Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra BreakinNews Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

25 May 2023, 13:49 वाजता

Eknath Shinde Live | Marathi News LIVE : 'सर्वसामान्यांचे सुखाचे दिवस यावेत हेच ध्येय', 'अडीच वर्षांचा कारभार जनतेनं पाहिला', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. '350 निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे', 'आता तलाठी आणि ग्रामसेवक गावागावात जातायत', 'शासन आणि प्रशासन स्थाची 2 चाकं','सरकारी यंत्रणा अलर्ट झाल्यानं शेतकऱ्यांना लाभ', 'सरकार बदलल्यानंतर खूप बदल झाला', 'सरकारी काम 6 थांब ही संकल्पना नष्ट करणार','सरकार बदलल्यानंतर राज्यात वेगानं काम', 'शासनात पूर्वीसारखे स्पीडब्रेकर नाहीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य.

 

25 May 2023, 13:46 वाजता

अरविंद केजरीवाल घेणार शरद पवारांची भेट

 

Arvind Kejriwal will meet Sharad Pawar  : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेणार आहेत.. दुपारी साडेतीन वाजता नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे.. विरोधी पक्षांच्या नेत्यांची मोट बांधण्यासाठी केजरीवाल हे मुंबई दौ-यावर आलेत.. कालच त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.. आज पवारांसोबत होणा-या बैठकीत ते केंद्राच्या अध्यादेशाविरोधात चर्चा करणार आहेत.

 

25 May 2023, 12:40 वाजता

लोकसभेसाठी भाजपचा मास्टर प्लान

 

BJP Mission 2024 :  राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर महाराष्ट्र भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल होण्याचे संकेत आहेत. संघटनात्मक पातळीवर सर्व पदाधिकाऱ्यांची फेरनियुक्ती करण्यात येईल. राज्यातील 70 टक्के जिल्हाध्यक्ष भाजप बदलणारेय. तरुण पदाधिकाऱ्यांना जिल्हास्तरावर संधी देण्यात येईल. जुन्या जिल्हाध्यक्षांना लोकसभा मतदारसंघ बांधणीची जबाबदारी देण्यात येणारेय. त्यांच्या अनुभवानुसार लोकसभा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती होईल. तालुकाध्यक्ष आणि इतर महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांच्याही नेमणुका होणारेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 288 मतदारसंघात नव्यानं नियुक्ती दिसून येईल. 

बातमी पाहा- लोकसभा निवडणुकीसाठी भाजप लागलं तयारीला; पाहा भाजपचा मास्टरप्लान

 

 

25 May 2023, 12:13 वाजता

7 जूनला मान्सून तळकोकणात येणार

 

Monsoon Alert : 7 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात पोहोचण्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवलाय. अरबी समुद्राकडे बाष्पयुक्त वा-यांचा प्रवास सुरू होताच मान्सूनचा महाराष्ट्राकडे येण्याचा वेग वाढलाय. त्यामुळे केरळात 4 ऐवजी 1 जून रोजीच मान्सून येऊ शकतो. तसंच महाराष्ट्रात तळकोकणात 7 जूनपर्यंत दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. 27 मेपासून कोकणात हलका ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला असून, 27 मेपासून तेथे मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज देण्यात आलाय.

बातमी पाहा- आनंदाची बातमी! मान्सून 7 जूनला कोकणात पोहोचणार; हवामान खात्याचा अंदाज

25 May 2023, 11:43 वाजता

यंदाचा बारावीचा निकाल 91.25 टक्के

 

 

HSC Result : यंदा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागलाय. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा तर सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा लागलाय. यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारलीय. हा निकाल दुपारी 2 वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे...

