title=
शेतकरी आत्महत्या

Jalgaon farmers committed suicide: महाराष्ट्रात शेतकऱ्यांची आत्महत्या हा अतिशय गंभीर विषय आहे. जो शेतकरी अन्न पिकवतो, जगाचा पोशिंदा असतो,त्याच्यावरच आत्महत्या करण्याची वेळ येणे हे खूपच दुर्देवी आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या 10 महिन्यात 137 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. कपाशीमुळे शेतकरी बेजार झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे. 
 
केळी आणि कापसासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात गेल्या 10 महिन्यात नैराश्यातून 137 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविलीये. शासकीय आकडेवरीतून हे कटू वास्तव समोर आलये. निसर्गाच्या लहरीपणामुळे वारंवार येणारी नापिकी व पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याचा मनोधैर्य पूर्त खचल्याचा दिसून येत आहे

खानदेशातील प्रमुख जळगाव जिल्ह्यात प्रामुख्याने कपाशीचं पीक घेतले जाते. कपाशी विक्रीसाठी बंधन असल्याने ही कपाशी सरकारलाच विकावी लागते सरकारने ठरवून दिलेल्या दरात केंद्रांवर त्यांच्या नियमाप्रमाणे ही कपाशी विकायला शेतकरी आणतो मात्र तिथल्या जाचक नियम आणि तरतुदीनुसार त्याला भाव कमी मिळतो त्यामुळे निराश झालेला शेतकरी अखेर मिळेल त्या भावात आपलं कपाशी पीक देऊन मोकळा होतो

सध्या जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टर लागवडीखाली सध्या रब्बी हंगामात हरबरा, गहू, ज्वारीसह सूर्यफूलाचीही लागवड केली जाते. याबरोबर कपाशी, ज्वारी, बाजरी या जिरायती वाणांसह केळीचे प्रामुख्याने पीक घेतलं जातं. मागील काही काळापासून दुष्काळ, अवकाळी पाऊस, तर अनेकदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नापिकीचा सामना करावा लागतोय . त्यात कहर म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून कापूस व सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे बजेट पूर्णतः कोलमडतये. यामुळेच कर्जबाजारीपणा व आर्थिक विवंचनेतून दर महिन्याला सरासरी 12 शेतकरी आत्महत्या करतायेत. जिल्हा प्रशासनाकडे मदत प्रस्तावासाठी आलेल्या निकषानुसार आतापर्यंत गेल्या दहा महिन्यात 136 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा समोर आले. सर्वाधिक आत्महत्या फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात झाल्या आहेत

कोणत्या महिन्यात किती आत्महत्या?

जानेवारीमध्ये 12, फेब्रुवारीमध्ये 18, मार्चमध्ये 14, एप्रिलमध्ये 18, मेमध्ये 14, जूनमध्ये 12, जुलैमध्ये 14, ऑगस्टमध्ये 10, सप्टेंबरमध्ये 12 तर ऑक्टोबरमध्ये 13 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

जळगाव जिल्ह्यात नेहमीच पाणीबाणी असल्याने पूर्व भागातील शेतकरी पावसाच्या भरवश्यावर शेती करतात. रावेर जामनेर भुसावळ हा भाग काहीसा पाणीदार आहे. त्यामुळे तेथील शेतकरी बागायती पिकवतो. कष्टकरी शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्थेला आता शासनाने कपाशीच्या खरेदी विक्री धोरणाचा पुनर्विचार करून हातभार लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे.