6 Dec 2024, 19:55 वाजता
माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं निधन
Madhukarrao Pichad Passed Away : माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं निधन.. वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.. नाशिक येथील नाईन पल्स रुग्णालयात ब्रेन स्ट्रोकमुळे दीड महिन्यापासून सुरु होते उपचार.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
6 Dec 2024, 16:42 वाजता
गृहमंत्रालयाच्या बदल्यात एकनाथ शिंदेंपुढे 3 पर्याय-सूत्र
Options Before Eknath Shinde : सत्तानाट्यानंतर खातेवाटप नाट्य सुरु.. गृहमंत्रालयाच्या बदल्यात शिंदेंपुढे तीन पर्याय दिल्याची सूत्रांची महिती.. महसूल, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम खात्याचे शिवसेनेपुढे पर्याय.. शिवसेनेकडून यातल्या एका खात्यावर विचार सुरू... गृहखात्याइतकेच महत्त्वाचे, तोडीसतोड खाते मिळवण्याकरता शिवसेना आग्रही असल्याची सूत्रांची माहिती.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
6 Dec 2024, 14:13 वाजता
सिंधुदुर्गात 8 पट्टेरी वाघांची नोंद
Sindhudurg Tiger : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी ते दोडामार्ग या सह्याद्रीच्या पट्ट्यात तब्बल आठ पट्टेरी वाघांची नोंद झालीये.. यात 5 मादी, तर 3 नर वाघांचा समावेश आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाघांची अधिकृतरीत्या वनविभागाच्या दप्तरी नोंद झाली आहे.
6 Dec 2024, 13:43 वाजता
कालिदास कोळंबकरांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती
Kalidas Kolambkar : राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आलीये..... आज राजभवनामध्ये राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी हंगामी विधानसभा अध्यक्ष यांना शपथ दिली..
उद्यापासून तीन दिवस राज्यसरकारचं विषेश अधिवेशन होणार आहे.. या विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येईल.. त्यासाठी कालिसाद कोळंबकर यांची हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली.. या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थीत होते..
6 Dec 2024, 13:23 वाजता
नव्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?
Mahayuti Ministry : मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडलाय.. मात्र आता लक्ष लागलंय कुणाली किती मंत्रिपदं मिळणार याकडे. फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची उद्या बैठक होणार असल्याची माहिती मिळतेय.. या बैठकीत मंत्रिपद आणि मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
6 Dec 2024, 11:52 वाजता
आवक कमी झाल्यानं लसणाचे दर महागले
Maharashtra Garlic Price Hike : लसूण महागल्यामुळे सर्वसामान्यांचं स्वयंपाकाचं बजेट बिघडलंय. घाऊक बाजारात 400 रुपये तर किरकोळ बाजारात 600 रुपये किलो लसणीचे दर झालेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानामुळे लसणाची आवक कमी झाली असून, पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्चपर्यंत लसणाचा हा चढता आलेख कायम राहील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
6 Dec 2024, 10:38 वाजता
नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा
Nashik Rain : नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय.. नाशिकच्या येवला, सिन्नर, निफाड भागात काल अवकाळी पाऊस झालाय.. या पावसामुळे द्राक्ष, कांदा आणि रब्बी हंगामातील मक्याचं मोठं नुकसान झालंय..
6 Dec 2024, 10:24 वाजता
म्हाडाची प्रथम येणाऱ्याला प्राधान्य योजना
Mhada : म्हाडाने आता प्रथम येणा-यास प्राधान्य योजना सुरु केलीय. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजनेत जाहीर करण्यात आलेल्या विरार, कल्याण आणि ठाण्यातील अल्प उत्पन्न गटातील घरांना सोडतीत प्रतिसाद न मिळाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. विरार, कल्याण, ठाण्यात जवळपास १४ हजार घरं प्रतिसादाविना पडून आहेत. यासाठी 2 डिसेंबर ते 11 डिसेंबर काळात अर्ज करता येणार आहेत.विरारच्या बोळींज, कल्याण तालुक्यातील खोणी आणि शिरढोण, ठाणे तालुक्यातील गोठेघर आणि भंडार्ली इथे ही घरं आहेत.
6 Dec 2024, 10:21 वाजता
घरांच्या किमतीत वाढ होणार?
Home Rate : चालू वर्षात घरांच्या किमतीत साडेचार टक्क्यांची वाढ झाल्यानंतर आता पुढच्या वर्षात देशातील प्रमुख शहरांतील घरांच्या किमती साडेसहा टक्क्यांनी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. देशातील प्रमुख शहरांत दोन वर्षांपासून घरांची विक्रमी विक्री झाली. शहरांत मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्यामुळे घरांच्या किमती वाढत असताना बांधकाम साहित्यही महागलंय..त्यामुळे घराच्या किमतीत आणखीन वाढ झालीय. त्यात दोन वर्षांनी म्हणजेच 2026 साली घरांच्या किंमतीत साडेसात टक्क्यांनी वाढ होईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय.
6 Dec 2024, 10:11 वाजता
पर्यटनासाठी आलेल्या तरुणांचा बुडून मृत्यू
Pune : पुण्यातील पवना धरणात पर्यटनासाठी आलेल्या 2 मित्रांचा बोट उलटल्याने बुडून मृत्यू झालाय. बोट उलटल्याने पाण्यात पडलेल्या मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या मित्राचाही बुडून मृत्यू झालाय. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. रेस्क्यू पथकाच्या मदतीने धरणामधून हे मृतदेह बाहेर काढण्यात आले.