25 May 2023, 11:24 वाजता

Devendra Fadnavis Live | Marathi News LIVE Today : 'इंदिराजींकडून महाराष्ट्र विधीमंडळाचं उद्घाटन', 'त्यावेळी राज्यपालांना निमंत्रण नव्हतं', 'संसद भवन 140 कोटी जनतेचं मंदिर', 'बहिष्कार घालणं म्हणजे लोकशाहीला नाकारणं', 'सत्ता, खुर्चीसाठी राजकारण सुरू', 'विरोधक हे खुर्चीचे व्यापारी','मोदींना बदनान करण्याटा विरोधकांचा डाव', 'विरोधकांचा बहिष्कार हा दुटप्पीपणा','विरोधकांकडे ना नेता, ना नीती', 'मोदींची लोकप्रियता पाहवत नाही','संसदेतील लायब्ररीचं उद्घाटन राजीव गांधीकडून', 'विरोध हे सत्तेचे सौदागर आहेत' 'मोदींशी मुकाबला करू शकत नसल्यानं एक झाले', 'बहिष्कार घालणं म्हणजे लोकशाहीला नाकारणं', नवीन संसद भवनाच्या वादावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल.

बातमी पाहा- देवेंद्र फडणवीस यांचा मास्टर स्ट्रोक! 20 विरोधीपक्षांना एकच उत्तर

25 May 2023, 10:49 वाजता

तेलंगणाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातून लोकसभा लढणार?

 

K. Chandrashekar Rao : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यताय. छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या दोन मतदार संघातून उमेदवारीसाठी त्यांची चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. महाराष्ट्रासह ते तेलंगणातूनही निवडणूक लढणार असल्याचं सूत्रांनी म्हटलंय. थेट मुख्यमंत्रीच मैदानात उतरले तर महाराष्ट्रातील इतर मतदारसंघांतील बीआरएसच्या उमेदवारांना त्याचा फायदा होईल तसंच आगामी विधानसभेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो असा अंदाज बांधण्यात येतोय. नुकतंच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळाल्यानंर बीआरएसनं महाराष्ट्रात मोर्चेबांधणी सुरू केलीये.

बातमी पाहा- K Chandrashekhar Rao महाराष्ट्रातून लढणार लोकसभा निवडणूक 

 

25 May 2023, 10:09 वाजता

टेस्ला प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न

 

Uday Samant on Tesla : टेस्ला प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे...टेस्ला प्रकल्पासाठी जे हवं ते सगळं देऊ, हवी तिथे जागा देऊ, तसंच इन्सेंटिव्हही देऊ अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी झी 24 तासला दिलीय...टेस्ला हा प्रकल्प महाराष्ट्रात आल्यास मोठी रोजगार निर्मिती होणार आहे.

बातमी पाहा- TESLA Project महाराष्ट्रात येणार? उदय सामंत यांनी कसली कंबर 

25 May 2023, 10:01 वाजता

Sanjay Raut Live | Marathi News LIVE Today : 'नव्या संसदेचं उद्घाटन राष्ट्रपतींनी करावी','मोदींनी राष्ट्रपतींना निमंत्रण द्यावं', खासदार संजय राऊत यांची मागणी. 'आम्ही विरोधक नाही तर आम्ही देशभक्त', 'देशभक्तांना दिल्लीत बोलवतच नाही', 'फडणवीस काल गद्दारांची गाडी चालवत होते', शिवडी न्हावा शेवा शेवा ब्रीज पाहणीवरून संजय राऊत यांचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला.

 

 

25 May 2023, 09:29 वाजता

अयोध्येत रामलल्लाची मूर्ती तयार करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू 

 

Ayodhya Ram Lala : अयोध्येत रामलल्लाची मूर्ती तयार करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. 11 वाजून 57 मिनिटाच्या मुहूर्तावर पूजा करून मूर्ती तयार करायला सुरुवात करण्यात आली. नोव्हेंबर महिन्यापर्यंत मूर्तीचं काम पूर्ण होणार आहे. म्हैसूरचे प्रसिद्ध मूर्तीकार गणेश भट्ट, विपिन भदौरिया आणि इतर तीन मूर्तीकार मूर्तीला आकार देत आहेत. मूर्तीची मूळ उंची 52 इंच असेल. तर फाउंडेशनपासून मूर्तीची उंची 8 फूट उंच असणारेय. राम मंदिराचं कामही 60 टक्के पूर्ण झालं असून, रामभक्तांना लवकरच रामलल्लाचं दर्शन घेता येणारेय.