7 Dec 2024, 07:39 वाजता
महायुतीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक
Important meeting of Mahayuti today : महायुतीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक...मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता..महायुतीच्या प्रमुख नेते राहणार बैठकीला उपस्थित.. कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
7 Dec 2024, 07:17 वाजता
आजपासून राज्य विधीमंडळाचं अधिवेशन
State Legislature Session from Today : राज्य विधीमंडळाचं आजपासून मुंबईत विशेष अधिवेशन...आजपासून 3 दिवसांचं विशेष अधिवेशन... 7, 8 डिसेंबरला नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी... सकाळी 11 वाजता विशेष अधिवेशनाला सुरुवात...9 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांची निवड.. 9 डिसेंबरला संध्याकाळी 4 वाजता दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राज्यपालांचं अभिभाषण.. त्यानंतर 9 डिसेंबरलाच नागपूरमध्ये होणा-या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची घोषणा केली जाईल.