26 May 2024, 22:46 वाजता
अल्पवयीन आरोपीचा फेक व्हिडिओ बनवणाऱ्या रॅपर आर्यनला सायबर विभागाची नोटीस
Pune Car Accident Update : रॅपर आर्यनला पुणे सायबर विभागानं नोटीस बजावली आहे. कार अपघातात दोघांचा बळी घेणा-या अल्पवयीन आरोपीचा फेक व्हिडिओ, आर्यननं बनवला होता. या प्रकरणी 48 तासांत चौकशीसाठी हजर होण्याबाबतची नोटीस त्याला देण्यात आलीये. अल्पवयीन मुलाचे आक्षेपार्ह व्हिडिओ आर्यननं इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते. तर आपण फक्त कंटेंट क्रिएटर आहोत, त्यामुळे आपल्यावरचे गुन्हे मागे घेण्याची विनंती आर्यननं पोलिसांना केल्याची सूत्रांची माहिती आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
26 May 2024, 21:26 वाजता
एवढी वर्ष हाथ की सफाई केली, नालेसफाईवरून शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा
CM Shinde on Nalesafai : मुखमंत्री एकनाथ शिंदेंनी आज मुंबईतील नालेसफाईचा आढावा घेतला... त्यांनी मुंबईतील पाच मोठ्या नाल्यांची पाहणी केली...यावेळी मुंबई महापालिका अयुक्तांसह महापालिका कर्मचारीही उपस्थित होते... त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी नालेसफाईच्या मोहिमेत नागरिकांनाही सहभागी होण्याचं आवाहन केलंय... एवढी वर्ष हाथ की सफाई केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
26 May 2024, 19:08 वाजता
गोव्यामध्ये बस झोपडीत घुसल्याने अपघात, 4 जणांचा मृत्यू, 4 जखमी
Goa Accident : गोव्यामध्ये बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडीत घुसल्याने मोठा अपघात झालाय...यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय. तर 4 जण जखमी झालेत...जखमींवर मडगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे... अपघातावेळी चालक दारुच्या नशेत असल्याचं समोर आलंय...बस रोझेनबर्गर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जात होती. वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने बस झोपडीत घुसली. यात झोपडीत झोपलेल्या मजुरांचा मृत्यू झाला.. सर्व मजूर मूळचे बिहारचे रहिवासी असल्याचं समजतंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
26 May 2024, 17:43 वाजता
पुण्यातील बॉलर पबवर धाड, बार आणि स्टोअर रूम सील
Pune Pub Raid : पुण्यातील बॉलर पबवर धडक कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागानं या पबवर धाड टाकली. रात्री पार्टी सुरू असताना बॉलर पबवर धाड टाकण्यात आली. यावेळी पबमधला बार आणि स्टोअर रूम सील करण्यात आली.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
26 May 2024, 17:15 वाजता
शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास रोहित पाटलांचा विरोध
Rohit Patil Agitation : रोहित आर आर पाटील यांनी तासगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. पाण्यासाठी बिरणवाडीमध्ये रास्ता रोको केल्यावरुन पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं. तसंच शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरु केली. त्याला रोहित पाटलांनी विरोध केला. शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होणार असतील तर आपल्यावरही गुन्हा दाखल करा अशी भूमिका घेऊन, रोहित पाटलांनी पोलीस ठाण्यामध्येच ठाण मांडलं. पुणदी सिंचन योजनेतून पाणी मिळावं या मागणीसाठी, सावळजसह परिसरातील शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
26 May 2024, 14:16 वाजता
पुणे विद्यापीठात विनयभंग प्रकरण, अक्षय कांबळेंची काँग्रेसमधून हाकालपट्टी
Pune Molestation Case :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात NSUIचा विद्यापीठ अध्यक्ष अक्षय कांबळेंची काँग्रेसमधून हकलपट्टी करण्यात आलीय. त्यांच्याकडील सर्व पदं काढून घेण्यात आलेत. अक्षय कांबळे यांच्यावर एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्राचे प्रभारी अर्जुन चपराना यांनी हकलपट्टीचा पत्र काढलंय.
26 May 2024, 13:47 वाजता
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी 29 मेपर्यंत भावेश भिंडेला पोलीस कोठडी
Ghatkopar Hoarding Case : मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलीये. भावेश भिंडेच्या पोलीस कोठडीत 29मेपर्यंत वाढ करण्यात आलीये. घाटकोपर होर्डिग दुर्घटनेत 19 निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले... या प्रकरणात भावेश हा मुख्य आरोपी होता.. दुर्घटनेनंतर तो फरार झाला होता.. त्याला उदयपूरमधून मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.
26 May 2024, 13:21 वाजता
'भ्रष्टाचाराचा खेकड्याकडून नांग्या मारण्यास सुरूवात',रोहित पवारांची टीका
Rohit Pawar : निलंबित आरोग्य अधिका-याच्या पत्रावर रोहित पवारांनी शिंदेंना सवाल विचारलेयत....नियमबाह्य टेंडरसाठी कात्रजच्या कार्यालयात बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्यमंत्रीच आहे का?...आणि असेल तर संपूर्ण आरोग्य खात्याला आपल्या पोखरणाऱ्या या मंत्र्याला मुख्यमंत्री शिंदे अजून किती दिवस पाठीशी घालणार? आरोग्य व्यवस्थेला लागलेली ही कीड काढण्यासाठी सर्जरी कधी करणार? असा सवाल रोहित पवारांनी शिंदेंना विचारलाय...
26 May 2024, 12:32 वाजता
पुणे विद्यापीठात विद्यार्थिनीचा विनयभंग
Pune Molestation Case : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एका विद्यार्थिनीचा विनयभंग केलाय.. काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUIच्या अध्यक्षानं या तरुणीचा विनयभंग केलाय.. या प्रकरणी पीडित तरुणीनं चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.. त्यानंतर पोलिसांनी NSUIचे अध्यक्ष अक्षय कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
26 May 2024, 12:04 वाजता
'गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहा-फडणवीसांचे प्रयत्न', संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Nitin Gadkari : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केला...असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय...राऊतांनी सामनातील रोखठोकमधून गडकरींवरून मोदी शाह आणि फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत...
बातमीचा व्हिडीओ पाहा-