12 Mar 2023, 23:12 वाजता
महाविकास आघाडीच्या राज्यभरातील 7 सभांच्या तारखा जाहीर
Mahavikas Aghadi Sabha : महाविकास आघाडीच्या विभागवार जाहीर सभांच्या तारखा जाहीर झाल्यात... त्यानुसार येत्या 2 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरला पहिला सभा होणाराय. तर येत्या 11 जूनला अमरावतीत शेवटची सभा होणाराय. प्रत्येक विभागात एक या प्रमाणं नागपूर, मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि नाशिकमध्येही महाविकास आघाडीची एकत्रित सभा होणाराय.. या सभांची जबाबदारी विशिष्ट नेत्यांवर सोपवण्यात आलीय.
बातमी पाहा- मविआचं ठरलं, निवडणुकांसाठी मविआ लागली तयारीला, सभाचा धडाका लावणार, पाहा सभेचं वेळापत्रक
12 Mar 2023, 22:55 वाजता
आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप
Aditya Thackeray on Eknath Shinde : 'सीएम म्हणजे करप्ट माणूस' अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला... मुंबईतील रस्त्यांच्या कामात 600 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवसेनेची सत्ता आल्यानंतर घोटाळेबाजांना तुरुंगात टाकणार, असा इशाराही आदित्य ठाकरेंनी गोरेगावमधील शिवगर्जना अभियानात बोलताना दिला.
बातमी- "CM म्हणजे करप्ट माणूस, सत्ता आल्यानंतर घोटाळेबाजांना तुरुंगात टाकणार ", आदित्य ठाकरेंचा CMवर निशाणा
12 Mar 2023, 22:17 वाजता
मंत्री गुलाबराव पाटलांचं मोठं विधान
Gulabrao Patil : मंत्रिपद सोडण्याचा निर्णय म्हणजे सट्टा लावण्यासारखाच होता असं विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात केलंय.. उद्धव ठाकरे अडीच वर्षांच्या काळात लॉकडाऊन होते.. तेव्हा त्या सरकारमध्ये जलद गतीने काम करु न शकल्याची खंतही पाटील यांनी व्यक्त केली.. उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात असताना हातपाय जोडून त्यांना विनंती केली.. मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्यानं सोडून गेला असा पुनरुच्चारही गुलाबराव पाटील यांनी केलाय
12 Mar 2023, 20:38 वाजता
Aditya Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'भाजप आणि गद्दारांमध्ये वाद सुरू', 'राज्यातले प्रकल्प गुजरातमध्ये हलवलं', 'मुख्यमंत्री कार्यालय दिल्लीतून चालतं', 'माझ्या समोर जी बसलीय ती शिवसेना', 'आपल्या पाठीत खंजीर खुपसला', 'आपल्या सुवर्णकाळाला दृष्ट लागली', आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटाला टोला.
12 Mar 2023, 19:15 वाजता
उद्धव ठाकरे लवकरच पोहरादेवी दौरा करणार
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचा पोहरादेवीचा दौरा लवकरच ठरणार आहे. उद्या दुपारी साडे बारा वाजता मातोश्रीवर पोहरादेवीचे महंत सुनील महाराज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत उद्धव ठाकरे यांच्या पोहरा देवी दौऱ्यासंदर्भात चर्चा करणार आहेत. महंत सुनील महाराज यांनी ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला होता. यावेळी पोहरादेवीच्या दर्शनाला येण्याचा शब्द उद्धव ठाकरे यांनी दिला होता. डिसेंबरच्या 3 तारखेला उद्धव ठाकरे यांचा दौरा निश्चित झाला होता. परंतु काही कारणास्तव हा दौरा रद्द करण्यात आला होता. मालेगावच्या सभेनंतर उद्धव ठाकरे पोहरादेवीच्या दर्शनाला जाण्याची शक्यता आहे.
बातमी पाहा- उद्धव ठाकरे लवकरच पोहरादेवी दौरा करणार, पोहरादेवीचे महंत उद्धव ठाकरेंची भेट घेणार
12 Mar 2023, 18:45 वाजता
Sheetal Mhatre Live | Marathi News LIVE Today : 'स्त्रीचं चारित्र्यहनन सोपं', 'शिंदेंसोबत काम केल्यानंतर ट्रोलिंग', 'मातोश्री पेजवरून व्हिडिओ व्हायरल', 'सगळ्यात पहिला फोन शिंदेंचा', 'घाबरू नकोस, एकनाथ शिंदेंचा फोन','भाऊ तुझ्या पाठिशी, शिंदेंचा फोन', 'महिलेची बदनामी करून पक्ष मोठा होतो का?', शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंचा ठाकरे गटाला सवाल.
बातमी पाहा- मॉर्फ व्हिडिओवरून शीतल म्हात्रे संतापल्या, कोणावर केला व्हिडिओ व्हायरल?
12 Mar 2023, 18:09 वाजता
प्रकाश सुर्वे, शीतल म्हात्रेंचा मॉर्फ व्हिडिओ व्हायरल
Sheetal Mhatre Viral Video : शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा मॉर्फ व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय. त्यावरुन शीतल म्हात्रे चांगल्याच संतापल्या आहे. ठाकरे गटाने हा व्हिडिओ अश्लील मजकुरावर व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रेंनी केलाय. याप्रकरणी दहिसर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दहिसरमध्ये श्रीकृष्ण नगर पुलाच्या उद्गाटनासाठी आले होते. त्यावेळच्या रॅलीमधला एक व्हिडिओ मॉर्फ करुन व्हायरल केल्याचा आरोप आहे.
बातमी पाहा- व्हायरल व्हिडिओवरुन शितल म्हात्रे संतापल्या, ठाकरे गटावर केला मोठा आरोप
12 Mar 2023, 17:02 वाजता
पुण्यात महाविकास आघाडीची विराट सभा होणार
Mahavikas Aghadi Sabha : पुण्यात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची विराट सभा होणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर 14 मे ला महाविकास आघाडीची पुण्यात सभा होणार आहे. यामध्ये महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत.14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे आणि याच निमित्ताने पुण्यात महाविकास आघाडीची विराट सभा आयोजित करण्यात आली आहे
बातमी पाहा- पुण्यात मविआ करणार धमाका, कसब्याच्या विजयानंतर 14 मे रोजी मविआची विराट सभा, उद्धव ठाकरेंची उपस्थिती
12 Mar 2023, 15:04 वाजता
कृषिमंत्र्यांच्या तालुक्याला पीक नुकसानीच्या अहवालातून वगळलं
Abdul Sattar : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याच सोयगाव तालुक्याला अवकाळी पावसाच्या नुकसानीतून वगळण्यात आलंय... स्थानिक प्रशासनाने अर्थात तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पीक नुकसानीच्या अहवालात सोयगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शून्य टक्के नुकसान झाल्याचा अहवाल दिलाय....त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप उसळण्याची शक्यताय....प्रत्यक्षात सोयगाव तालुक्यात देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय...त्यामुळे प्रशासनाने बांधावर जाऊन पंचनामे न करता एसीमध्ये बसूनच पंचनामे केले की काय असा प्रश्न या अहवालावरून उपस्थित झालाय...
बातमी पाहा - अजब कारभार! मोठं नुकसान झालेल्या तालुक्यालाच पीक नुकसानीच्या अहवालातून वगळले
12 Mar 2023, 14:17 वाजता
गुजरातमध्ये पुन्हा पैशांचा पाऊस
Gujarat Valsad Money Rain : गुजरातच्या वलसाडमध्ये एका कार्यक्रमात पैशांचा पाऊस पडताना दिसला.. प्रसिद्ध गायक कीर्तिदान गढवी यांच्यावर नोटांची उधळण करण्यात आली.. लोकांनी 10, 20 आणि 100 रुपयांच्या नोटांचा वर्षाव केला.. वलसाडमधला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.. कीर्तिदान गढवी यांच्या पैशांचा पाऊस पडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.. याआधीसुद्धा अनेक कार्यक्रमात गढवींवर पैशांचा वर्षाव करण्यात आलाय..
बातमी पाहा - अरे बापरे! गुजरातमध्ये पैशांचा पाऊस; गायकावर उधळल्या नोटा