15 Oct 2023, 22:25 वाजता
समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणी 2 RTO अधिकाऱ्यांना अटक
Samruddhi Highway Accident Case : संभाजी नगरमध्ये समृद्धी महामार्गावर झालेला अपघात आर टी ओ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे झाल्याचं प्रथम दर्शनी सिद्ध झालंय.. याप्रकरणी वैजापूर पोलिसांनी 2 आर टी ओ अधिका-यांना अटक केलीय.. प्रदीप छबुराव राठोड आणि नितीनकुमार गणोरकर अशी या आरटीओ अधिका-यांची नाव आहेत.. असिस्टंट इन्स्पेक्टर पदावर ते कार्यरत होते. त्या दोघांनाही सेवेतून तत्काळ निलंबित करण्यात आलंय.. याप्रकरणी ट्रक चालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय... समृद्धी महामार्गावरील या अपघाता १२ जणांचा मृत्यू झाला, तर २४ जण जखमी झालेत... समृद्धी महामार्गावर रात्रीच्या सुमारास आरटीओ एका ट्रकचा पाठलाग करत असताना हा अपघात घडला...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
15 Oct 2023, 21:36 वाजता
सोलापुरात चंद्रकांत पाटलांवर शाईफेकीचा प्रयत्न
Solapur Rada : सोलापुरात भीम आर्मीचा राडा केलाय. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांवर शाई फेकण्याचा प्रयत्न झालाय. खासगीकरणाच्या विरोधात भीम आर्मी संघटनेनं आवाज उठवला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करण्यात आला. पोलिसांनी भीम आर्मीचा शहर अध्यक्ष अजय मैंदर्गीकरला अटक केलीय. मागच्या वेळी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनं भंडारा उधळला होता, खबरदारीचा उपाय म्हणून त्या कार्यकर्त्याला पालकमंत्री येण्याअगोदरच ताब्यात घेण्यात आलं होतं.
15 Oct 2023, 20:20 वाजता
लातूरमध्ये फुग्यात हवा भरताना सिलेंडर स्फोट, एकाचा मृत्यू
Latur Cylinder Blast : लातूरमध्ये फुग्यात हवा भरताना सिलेंडर स्फोट झाल्यानं एक जण ठार तर सात मुलं गंभीर जखमी झाली आहेत. लातूरच्या तावरजा कॉलनीत ही दुर्घटना घडलीय. फुगे विक्रेता फुग्यात हवा भरत असताना सिलेंडरला स्फोट झाला. यात फुगे विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला. हा स्फोट एवढा भयानक होता की जवळच्या गाडीचाही चक्काचूर झाला. सर्व जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
15 Oct 2023, 19:30 वाजता
नवी मुंबईत व्यावसायिक इमारतीला भीषण आग
Navi Mumbai Fire : नवी मुंबईत एका व्यावसायिक इमारतीला भीषण आग लागलीय. महापे इथं पेट्रोलपंपाशेजारी ही सात मजली इमारत आहे. इमारतीच्या तिस-या मजल्यावर ही आग लागली. त्यानंतर ती चौथ्या मजल्यापर्यंत पसरली. या इमारतीमधील काही कार्यालयं आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहेत. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सुट्टीचा वार असल्यानं अनेक कार्यालयं बंद आहेत. इथं कुणीही अडकलं नसल्याची माहिती मिळतेय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
15 Oct 2023, 18:28 वाजता
Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'कंत्राटी पोलीस भरती राज्यासाठी घातक', 'असे निर्णय घेणारं सरकार बदलण्याची वेळ', 'या सरकारनं खासगीकरण सुरू केलंय', कंत्राटी भरतीवरून शरद पवार यांची राज्य सरकारवर टीका.
15 Oct 2023, 18:13 वाजता
Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'आपल्या पक्षातील काहींनी वेगळा मार्ग स्वीकारला', 'वेगळा मार्ग स्वीकारणाऱ्यांनी वेगळा अध्यक्षही निवडला', 'ही बैठक आत्मविश्वास वाढवणारी', 'संपूर्ण देशात भाजपा सोबत लोक जायला इच्छुक नाहीत'.' देशपातळीवर विचार केला तर बहुतेक राज्यात भाजपा विरोधी सत्ता आहे', 'सत्ता जनतेसाठी वापरायची असते' शरद पवार यांचा भाजपला टोला.
15 Oct 2023, 16:15 वाजता
Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'भाजपला कुणाचीही गरज वाटत नाही', 'मोदी स्टेडियममध्ये पाक खेळाडूंवर फुलांचा वर्षाव', 'ते आता विरोधकांच्या तोंडावर मास्क लावू लागलेत', 'आता होऊ जाऊ द्या चर्चा कार्यक्रम', 'मोदींनी चर्चेचं नंतर वाटोळं केलं', '2012मध्ये करून दाखवलं शब्दानं आम्हाला जिंकवलं','आताही आम्ही करू दाखवणारच', उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा.
15 Oct 2023, 16:06 वाजता
Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'शिवसेनेत सगळ्यात महत्त्वाचा गटप्रमुख', 'केडर आहे तर डर कशाला?', 'समाजवादीने दिशा दाखवली','लढाई विचारांची असते', 'संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात संघ कुठे होता?','समाजवादी, मुस्लीम माझ्यासोबत','आम्ही प्रवाहाविरोधात उडी मारली','देशावर प्रेम करणारे समाजवादी, मुस्लीम सोबत', 'स्वातंत्र्य लढ्यात संघाचं योगदान काय?','फुलेंच्या प्रयत्नांनी देशाला महिला राष्ट्रपती', उद्धव ठाकरे यांचं विधान.
15 Oct 2023, 15:59 वाजता
Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'मला कुटुंबप्रमुख म्हटल्याचा आनंद','माजी लाडके मुख्यमंत्री असं कुणी नाही','मी आहे तसा आहे, स्वीकारा किंवा नाकार','मी मुखवटा घालत नाही, आहे तसाच राहतो','माझ्यासोबत 21 पक्ष','ठाकरे-अत्रे वाद असला तरी अत्रे कायम मोठेच','आपले विचार वेगळे मात्र उद्देश एक आहे', उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य.
15 Oct 2023, 15:07 वाजता
नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त
Chhagan Bhujbal : नाशिकमधीन भुजबळांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय...दोन दिवसांपूर्वी भुजबळांना जीवे मारण्याची धमकी आली होती...आज भुजबळांचा वाढदिवस असल्याने अनेक कार्यकर्ते त्यांना भेटायला येत आहेत...त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भुजबळांना भेटायला आलेल्यांची मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी केली जातेय.