Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप

12 Mar 2023, 08:54 वाजता

बावधनची आज बगाड यात्रा

 

Satara Bagad Yatra : साता-यातील प्रसिद्ध बावधनची आज बगाड यात्रा आहे...रंगपंचमीच्या दिवशी ही यात्रा भरते...50 फुटी उंच लाकडी बगाडाला नवस बोललेल्या बगाड्याला बांधून बैल जोडीच्या सहाय्याने शेतातून पळवत नेण्याची अनोखी प्रथा आहे....सातारा जिल्ह्यातील बावधन हे गाव गुलाबी रंगानी न्हाहून निघते...बावधनचे बगाड राज्य भरात प्रसिद्ध आहे...हजारो भाविक हे अनोखी बागड यात्रा पाहण्यासाठी वाई गावापासून जवळच असणाऱ्या बावधन गावाला येत असतात....साडे तीनशे वर्षापासून या गावात ही यात्रा साजरी केली जाते..

बातमी पाहा - बगाड यात्रेसाठी हजारो भाविक बावधनमध्ये दाखल, नागरिकांचा उत्साह शिगेला

12 Mar 2023, 08:23 वाजता

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

 

Railway Megablock : सिग्नलयंत्रणा आणि रुळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी आज मुंबईत मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप-डाऊन फास्ट मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.35 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आहे. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे दरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार आहे.

बातमी पाहा - आज घराबाहेर पडण्याचा विचार करत आहात? मग मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी

12 Mar 2023, 08:02 वाजता

राज्य सरकारी कर्मचारी संपावर ठाम

 

State Government Employees : जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचारी संपावर ठाम आहेत.. या संपात आता आरोग्य कर्मचारीही सहभागी होणार आहेत.. मंगळवारपासून हा संप पुकारण्यात आलाय.. संपात  राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांतील परिचारिका, कक्षसेवक, सफाई कामगार सहभागी होणार आहेत. त्यामुळे आरोग्यसेवा ठप्प होऊन रुग्णांचे हाल होण्याची भीती आहे. राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तिवेतन योजना तात्काळ लागू करावी, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना तातडीने सेवेत कायम करावे, सर्व रिक्त पदे लवकरात लवकर भरावी, यासह अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघाने हा संप पुकारलाय.. दरम्यान कर्मचारी संघटनांची उद्या राज्य सरकारबरोबर बैठक होणार असून संप मागे घेऊन यशस्वी तोडगा काढण्यासाठी सरकारकडे दोन दिवसांचा अवधी आहे... 

बातमी पाहा - राज्य सरकारी कर्मचारी संपावर ठाम, रुग्णसेवा कोलमडणार

12 Mar 2023, 07:58 वाजता

मुंबईतही आजची उष्णतेची लाट

 

Heat Wave : उन्हाच्या तडाख्यानं मुंबईकरांच्या अंगाची लाही-लाही केलीय... मुंबईत शनिवारी रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद करण्यात आलीय.. शहर आणि उपनगरातला पारा तब्बल 38 अंशावर पोहोचला होता.. शनिवारी आलेली उष्णतेची लाट आजही मुंबईकरांना जाणवणार आहे.. तेव्हा दुपारच्या वेळी शक्यतो घराबाहेर पडू नका.. तसंच उन्हापासून काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलंय. 

बातमी पाहा - मुंबई तापली, रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद, उन्हाळ्यात कशी घ्याल काळजी