Amit Shah on Uddhav Thackeray : अमित शाहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Amit Shah on Uddhav Thackeray : अमित शाहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

19 Feb 2023, 22:20 वाजता

सत्तेसाठी पवारांच्या मांडीवर जाऊन बसले - अमित शाह

 

Amit Shah on Uddhav Thackeray : सत्तेसाठी पवारांच्या कुशीत जाऊन बसले, आता या गद्दारांना धडा शिकवूया असं म्हणत केंद्रीयमंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी उद्धव ठाकरेंवर(Uddhav Thackeray) जोरदार निशाणा साधलाय. भाजपला सत्तेचा मोह नाही, जास्त आमदार असतानाही एकनाथ शिंदेंना(Eknath Shinde) मुख्यमंत्री केलं हेही अमित शाहांनी सांगितलं. कोल्हापुरात भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात अमित शहांनी संपूर्ण विजयाचा निर्धार केला. 

बातमी पाहा - https://bit.ly/3xyhgT5

19 Feb 2023, 19:23 वाजता

दूध का दूध, पानी का पानी झालेलं नाही, सुप्रीम कोर्टाचा फैसला बाकी- उद्धव ठाकरे

 

Uddhav Thackeray targets Shinde-BJP : उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल केला. अमित शाहांचा 'मोगॅम्बो' असा उल्लेख त्यांनी केला. आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटतो, म्हणतात. 'आता कोण कुणाचं काय चाटतोय?' असा उलटसवालही उद्धव ठाकरेंनी केला आहे. अजून दूध का दूध, पानी का पानी झालेलं नाही... सुप्रीम कोर्टाचा फैसला बाकी आहे, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
धनुष्यबाण चोरलं, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल, आम्ही आमची मशाल घेऊन सामना करू- उद्धव ठाकरे  

बातमी पाहा - https://bit.ly/3Iyk890

19 Feb 2023, 16:40 वाजता

उद्या सुप्रीम कोर्टात धनुष्यबाण चिन्हासाठी ठाकरे गट याचिका करणार

 

Meeting of legal experts on Matoshree : उद्धव ठाकरेंच्या(Uddhav Thackeray) मातोश्री(Matoshree) निवासस्थानी कायदेतज्ज्ञांची बैठक सुरू आहे. उद्धव ठाकरे धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्व कायदेशीर पर्यायांची चर्चा करत आहेत. उद्या सुप्रीम कोर्टात धनुष्यबाणासाठी ठाकरे गट याचिका करणार आहे. त्याआधी ही बैठक सुरू आहे. या बैठकीला विनायक राऊत, अनिल देसाई, रवींद्र वायकर, अरविंद सावंत आदी नेते उपस्थित आहेत. 

बातमी पाहा - https://bit.ly/3YJgA9C

 

 

19 Feb 2023, 14:36 वाजता

संदीप देशपांडेंची संजय राऊतांवर टीका

 

Sandeep Deshpande on Sanjay Raut : संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत किळसवाणी भाषा वापरली. मी समोर असतो तर त्यांच्या कानाखाली लावली असती अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलीय. 

 

19 Feb 2023, 13:36 वाजता

पुण्यात उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी 

 

Pune Uddhav Thackeray Poster : पुण्यात उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray)समर्थनार्थ पोस्टरबाजी (Poster)करण्यात आलीय. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतरही शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असल्याचं या पोस्टरमधून सांगण्यात आलंय. सगळं चोरलं, मात्र ठाकरी बाणा आणि बाप कुठून चोरणार?' असा सवालही या पोस्टर्समधून करण्यात आलाय. पुण्याच्या धनकवडी भागात जागोजागी हे पोस्टर्स लागलेत.

19 Feb 2023, 13:13 वाजता

Amit Shah Live | Marathi News LIVE Today : 'शेतकऱ्यांसाठी शिवरायांचं कल्याणकारी राज्य', 'शेतकऱ्यांसाठी शिवरायांनी योजना आणल्या','देशात ग्रामआधारित अर्थनीतीचा पाया', 'उपभोगशून्य स्वामी म्हणजे महाराज','राज्याचं धन स्वत:साटी वापरलं नाही', केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं वक्तव्य. 

19 Feb 2023, 12:54 वाजता

Amit Shah Live | Marathi News LIVE Today : 'छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम','बाबासाहेब पुरंदरे यांनाही प्रणाम','बाबासाहेबांनी शिवरायांचं चरित्र मांडलं','बाबासाहेबांचं जीवन शिवरायांसाठी समर्पित' 'शिवसृष्टी हे ईश्वरीय कार्य','कार्य पुढे नेणारे आम्ही कोण?','शिवरायांचं जीवन आजही प्रेरणादायी', 'शिवचरित्र मांडताना देशभर पुरंदरे फिरले','जभरातून त्यांनी चरित्राचे पुरावे जमवले','पुरंदरे गोवा, दादरा नगर हवेली संग्रामातही', केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं वक्तव्य.  

 

19 Feb 2023, 11:52 वाजता

Raj Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'दिसेल ते विकायचं हे सध्या सुरू आहे', 'सरकारच्या गोष्टी विकायचं केवळ सुरू', 'भारत सुंदर आहे, अजून, सुंदर करता येईल', 'देश सुंदर करण्याची इच्छा शक्ती दिसत नाही', 'पाश्चात्यकरण म्हणजे विकास नाही', 'पाश्चात्यकरण ही संस्कृती झाली', 'दुबईत जमीन केवळ अरबांना मिळते', 'मराठीत जास्तीत जास्त बोला',';समोरचा हिंदीत बोलला तरी मराठीत बोला', राज ठाकरे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला.

19 Feb 2023, 11:41 वाजता

Raj Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'औरंगजेब 27 वर्षे महाराष्ट्रात राहिला','लढणाऱ्यांच्या प्रेरणेला तो शिवाजी म्हणत होता','125 वर्षे आपण हिंदप्रांतावर राज्य केलं', 'शिवाजी अजून मला छळतोय हे औरंगजेबाचं वाक्य', 'आपण त्यांचे वारसदार आहोत हे विसरू नका', 'कोणासमोर मिंधे होऊ नका','पाकिस्तानातील अटोक किल्ल्यावर झेंडे', 'जातीपातीच्या भानगडीत पडू नका','मित्र करताना कधीही जात पाहू नका','जातीचं राजकारण करणाऱ्याचं कल्याण करू नका', 'जातीतून काहीही हाती लागणार नाही', राज ठाकरे यांचं वक्तव्य. 

 

19 Feb 2023, 11:33 वाजता

Raj Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'माझ्या घरातून मराठी संस्का','आजोबा काका, वडिलांकडून मराठी संस्कार', 'सोशल मीडियावर व्यंगचित्र करायला आवडत नाही' ,'मार्मिकमध्ये मी व्यंगचित्र केली','त्यामुळे सध्या व्यंगचित्र मी करत नाही', 'सध्या व्यंगचित्र माझ्या भाषणातून दिसतं', 'छत्रपती शिवराय नीट समजून घ्या', 'शिववेडेपणाचा आव नको, बोध घ्या', 'इतिहासात लोकांनी काय केलंय ते समजून घ्या', राज ठाकरे यांचं वक्तव्य.