6 Dec 2024, 09:42 वाजता
जालन्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी
Jalna Unseasonal Rain : जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावलीय.या अवकाळी पावसामुळे गहू,हरभरा ,मका,ज्वारी या रब्बी पिकांना दिलासा मिळालाय.तर काही भागातील वेचणीला आलेला कापूस भिजल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय.जालना जिल्ह्यातील जालना,बदनापूर, भोकरदन, अंबड,जाफ्राबाद या तालुक्यात आज अवकाळी पावसाने हजेरी लावलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
6 Dec 2024, 09:31 वाजता
कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष
Kalidas Kolambkar : राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे... आज राजभवनामध्ये राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हंगामी विधानसभा अध्यक्ष यांना शपथ देतील... उद्यापासून तीन दिवस राज्यसरकारचं विषेश अधिवेशन होणार आहे.. या विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येईल.. त्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते. दरम्यान आज या हंगामी अध्यक्षांना शपथ दिली जाईल....
बातमीचा व्हिडीओ पाहा -
6 Dec 2024, 09:14 वाजता
उमेदवाराचा स्वतःच्या घरावरच गोळीबार
Jalgaon Firing : निवडणुकीत मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी उमेदवारानं स्वतःच्या घरावरच गोळीबार केल्याचं समोर आलंय...MIMपक्षाचे जिल्हाध्यक्ष, अपक्ष उमेदवार उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम यांच्या घरावर काही अज्ञात व्यक्तिने गोळीबार केल्याचं समोर आलं होतं...पोलिसांनी तपास केला असता, अहमद यांनी त्यांच्या साथीदाराच्या माध्यमातून षडयंत्र रचून आपल्या स्वतःच्याच घरावर गोळीबार करून घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय... या प्रकरणात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन संशयीतांना अटक केली असून दोन संशयित आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय...
6 Dec 2024, 09:11 वाजता
राज्यापाल, फडणवीस, शिंदे, अजित पवारांचं डॉ. आंबेडकरांना अभिवादन
Dr. Babasaheb Ambedkar : महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबडेकर यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलंय. चैत्यभूमीवर जाऊन मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलंय.. राज्यपाल कृष्णण यांनीही बाबासाहेबांना अभिवादन केलंय.. त्यानंतर बाबाहेबांना मानवंदना देण्यात आलीय.. तर चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आलीय..
6 Dec 2024, 08:27 वाजता
प्रोबा-3 सॅटेलाईटचं यशस्वी प्रक्षेपण
ISRO PSLV LAUNCH : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO ने मोठी झेप घेतली आहे. ISRO ने युरोपियन स्पेस एजन्सीच्या मदतीने Proba-3 Mission लाँच केले आहे. या मोहिमेमुळे सूर्याची अनेक रहस्य उलगडणार आहेत. सूर्याच्या कोरोनाचा अभ्यास करण्यासाठी करण्यात प्रोबा-3 मिशन हाती घेण्यात आले आहे. कोरोना हे सूर्याचे बाह्य वातावरण आहे. हा भाग सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा जास्त गरम असतो. हे अंतराळ हवामानाचे स्त्रोत देखील आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
6 Dec 2024, 07:44 वाजता
सांगलीत माजी उपसरपंचाची हत्या
Sangli Murder : सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या घानवड या ठिकाणी माजी उपसरपंचाची भर दिवसा हत्या करण्यात आली आहे.गळा चिरून घनवाडचे शिवसेना शिंदें गटाचे बाबर समर्थक असणारे माजी उपसरपंच बापूराव चव्हाण यांचा निर्घृण खून करण्यात आला आहे.चव्हाण हे घानवड गावचे माजी उपसरपंच असून त्यांचे विटा येथे सोनारसिद्ध ज्वेलर्स या नावाने ज्वेलरीचे दुकान देखील आहे.गुरुवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास ते आपल्या बुलेट गाडीवरून नेवरी रस्त्यावरील पोल्ट्री शेडकडे निघाले असता, अज्ञात आणि त्यांचा पाठलाग करून धारदार शस्त्रांनी त्यांचा गळा चोरून हत्या केली आहे या घटनेमुळे घनवाड सह खानापूर तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे. हत्या कुणी आणि का केली याचा तपास आता पोलिस करताहेत..
6 Dec 2024, 07:41 वाजता
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन
Dr. Babasaheb Ambedkar : आज 6 डिसेंबर ..भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन.. बाबासाहेबांना अभिवादन कऱण्यासाठी देशभरातून लाखो भीम अनुयायी चैत्यभूमीवर आलेत..दादरमधील चैत्यभूमीवर भीम अनुयायांनी गर्दी केलीय...सर्वत्र निळं वादळ पाहायला मिळतंय.. चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी रांगा लावल्याचं दिसतंय.. शिवाजीपार्क मैदानात भीम अनुयायांसाठी पालिकेनं खास व्यवस्था केलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -