15 Oct 2023, 09:24 वाजता
विद्यार्थ्यांसाठी आधारसारखा 'अपार' आयडी
AAPAR ID For Students : शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी सर्वात मोठी बातमी... आता शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी आधारसारखाच अपार आयडी मिळणार आहे... राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने वन नेशन, वन स्टुडंट आयडी धोरण आखलंय.. तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याला आधारसारखाच कायमस्वरुपी युनिक क्रमांक मिळणार आहे.. या आयडीच्या माध्यमातून विद्यार्थ्याची शैक्षणिक माहिती डिजिटली साठवता येणार आहे.. तसंच त्याच्या शैक्षणिक प्रवासही मॉनिटरिंग करता येणार आहे. पालकांच्या समंतीनेच विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकावरुन अपार आयडी तयार केला जाईल.. विद्यार्थ्यांची ही माहिती मात्र गोपनीय ठेवली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीच्या कामामुळे आधीच शिक्षक तसंच मुख्याध्यापक वैतागलेले आहेत.. तेव्हा अपार आयडी तयार करण्याचं काम दिल्यास शिक्षकांकडून विरोध होण्याची शक्यता दिसतेय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
15 Oct 2023, 08:21 वाजता
शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात
Navratri 2023 : आज घटस्थापना..शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरूवात झाली. आजपासून नऊ दिवस घरोघरी घट बसवले जातात, देवीच्या दर्शनासाठी लांबचलांब रांगा लागतात. महाराष्ट्रभरात नवरात्रीचे हे नऊ दिवस उत्साह असतो. देवीची साडेतीन पिठं आता भक्तांनी फुलून जातील.. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची आई भवानी, माहूलची रेणूका आणि वणीची सत्पशृंगी मातेच्या दर्शनाला भाविक गर्दी करु लागलेत. भाविकांची कोणतिही गैरसोय होऊनये यासाठी प्रशासनाकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय.. या मंदिरांसह राज्यतील आदिशक्तीच्या प्रत्येक मंदिरांत जागर, गोंधळ आणि गरब्याचा उत्सव रंगणार आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा
15 Oct 2023, 08:11 वाजता
मराठा आंदोलकांचा समृद्धी महामार्गावर गोंधळ
Nashik Toll : अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या सभेनंतर मराठा आंदोलकांनी समृद्धी महामार्गावर गोंधळ घातला.. टोल न भरताच त्यांनी वाहने दामटली.. टोलनाक्यावर बार हाताने बाजुला करुन त्यांनी गाड्या समृद्धी महामार्गावर आणल्या.. कार्यकर्त्यांच्या या गोंधळामुळे समृद्धीच्या टोल वसूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयात शांत राहणे पसंत केले. विशेष म्हणजे औरंगाबाद ते सराटी दरम्यान चालणाऱ्या सर्व वाहनांसाठी राष्ट्रीय महामार्गाचा टोल सुद्धा पूर्णपणे खुला करून देण्यात आला होता.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
15 Oct 2023, 07:52 वाजता
राज्यात सामान्यांना वीजदरवाढीचा शॉक
Mahavitran : ऑक्टोबर हीटमुळे घामाच्या धारा निघत असतानाच सामान्यांना वीजदरवाढीचा शॉक बसलाय... महावितरणने इंधन समायोजन शुल्क आकारून वीज दरवाढ केलीय... घरगुती ग्राहकांना सप्टेंबरच्या बिलासाठी प्रति युनिट 35 पैसे जास्त मोजावे लागणार आहेत.. तर कृषी जोडणीसाठी प्रति युनिट 10 आणि 15 पैसे तसंच उद्योगांना प्रति युनिट 20 पैसे जास्त मोजावे लागणार आहेत.. ही वसुली येत्या काही महिन्यांत सुरु राहणार आहे.. दारिद्र्य रेषेखालील घरगुती ग्राहकांवरही याचा परिणाम होणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
15 Oct 2023, 07:48 वाजता
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 12 मृत्यू, 20 जखमी
Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय... टेम्पो ट्रॅव्हलर बस रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकला धडकून झालेल्या अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झालाय.. तर 20 प्रवासी जखमी झाले आहे.. या अपघातामध्ये आणखी एक धक्कादायक बातमी समोर आलीय.. वैजापूरजवळच्या जांबर गाव टोलनाक्यावर पोलिसांनी ट्रकला थांबवून बाजुला घेतलं.. तेव्हाच पाठीमागून भरधाव वेगाने येणारी बस ट्रकली धडकली.. बसमधले सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातल्या पाथर्डी आणि इंदिरानगरचे रहिवासी असल्याची माहिती मिळतेय.. हे प्रवासी सैलानी बाबांच्या दर्शनासाठी गेले होते. जखमींवर वैजापूर तसंच छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत..
बातमी पाहा - समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू; सैलानी बाबाच्या दर्शनास गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला
बातमीचा व्हिडीओ पाहा -