26 May 2024, 11:39 वाजता
पुणे अपघातप्रकरणी 100 पेक्षा अधिक सीसीटीव्हींची तपासणी
Pune Car Accident Case : पुणे अपघात प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस अॅक्शनमध्ये......गुन्हे शाखेकडून 100 पेक्षा अधिक सीसीटीव्हींची तपासणी......अग्रवालच्या घरापासून पब, अपघातस्थळाचे फुटेज हाती.....गुन्हे शाखेच्या हाती अनेक धागेदोरे लागण्याची शक्यता
26 May 2024, 11:07 वाजता
नांदेड जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा
Nanded Water : नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा आता सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात केवळ 21 टँकर सुरू असले प्रत्यक्षात अनेक गावात मात्र तीव्र पाणीटंचाई आहे. सर्वाधिक पाणीटंचाई मुखेड तालुक्यात आहे. पाण्याचे स्रोत आटल्याने नागरिकांना पायपीट करत मिळेल तिथून पाणी आणावे लागत आहे
26 May 2024, 10:43 वाजता
मुख्यमंत्री शिंदे आज मुंबईतील नालेसफाईची पाहणी करणार
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईतल्या नालेसफाईची पाहणी करणार आहे. पावसाळापूर्वी मुख्यमंत्र्यांकडून ही पाहणी करण्यात येणारेय. पावसाळ्यात मुंबईकरांना पाणी तुंबण्याचा त्रास होऊ नये म्हणून पावलं उचलण्यात येतायत
26 May 2024, 10:11 वाजता
अकोला ठरलं विदर्भातील सर्वात उष्ण शहर
IMD Alert : अकोला जिल्ह्यातील तापमानाचा पारा 44 ते 45.8 अंश सेल्सिअसपर्यंत जातोय. त्यामुळे विदर्भात सर्वाधिक हॉट शहर म्हणून अकोल्याची नोंद झालीय. याच पार्श्वभूमीवर उष्माघाताचा धोका पाहता अकोला जिल्ह्यात ३१ मेपर्यंत कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिलेत. प्रादेशिक हवामान विभाग नागपूरनुसार 31 मे पर्यंत उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
26 May 2024, 09:34 वाजता
निलंबित आरोग्य अधिकाऱ्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Bhagwan Pawar : निलंबित आरोग्य अधिकाऱ्यानं थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून संबंधित मंत्र्यांवर गंभीर आरोप केलाय...संबंधित मंत्र्यांनी कात्रजच्या कार्यालयात बोलावून नियमबाह्य टेंडरची कामं आणि खरेदीसाठी दबाव आणला होता...मात्र, नियमबाह्य कामात मदत न केल्याने निलंबित केल्याचा आरोप भगवान पवार यांनी केलाय.
26 May 2024, 09:03 वाजता
जळगावच्या रावेरला वादळी पावसाचा तडाखा
Jalgaon Rain : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा बसलाय...यात शेकडो हेक्टरवरील केळीच्या बागा भुईसपाट झाल्यायत...मध्य प्रदेश महाराष्ट्रासीमेवरील हजारो हेक्टर वरील केळी बागांना वादळाचा फटका बसलाय...अटवडा, अजनाड, दोधे, नेहते, या पट्यात वादळाचा चांगलाच तडाखा बसल्याने अनेक ठिकाणी विद्युत खांब देखील पडले...यामुळे अनेक गावांचा विजपुरवठा खंडीत झालाय...ऐन कापणीला आलेल्या केळी पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय...
26 May 2024, 08:41 वाजता
राजकोटच्या टीआरपी गेम झोनमध्ये आग्नितांडव, 32 जणांचा मृत्यू
Rajkot TRP Game Zone fire : राजकोटच्या टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत होरपळून 9 मुलांसह 32 जणांचा मृत्यू झालाय.. या भीषण अग्नितांडवाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची घोषणा गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी केलीय. याप्रकरणी गेम झोनच्या मालकासह पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतलंय. राजकोटच्या कालावड रोडवर असलेल्या टीआरपी गेम झोनमध्ये लाकडी सामानाला आग लागली... बघता बघता या आगीनं रौद्र रूप धारण केलं. त्यात हा अख्खा गेम झोन जळून खाक झाला...अनेक लहान मुलं इथं गेम खेळायला गर्दी करतात...या आगीत त्यांच्यापैकी अनेकांचा बळी गेल्याचं सांगितलं जातंय. दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय...
26 May 2024, 08:11 वाजता
सांगली जिल्हा बँकेत महाघोटाळा
Sangli District Bank Scam : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील दुष्काळ निधी अपहाराची व्याप्ती आता आणखी वाढलीय. दुष्काळ आणि अवकाळ मदत निधीतील गैरव्यवहार प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे 6 शाखेतून एकूण दोन कोटी 43 लाखांचा घोटाळा झाल्याचं उघड झालंय..याप्रकरणी संबंधित शाखेच्या अधिका-यांसह कर्मचा-यांवर कारवाई करत पाच जणांना बँक प्रशासनाकडून निलंबित करण्यात आलंय. याआधी तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं,त्यामुळे आता घोटाळयाप्रकरणी एकूण आठ कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलंय. 219 शाखांमध्ये जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून तपासणी मोहीमही सुरू आहे
26 May 2024, 07:39 वाजता
नाशिकमध्ये सुराणा सराफा ज्वेलर्सवर आयकर विभागाची धाड
Nashik Income Tax Department Raids : नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सराफा व्यावसायिकाच्या दुकानावर आणि डेव्हलपर्सच्या कार्यालयात आयकर विभागाने टाकलेल्या छापात सुमारे 26 कोटी रुपयांची रोकड हाती लागलीय...तसेच 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त करण्यात आलेयत...सलग 30 तास झाडाझडती घेतली. यात नाशिक, नागपूर, जळगावच्या पथकाने ही कारवाई केली. 50 ते 55 अधिकाऱ्यांनी सुराणा ज्वेलर्स यांची पेढी तसेच त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयात छापासत्र सुरू केले. त्याचवेळी त्यांच्या राका कॉलनी येथील आलिशान बंगल्यात देखील स्वतंत्र पथकाने तपासणी सुरू केली. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले त्यांचे कार्यालय, खासगी लॉकर्स, बँकांमधील लॉकर्सही तपासण्यात आले. मनमाड आणि नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरीही तपासणी करण्यात आली.
26 May 2024, 07:27 वाजता
रेमल चक्रीवादळ आज बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार
Remal Cyclone : रेमल चक्रीवादळ आज बंगालच्या किनारपट्टीवर धडकणाराय. पुढील 6 तासांत वादळाचं मोठ्या चक्रीवादळात रुपांतर होणारेय. या वादळाचा ओडिशा राज्यालाही फटका बसणारेय. उत्तर ओडिशात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किना-यावर अलर्ट जारी करण्यात आलाय.एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्यायत...या चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यताये. मात्र, यामुळे महाराष्ट्राला काहीही धोका नसल्याचं सांगण्यात आलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा-