Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

12 May 2024, 11:32 वाजता

संजय राऊतांचा महायुतीवर घणाघात

 

Nashik Sanjay Raut : महाविकास आघाडी किमान 35 जागा जिंकतील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय.. तर 15 तारखेला पुन्हा नाशिक दौरा काढून मनपातील 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा बाहेर काढणार असल्याचं सुतोवाचही राऊतांनी केलंय. तर बावनकुळेंनी ठाकरेंच्या मुलाखतीवर केलेल्या टीकेचाही राऊतांनी समाचार घेतलाय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 May 2024, 10:44 वाजता

राऊत-ठाकरेंची मुलाखत काळू-बाळूचा तमाशा - चंद्रशेखर बावनकुळे

 

Chandrashekhar Bawankule : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीवर टीका केलीय.. ठाकरे-राऊतांची मुलाखत म्हणजे काळू-बाळूचा तमाशा अशी टीका बावनकुळेंनी केलीय.. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी काही प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असं म्हणत बावनकुळेंनी 5 प्रश्नांची यादीच ट्विट केलीय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 May 2024, 10:22 वाजता

निवडणूक आयोग त्यांचा नोकर - उद्धव ठाकरे

 

Uddhav Thackeray : शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टावरही अप्रत्यक्ष दबाव असल्याचा खळबळजनक आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय.. निवडणूक आयोग हा सत्ताधा-यांचा नोकर असल्याच्या आरोपाचाही उद्धव ठाकरेंनी पुनरुच्चार केलाय... शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली.. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी हे आरोप केलेत..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 May 2024, 10:21 वाजता

भाजप म्हणजे व्हॅक्यूम क्लीनर - उद्धव ठाकरे

 

Uddhav Thackeray : भ्रष्टाचा-यांना पक्षात घेणारी भारतीय जनता पार्टी म्हणजे व्हॅक्युम क्लीनर असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय... भ्रष्टाचा-यांना संरक्षण ही मोदींची गॅरंटी असल्याचं म्हणत ठाकरेंनी मोदींची खिल्ली उडवलीय. शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली.. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी हे आरोप केलेत.. नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचारमुक्त भारताची घोषणा केलीय असं राऊत म्हणाले. त्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी मोदींवर फटकेबाजी केलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 May 2024, 09:25 वाजता

पाचव्या टप्प्यासाठी प्रचाराचा सुपरसंडे

 

Loksabha Election 2024 : पाचव्या टप्प्यासाठी आज प्रचाराचा सुपर संडे आहे...मुंबईत अनिल देसाईंसाठी चिता कॅम्पमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होणाराय....तर शरद पवार, संजय राऊत, नाना पटोलेंची सभा भिवंडीतील मविआचे उमेदवार सुरेश म्हात्रेंसाठी होणार आहे....फडणवीस आज मुंबईत ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचारात सहभागी होणार आहेत...धुळ्यात शोभा बच्छाव यांच्यासाठी मल्लिकार्जुन खरगेंची सभा होणार आहे...तर मुंबईत आदित्य ठाकरे, अनिल देशमुख संजय दिना पाटलांसाठी सभा घेणार आहेत...दुसरीकडे दक्षिण मुंबईच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्यासाठी फडणवीस, नार्वेकरांची सभा होणाराय... 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 May 2024, 08:55 वाजता

संभाजीनगरमध्ये 39 लाखांची रोकड जप्त

 

Sambhajinagar Cash Seized : संभाजीनगरमध्ये रात्री उशिरा मोबाईल दुकानातून 39 लाख रुपये जप्त करण्यात आलेयत...यासोबत नोटा मोजण्याच्या मशिनसह चार आरोपींना अटक करण्यात आलीय. निवडणूक खर्च निरीक्षक आणि पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात शहरातील पैठण गेट येथील एका मोबाइलच्या दुकानात 39 लाखांची रोकड जप्त केलीय...याप्रकरणी रमेश खंडूजी बुधवंत, शैलेश राठोड, असलम खान इस्माइल, शेख रिझवान शेख शफिक या चौघांना अटक झाली. पोलिसांनी चौकशी केली असता हवालासाठी ही रक्कम असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळाला. त्यांनी चौघांना अटक करून रोकड जप्त केली.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 May 2024, 08:51 वाजता

शरद पवारांकडून मनोज जरांगेंचं कौतुक

 

Sharad Pawar On Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या भूमिकेचं शरद पवारांनी कौतुक केलंय.. जरांगे पाटलांची भूमिका काय हे समजून घेतली पाहिजे, त्यांना साथ दिली पाहिजे असं मोठं विधान शरद पवारांनी केलंय. बीडमधल्या सभेत शरद पवारांनी जरांगेंना पाठिंबा देण्याची घोषणा केल्यानं चर्चांना उधाण आलंय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 May 2024, 08:16 वाजता

संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर घणाघात

 

Sanjay Raut On Narendra Modi : मंगळसूत्रासंबंधी मोदींच्या टीकेवरुन संजय राऊतांनी जोरदार प्रहार केलाय. जुगा-याचा शेवटचा डाव मंगळसूत्र असतो.. मोदी मोठे जुगारी आहेत.. असा घणाघात राऊतांनी केलाय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -